फोटो सौजन्य: iStock
सध्या Gen Z ची चर्चा सगळीकडेच होताना दिसते. ही पिढी सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते. त्यामुळेच त्यांच्या बोलण्यात देखील नवीन शब्द ऐकायला मिळत असतात. हेच शब्द आता Merriam-Webster डिक्शनरीत समाविष्ट केले गेले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या डिक्शनरीत तब्बल 5000 नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे.
गुरुवारी मेरीअम-वेबस्टरने जाहीर केले की त्यांनी त्यांच्या सर्वात लोकप्रिय शब्दकोशांपैकी एकाचा संपूर्ण पुनरावलोकन व नवा आवृत्ती तयार करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या नव्या आवृत्तीत 5000 हून अधिक नवे शब्द समाविष्ट केले गेले आहेत.यामध्ये “Doomscroll,” “WFH” (Work From Home), “Dumbphone,” “Ghost kitchen” यांसारखे शब्द आहेत.
इतर नव्या शब्दांमध्ये “cold brew,” “farm-to-table,” “rizz,” “dad bod,” “hard pass,” “adulting,” “cancel culture,” “petrichor,” “teraflop” आणि “side-eye” यांचा समावेश आहे.
मेरीअम-वेबस्टर कॉलेजिएट डिक्शनरी’ची ही 12 वी आवृत्ती आहे. याआधीची छापील आवृत्ती 22 वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. दरम्यान, अमेरिकेत छापील शब्दकोशांच्या विक्रीत घट होत असल्याचे Circana BookScanच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. या डिक्शनरीची नवीन आवृत्ती 18 नोव्हेंबर रोजी बाजारात येणार असून, त्यासाठी प्री-ऑर्डरची सुविधा सध्या उपलब्ध आहे.
कॅम्ब्रिज डिक्शनरीनं अलीकडेच हजारो नवे शब्द आपल्या संग्रहात सामावून घेतले आहेत. या नव्या शब्दांमागे मुख्य प्रेरणा सोशल मीडिया आणि सेलिब्रिटी संस्कृती असल्याचं सांगितलं जात आहे.
नव्या शब्दांमध्ये बहुतेक शब्दांना जनरेशन Z आणि जनरेशन अल्फाच्या वापरामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. यामध्ये “skibidi,” “delulu,” “tradwife” आणि “broligarchy” हे काही महत्त्वाचे शब्द आहेत.
कॅम्ब्रिज डिक्शनरीचे लेक्सिकल प्रोग्राम मॅनेजर कोलिन मॅकिन्टॉश यांनी ऑगस्ट महिन्यात दिलेल्या निवेदनात सांगितलं की, “इंटरनेट संस्कृती इंग्रजी भाषेत सातत्याने बदल घडवते आहे आणि त्या बदलांचं निरीक्षण करून ते डिक्शनरीत नोंदवणं ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे.”