Malaysia's Proposal to mediate for a ceasefire in Thailand and Cambodia
Thailand Combodia Ceasefire : थायलंड आणि कंबोडियामध्ये सीमावादावरुन गेल्या चार दिवसांपासून संघर्षा सुरु होता. या संघर्षात ३३ हुन अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी युद्धबंदीसाठी सहमती दर्शवल्याचा दावा केला होता. परंतु या दाव्यानंतर दोन्ही देशांमध्ये सीमेवर संघर्ष सुरुच होता.
दरम्यान आता पुन्हा एकदा मलेशियाने दोन्ही देशांनी युद्धबंदीसाठी सहमती दर्शवल्याचा दावा केला आहे. शिवाय दोन्ही देशांतील संघर्ष थांबल्याचेही दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलेशियाने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थ करुन युद्धबंदीसाठी मान्यता मिळवली आहे. मलेशियाचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद हसन यांनी सांगितले की, दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी मलेशियाला मध्यस्थ म्हणून मान्यता दिली आहे. दरम्यान दोन्ही देशांनी एकमेकांवर तोफखान्याने हल्ला केल्याचा आरोप करत आहे.
परंतु याच वेळी मलेशियाचे परराष्ट्र मंत्री हसन यांनी कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट आणि थायलंडचे कार्यवाहरक पंतप्रधान फुमथम वेचायचाई यांची सोमवारी भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. दोन्ही देशांमधील तणावर कमी करणाऱ्यावर या भेटीदरम्यान चर्चा होणार आहे. तसेच दोन्ही देशांच्या परस्पर हितसंबंधावर देखील चर्चा केली जाईल असे म्हटले जात आहे.
मलेशियाचे परराष्ट्र मंत्री हसन यांनी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे म्हटले. त्यांनी सांगतिले की, दोन्ही देशांनी मलेशियावर युद्धबंदीसाठी विश्वास दाखवला आहे. यामुळे मी कंबोडिया आणि थायलंडच्या परराष्ट्र मंत्र्याची चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांनी शांततेने सीमावाद सोडवण्यासाठी सहमती दर्शवली आहे. या प्रकरणामध्ये कोणत्याही परदेशी देशाची भूमिका नसावी असे हसन यांनी स्पष्ट केले आहे. शुक्रवारी मलेशियाने कंबोडिया आणि थायलंडला मलेशियाच्या मध्यस्थीने युद्धबंदीचा प्रस्ताव दिला होता. यासाठी आज सोमवारी (२८ जुलै) मलेशियाचे परराष्ट्र मंत्री हसन दोन्ही देशांना भेट देणार आहेत.
Samdech Thipadei Announces Positive News for the Armies and People of Cambodia and Thailand. The Thai Side Has Agreed to the US President’s Request for a Ceasefire https://t.co/LHU3sMiarT
— PM’s Office of Cambodia 🇰🇭 (@peacepalace_kh) July 27, 2025
दरम्यान ट्रम्प यांनी देखील दोन्ही देशांनी युद्धबंदीसाठी सहमती दर्शवल्याचा दावा केला होता. त्यांनी दोन्ही देसांचया पंतप्रधानांशी थेट चर्चा केली होती. थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार देखील मानले होते आणि युद्धबंदीवर चर्चेसाठी तयारी दर्शवली होती. दोन्ही देशांनी तात्काळ आणि शांततेच्या बाजूने युद्धबंदीसाठी तयारी दाखवली होती. परंतु यानंतरही रविवारी हा संघर्षा सुरु राहिला होता. आता मलेशिया यामध्ये यशस्वी होईल का हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.