इटलीमध्ये भीषण रस्ता अपघात; कार आणि ट्रकच्या धडकेत चार भारतीय नागरिकांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Italy Road Accident News : रोम : युरोपीय देश इटलीमध्ये (Italy) भयानक रस्ता अपघात (Road Accident) झाला आहे. यामध्ये चार भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी (०६ ऑक्टोबर) इटलीची राजधानी रोममधील भारतीय दूतावासाने याबद्दल वृत्त दिले.
भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, इटलीच्या दक्षिणेकडील माटेरा येथे स्कॅनझानो नगरपालिकेत हा अपघात घडला. यावेळी एका कारने ट्रकला जोरदार धडक दिली. ज्यामुळे भयकंर अपघात झाला. या घटनेवर भारतीय दूतावासाने दु:ख व्यक्त केले आहे.
मृतांची ओळख
मीडिया रिपोर्टनुसार, मृतांची ओळख पटवण्यात आली आहे. यामध्ये ३४ वर्षीय मनोज कुमार, ३३ वर्षीय सुरजीत सिंग, ३१ वर्षीय हरविंदर सिंग आणि २० वर्षीय जसकरण सिंग अशी करण्यात आली आहे. भारतीय दूतावासाने घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, दक्षिण इटलीतील माटेरा येथे मोठा रस्ता अपघात झाला. या अपघातात चार भारतीय नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भारतीय दूतावास तीव्र शोक व्यक्त करतो.
“Will provide all possible consular assistance”: Indian Embassy in Italy condoles death of four nationals in road accident Read @ANI Story | https://t.co/YimrWEaHry#India #Italy #RoadAccident pic.twitter.com/98I68jUsl6 — ANI Digital (@ani_digital) October 6, 2025
भारतीय दूतावासाने सांगितले की, सध्या या घटनेचा तपशील मिळवण्यासाठी त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. दूतावासाने पीडितचांच्या कुटुंबांना शक्य तेवढी कॉन्सुलर मदतही करण्याचे आश्वासन दिले आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, अपघतात (Accident) जखमी झालेल्या सहा जणांना रुग्णलायता दाखल करण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती अत्यंत गभीर आहे. सध्या अपघात नेमका कसा झाला याचा तपास सुरु आहे. ट्रक चालक सुरक्षित आहे. माटेरा सरकारी वकील कार्यालय सध्या या अपघाताची चौकशी करत आहे.
प्रश्न १. इटलीमध्ये कुठे झाला रस्ता अपघात?
इटलीमध्ये युरोपीय देश इटलीमध्ये दक्षिणेकडील माटेरा येथे स्कॅनझानो येथे भयानक रस्ता अपघात झाला आहे.
प्रश्न २. इटलीतील रस्ता अपघातात किती भारतीयांचा मृत्यू झाला?
इटलीतील भीषण रस्ते अपघातात चार भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
प्रश्न ३. इटलीच्या रस्ते अपघातातील भारतीय नागरिकांच्या मृत्यूवर भारतीय दूतावासाने काय म्हटले.
इटलीत रस्ते अपघातात भारतीय नागरिकांच्या मृत्यूवर रोममधील भारतीय दूतावासाने शोक व्यक्त केला आहे. तसेच या घटनेसंदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याचे म्हटले आहे. पीडितांच्या कुटुंबीयांनाही मदती करण्याचे म्हटले आहे.
माउंट एव्हरेस्टवर अचानक हवामान बदल ; जोरदार बर्फवृष्टीमुळे अडकले हजारो गिर्यारोहक