Mass shooting in Southern Virginia, US several officers injured
America firing : अमेरिकेत (America) पुन्हा एक गोळीबाराची घटना घडली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दक्षिण व्हर्जिनियामध्ये ही घटना घडली. यामध्ये अनेक कायदा अंलबजावणी अधिकारी जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या व्हाइट हाइसने सोशल मीडियावरुन या घटनेची माहिती दिली. या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे की, व्हर्जिनियाच्या पिट्सिल्व्हेनिया भागात गोळीबार झाला. यामध्ये अनेक अधिकारी जखमी झाले आहे. अमेरिका त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करत असून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे.
सध्या घटनास्थळी संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त करण्यात आल आहे. आपत्कालीन सेवा घटनास्थली दाखल झाल्या असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हर्जिनायाचे अधिकारी मॅकग्वायर यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी परिस्थितीवर संपूर्ण लक्ष असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यामागचे कारण सध्या अस्पष्ट आहे. या घटनेचा शोध सुरु करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बुधवारी (१३ ऑगस्ट) रोजी ही घटना घडली. एका संशयिताने अनेक पोलिस अधिकाऱ्यांवर अचानक गोळ्या झाडल्या. यानंतर संशित एका घरात लपून बसला. परंतु पोलिस अधिकाऱ्यांना त्याला बाहेर काढले. सध्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरु आहे. व्हर्जिनियाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या परिस्थिती बिकट आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.
याच्या एक दिवस आधीच अमेरिकेच्या टेक्सासमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. यामध्ये एका पार्किंमध्ये दोन वृद्ध व्यक्ती आणि एका मुलाची हत्या झाली. त्यानंतर आरोपी चोरी केलेल्या कारमधून पळून गेला. काही तासाने त्याला ताब्यात घेण्यात आले.
गेल्या काही महिन्यात अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आतापर्यंत यामुळे अनेक लोकांचा बळी गेला आहे. गेल्या ५० वर्षात १५ लाखांहून अधिक लोक मरण पावले आहेत. अमेरिकेत लहान शस्त्र खरेदीसाठी किमान वय वर्षे १८ आणि इतर शस्त्रांसाठी २१ वर्षे आहे. यामुळे अमेरिकेत जवळपास अनेक लोकांकडे बंदूका आहेत अशा परिस्थिती अमेरिकेत गोळीबाराच्या (America Firing) घटना आता सामान्य झाल्या आहेत.
इराण इराकच्या ‘त्या’ डीलने अमेरिका धोक्यात? डोनाल्ड ट्रम्प यांची वाढली चिंता