Maxwell drags Princess Diana in Epstein Scandal
Jeffrey Epstein and Princess Diana : लंडन: टेस्लाचे आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यातील वादामुळे जेफ्री एपस्टिन प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या प्रकरणाशी अनेक नामवंत व्यक्तींची नावे जोडली जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यानंतर आता ब्रिटनच्या राजकुमारी डायना (Diana Montano) यांचेही नाव एपस्टिन प्रकरणाशी जोडण्यात आले आहे. गिसलैन मॅक्सवेल जिच्यावर एपस्टीनला मदत केल्याचा आरोप आहे तिने राजकुमारी डायना एपस्टीन डेटवर असल्याचे म्हटले. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
एपस्टिन हा वाद श्रीमंत उद्योजक जेफ्री एपस्टिनशी संबंधित आहे. जेफ्री एपस्टिनवर २०१९ मध्ये अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आणि तस्करीचा गंभीर आरोप करण्यात आला होता. अमेरिकन-ऑस्ट्रेलियन महिला व्हर्जिनिया लुईस ग्रिफे हिने याबद्दल खुलासा केला होता. नुकतेच तिचे निधन झाले असून तिने अमेरिकेतील हाय प्रोफाइल वेश्याव्यवसाय नेटवर्कचा पर्दाफाश केला होता. जेफ्री एपस्टिनने तिला या वेश्याव्यवसायात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे २०१९ मध्ये तिने एका मुलाखतीदरम्यान उघड केले होते. यामध्ये ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू आणि फ्रेंच मॉडेलिंग एजंट जीन-ल्यूक ब्रुनेल यांचा देखील समावेश होता. तिच्या या दाव्याने जगभरात खळबळ उडाली होती. नंतर २०१९ मध्ये एपस्टिनला अटक करण्यात आली. पण त्याचा तुरुंगात मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केल्याचे घोषित करण्यात आले. २००२ ते २००५ दरम्यान न्यूयॉर्क आणि फ्लोरिडातील अनेक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या होता.
मेलानिया ट्रम्प जो बायडेनच्या मुलावर का संतापल्या? १ अब्ज डॉलर्सच्या मानहानीच्या खटल्याची दिली धमकी
या वर्षी एपस्टाईन संबंधित प्रकरणा संबंधी काही फाइल्सचा खुलासा करण्यात आला होता. यात गिसलैन मॅक्सवेल हिच्यावर जेफ्री एपस्टिनला वेश्याव्यवसायात मदत केल्याचा आरोप आहे. सध्या मॅक्सवेल तुरुंगात शिक्षा भोगत आहे. यावेळी तिने दावा केला आहे की, ब्रिटनची राजकुमारी डायना आणि एपस्टीन यांची लंडनमधील एका सोहळ्यादरम्यान भेट झाली होती. डायना यांची मैत्री मॉन्कटनने आयोजित केला कार्यक्रमादरम्यान ही भेट झाली होती, असे मॅक्सवेलने सांगितले. पण मॅक्सवेल या पार्टीमध्ये नव्हती, यामुळे एपस्टिन आणि डायानाची खरेच भेट झाली का हे निश्चित नाही.
शिवाय मॅक्सवेल सांगितले होते की, २००० च्या दशकाच्या सुरुवातीला राजकुमारी डायाना आणि एपस्टीनची भेट झाली होती. परंतु ही वेळ चुकीची आहे. कारण यापूर्वीच १९९७ मध्ये राजकुमारी डायनाचा मृत्यू झाला होता. यामुळे सध्या दा दावा वादग्रस्त ठरत आहे.
या प्रकरणाशी प्रिन्स अँड्र्यू यांचेही नाव जोडण्यात आले आहे. व्हर्जिनिया ग्रिफे हिने अँड्र्यूवर लैंगिक अत्याचारा आणि जेफ्रीसोबत वेश्याव्यवसायात अडकवल्याचा आरोप केला होता. शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव या प्रकरणाशी जोडण्यात आले आहे.आता पुन्हा राजकुमारी डायनाच्या नाव जोडले गेल्या जगभरात खळबळ उडाली आहे.
ट्रम्प-मस्क वादामुळे चर्चेत आलेलं एपस्टिन प्रकरण नेमकं काय? एलॉनचे आरोप किती गंभीर? जाणून घ्या