मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सुत्रांनी दिलेल्य माहितीनुसार, अमेरिकेने डिएगोमधील गार्सिया नौदल तळावर पुन्हा सैनिकांची तैनाती सुरु केली आहे. तसेच इराणकडून देखील तेहरानच्या खामेनी लष्करामध्ये हालाचाली पाहायला मिळाल्या आहे. यामुळे तज्ज्ञांनी मोठ्या युद्धाची शक्यता व्यक्त केली आहे.
जून २०२५ मध्ये इराण आणि इस्रायलमध्ये (Israel Iran War) जवळपास १२ दिवस संघर्ष सुरु होता. या युद्धात इराणच्या वरिष्ठ लष्करी आणि अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य करण्यात आले होते. यामध्ये इराणचे ६०० हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले होते. तसेच इराणच्या अणु प्रकल्पांवर अमेरिकेने हल्ला केला होता.
सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?






