
malaysia minister dr zulkifli hasan controversial lgbt work stress claim 2026
Malaysia minister work stress LGBT statement : कामाचा ताण वाढला की माणसाला थकवा येतो, डोकं दुखतं किंवा चिडचिड होते, हे आपण ऐकले आहे. मात्र, “कामाच्या ताणामुळे लोक समलिंगी (LGBT) बनतात,” असा दावा जर एखाद्या जबाबदार मंत्र्याने केला तर? वाचायला थोडे विचित्र वाटत असले तरी, मलेशियाच्या (Malaysia) एका मंत्र्याने संसदेत असाच काहीसा दावा करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. या अजब तर्कशास्त्रामुळे सोशल मीडियावर सध्या या मंत्र्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.
मलेशियाचे पंतप्रधान विभागाचे मंत्री (धार्मिक व्यवहार) डॉ. झुल्किफ्ली हसन यांनी संसदेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना हे विधान केले. विरोधी पक्षाच्या एका महिला खासदाराने “LGBT समुदायात वाढ होण्याची कारणे काय आहेत?” असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना मंत्र्यांनी २०१७ मधील एका जुन्या अभ्यासाचा संदर्भ दिला आणि सांगितले की, “कामाचा ताण, सामाजिक वर्तुळ, लैंगिक अनुभव आणि धार्मिक मूल्यांचा अभाव ही LGBT वर्तनामागील प्रमुख कारणे आहेत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Trade : ‘मदर ऑफ ऑल डील’ नंतर भारताचा नवा डाव! एस. जयशंकरआणि मार्को रुबियो यांच्यात होणार महाचर्चा
हे विधान सोशल मीडियावर येताच जगभरातून आणि विशेषतः मलेशियातील तरुणांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. एका युजरने उपरोधिकपणे विचारले, “जर कामाचा ताण हे कारण असेल, तर मग आमचे मंत्री समलिंगी का दिसत नाहीत? ते संसदेत काम करत नाहीत का?” दुसऱ्या एका युजरने म्हटले, “मी गेल्या १० वर्षांपासून १०-१० तास काम करतोय, तरीही मी अजून समलिंगी झालेलो नाही, कदाचित माझ्या बॉसने मला आणखी थोडा ताण द्यायला हवा!” काही कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांनी तर यावर विनोद करत लिहिले की, “आता जर एचआरने (HR) कामाचा भार वाढवला, तर मी थेट त्यांना सांगेन की सर, मला LGBT बनवायचे आहे का तुम्हाला?” अशा प्रकारे सोशल मीडियावर या विधानाचे अक्षरशः मीम्समध्ये रूपांतर झाले आहे.
KUALA LUMPUR: Work-related stress may be one of the factors leading individuals to become involved in the LGBT community, said Minister in the Prime Minister’s Department (Religious Affairs) Dr Zulkifli Hasan. Full story:https://t.co/RifEudH6Cs pic.twitter.com/tLI96TzrA9 — Daily Express Malaysia (@DailyExpress_MY) January 27, 2026
credit – social media and Twitter
मंत्र्यांच्या या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन (APA) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या मते, एखाद्या व्यक्तीची लैंगिक ओळख (Sexual Orientation) ही अनुवांशिक, हार्मोनल आणि पर्यावरणाच्या प्रभावातून तयार होते. कामाचा ताण किंवा कार्यालयातील वातावरण एखाद्या व्यक्तीची लैंगिक ओळख बदलू शकत नाही. उलट, LGBT समुदायातील व्यक्तींना समाजात वावरताना येणाऱ्या ताणामुळे (Minority Stress) त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, असे अनेक संशोधने सांगतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Red Tape Secret: नेतान्याहूंच्या फोनवर ‘लाल पट्टी’ का? ‘या’ व्हायरल फोटोमागचे इस्रायली ‘कमांडो’ सिक्रेट जगासमोर उघड
मलेशिया हा एक मुस्लीम बहुसंख्य देश असून तिथे समलैंगिकता बेकायदेशीर मानली जाते. ‘सेक्शन ३७७’ अंतर्गत तिथे कडक शिक्षेची तरतूद आहे. अलीकडच्या काळात तिथे एलजीबीटी समुदायावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, अशा प्रकारची ‘अवैज्ञानिक’ विधाने करून लोकांचे लक्ष मूळ प्रश्नांवरून वळवण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका मानवाधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे.
Ans: मंत्री डॉ. झुल्किफ्ली हसन यांनी सांगितले की, कामाचा ताण आणि सामाजिक प्रभाव हे लोकांना LGBT समुदायात सामील होण्यास प्रवृत्त करणारे घटक आहेत.
Ans: नाही. लैंगिक ओळख ही जैविक आणि नैसर्गिक असते. कोणत्याही प्रकारचा बाह्य ताण किंवा ऑफिसचे काम एखाद्याची लैंगिक ओळख बदलू शकत नाही.
Ans: नेटकऱ्यांनी या विधानाची खिल्ली उडवली असून अनेकांनी याला 'अडाणीपणाचे लक्षण' आणि 'विनाकारण ताण देणारे विधान' म्हटले आहे.