
nipah virus cases found in west bengal high alert in asian countries 2026
Nipah virus West Bengal cases 2026 : कोरोनारूपी संकटातून जग सावरत असतानाच आता ‘निपाह’ (Nipah Virus) या अत्यंत घातक विषाणूने भारताचे टेन्शन वाढवले आहे. पश्चिम बंगालमध्ये निपाहचे दोन सक्रिय रुग्ण आढळल्याने केवळ भारतच नाही, तर चीन आणि पाकिस्तानसह अनेक आशियाई देशांमध्ये ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हे दोन्ही रुग्ण व्यवसायाने परिचारक (Nurses) असून त्यांच्यावर सध्या विशेष आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
भारतात सहसा केरळमध्ये निपाहचे रुग्ण आढळतात, परंतु पश्चिम बंगालमध्ये तब्बल दोन दशकांनंतर हा विषाणू पुन्हा सक्रिय झाल्याने आरोग्य तज्ज्ञ चिंतेत आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना एका उपचार न झालेल्या रुग्णाकडून संसर्ग झाल्याचा संशय आहे. या घटनेनंतर केंद्र सरकारने तातडीने पश्चिम बंगालमध्ये तज्ज्ञांची टीम रवाना केली असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Storm Chandra : निसर्गाचे रौद्र रूप! ब्रिटनवर ओढवले ‘चंद्रा’ चे संकट; 100 हून अधिक ठिकाणी अलर्ट, जनजीवन विस्कळीत
या गंभीर बातमीमध्ये एक दिलासादायक गोष्ट म्हणजे, या दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १९६ लोकांची ओळख पटवून त्यांची कसून तपासणी करण्यात आली. या सर्वांचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आले असून कोणामध्येही विषाणूची लक्षणे आढळलेली नाहीत. त्यामुळे या विषाणूचा सामाजिक प्रसार (Community Spread) झाला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, खबरदारी म्हणून सर्वांना २१ दिवसांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
Nipah Is Back — And Asia Isn’t Taking Chances Breaking — India confirms new Nipah virus cases today.
This is not noise. It’s a known, lethal virus with no vaccine. What we know right now:
• 5 confirmed cases in eastern India (West Bengal)
• Healthcare workers infected →… pic.twitter.com/cviwEjRP0B — NextGen (@NextGenVisionar) January 26, 2026
credit – social media and Twitter
भारतात रुग्ण आढळल्याचा सुगावा लागताच शेजारील देशांनी कडक पावले उचलली आहेत:
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Winter Storm 2026: समुद्राच्या पोटात वाढतोय ‘बर्फाळ राक्षस’! अमेरिकेवर ‘बॉम्ब सायक्लोन’चे संकट; 18 राज्यांत आणीबाणी
निपाह हा एक ‘झोनोटिक’ (Zoonotic) विषाणू आहे, जो प्रामुख्याने फळांच्या वटवाघळांपासून (Fruit Bats) मानवांमध्ये पसरतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, याचा मृत्यूदर ४० ते ७५ टक्क्यांपर्यंत असू शकतो, जो कोव्हिडपेक्षा कितीतरी अधिक आहे.
Ans: हा विषाणू प्रामुख्याने वटवाघळांनी उष्ट्या केलेल्या फळांमधून, संक्रमित डुकरांच्या संपर्कातून किंवा मानवाकडून मानवाकडे पसरतो.
Ans: सध्या निपाहवर कोणतीही मान्यताप्राप्त लस उपलब्ध नाही, मात्र काही लसींच्या चाचण्या सध्या सुरू आहेत.
Ans: सध्या केवळ दोन रुग्ण असून परिस्थिती नियंत्रणात आहे. संपर्कातील कोणाही नवीन व्यक्तीला संसर्ग झालेला नाही.