
अफगाणिस्तानात साखळी बॉम्बस्फोट; एकामागून एक स्फोटांनी हादरले काबुल, सुरक्षा यंत्रणांचा तपास सुरु...
या हल्ल्याची जबाबदारी बलूच विद्रोही संघटना बलूच रिपब्लिकन गार्ड्सने (BRG) ने स्वीकारली आहे. हा हल्ला झाला त्यावेळी ट्रेन पेशावरकडे रवाना झाली होती. BRG ने जारी केलेल्या निवेदनात सागंण्यात आले की, शिकारपूर-बीरआरजी मार्गाजवळ सुल्तान कोटजवळ जाफर एक्सप्रेसवर हल्ला करण्यात आला. यामध्ये काही लोक जखमी झाले आहे. रेल्वेचे सहा डबे पटरीवरुन घसरले आहेत. BRG ने हेही स्पष्ट केले की, बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत हे हल्ले सुरुच राहतील.
इटलीमध्ये भीषण रस्ता अपघात; कार आणि ट्रकच्या धडकेत चार भारतीय नागरिकांचा मृत्यू
जाफर एक्सप्रेसला सतत लक्ष्य केले जात आहे. क्वेटा ते पेशावरदरम्यान हे हल्ले होत असून मागील काही महिन्यात सात हल्ले झाले आहेत. यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी सिबी रेल्वे स्थानकाजवळ हल्ला झाला होता, तर त्या आधी ४ ऑगस्ट रोडी कोलपूरजवळ हल्ला झाला होता. या हल्ल्यांची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) घेतली होती.
गेल्या मार्च २०२५ मध्ये देखील BLA ने जाफर एक्सप्रेस हायजॅक केली होती. या हायजॅकमध्ये ४०० प्रवशांना बंधक बनवण्यात आले होते. बलुच लिबरेशन आर्मीच्या बंदखोरांनी बोलान क्षेत्रातील पीरु, कुनरी आणि गुलदार भागात पटरीवर स्फोटक ठेवून ट्रेन हायजॅक केली होती.जाफर एक्सप्रेस पेशावर ते क्वेटा दरम्यान धावते.
नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दल आणि पोलिसांनी संपूर्ण परिसराचे निरीक्षण केले आहे. पटऱ्यांची तपासणी करण्यासाठी एक स्फोटक निवारक तुकडी तैनात केली आहे. जाफर एक्सप्रेसवरील वाढत्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानमध्ये रेल्वे सुरक्षेवर प्रश्न उपस्थि केले जात आहे. सामान्य नागरिकांसाठी हे हल्ले अधिक धोकादायक बनत आहेत.
प्रश्न १. पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसवर कुठे हल्ला झाला?
शिकारपूर-बीरआरजी मार्गाजवळ सुल्तान कोटजवळ पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसवर हल्ला करण्यात आला आहे.
प्रश्न २. जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्यात किती जीवितहानी झाली?
पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्यात सात लोक जखमी झाले असून कोणात्याही मृत्यूची नोंद झालेली नाही.
प्रश्न ३. जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्याची जबाबदारी कोणी स्वीकारली ?
जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्याची जबाबदारी बलूच विद्रोही संघटना बलूच रिपब्लिकन गार्ड्सने (BRG) ने स्वीकारली आहे.
प्रश्न ४. जाफर एक्सप्रेसवर किती वेळा हल्ला करण्यात आला?
जाफर एक्सप्रेसवर २०२५ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत सात हल्ले झाले आहेत.