मेलानिया ट्रम्प जो बायडेनच्या मुलावर का संतापल्या? १ अब्ज डॉलर्सच्या मानहानीच्या खटल्याची दिली धमकी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मेलानिया ट्रम्प यांनी हंटर बायडेनचे नाव लैंगिक शोषण आणि तस्करीच्या आरोपाखाली दोषी ठरवल्या गेलेल्या जेफ्री एपस्टाइनशी प्रकरणावर केलेल्या विधानावर संताप व्यक्त केला असून ती विधाने मागणे घेण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्यावर खटला दाखल करण्याचीही धमकी दिली आहे.
इराण इराकच्या ‘त्या’ डीलने अमेरिका धोक्यात? डोनाल्ड ट्रम्प यांची वाढली चिंता
खरं तरं प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादादरम्यान जेफ्री एपस्टाईन प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरु झाली होती. मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.
दरम्यान आता या प्रकरणावरुन माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलागा हंटर बायडेन याने खळबळजनक विधान केले आहे. हंटर बायडेन यांने जेफ्री एपस्टाइनने मेलानिया यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ओळख केल्याचा दावा केला आहे. ब्रिटीश पत्रकार अँड्र्यू कॅलाघनच्या मुलाखतीदरम्यान हंटरने हे विधान केले आहे.
हंटर बायडेनच्या या विधानावर मेलानिया ट्रम्प यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी हंटर बायडेनला ही विधाने मागे घेण्यास सांगितले आहे. तसेच त्यांनी हंटरवर खटला दाखल करण्याची धमकी दिली आहे.
मेलानिया ट्रम्प यांच्या वकिलाने यासंबंधी एक पत्र हंटर बायडेनला पाठवले आहे. यामध्ये पत्रात, हंटर बायडेनने केलील ही विधान खोटी, मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांची बदनामी करणारी आणि अत्यंत अश्लील असल्याचे म्हटले आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की, हंटर बायडे यांच्या या विधानांनमुळे अमेरिकेच्या फर्स्ट लेडीचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच त्यांच्या प्रतिष्ठेवर परिणाम झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांनी एपस्टाइनशी संबंध असल्याचा दावा फेटाळला आहे. त्यांनी १९९८ मध्ये न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये पार्टीदरम्यान मॉडेलिंग एजंट पाओलो झांपोली यांनी त्यांची ओळख करुन दिली असल्याचे म्हटले आहे. सध्या हंटर बायडेनविरोधात मानहानीचा खटला दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र यावर अद्याप हंटर बायडेन किंवा जो बायडेन यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
अमेरिकेत पुन्हा रक्तपात! दक्षिण व्हर्जिनियात अंदाधुंद गोळीबार; अनेक अधिकारी जखमी






