
Massive Explosion on Iran's Southern port Abbas
Epstein Files मुळे जागतिक राजकारणात वादळ; ट्रम्प चवताळले, इराणवर निशाण्यावर?
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या अब्बास बंदरावर शनिवारी (३१ जानेवारी २०२६) भीषण स्फोट झाला. या स्फोटात एका आठ मजली इमारतीत स्फोट झाला आहे. या स्फोटात दोन मजेले उद्ध्वस्त झाले आहे, तर आसपासच्या इमारतींना देखील आग लागली आहे. यामुळे काही ठिकाणी वाहने आणि दुकानांचेही नुकसान झाले आहे. बचाव आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरु आहे.
या हल्ल्यामागचे कारण सध्या अस्पष्ट असून हल्ल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या अमेरिका-इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. परंतु अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या या हल्ल्याचा तपास सुरु करण्यात आला आहे.
डिसेंबर २०२५ च्या अखेरपासून अमेरिका आणि इराणमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. इराणमध्ये वाढत्या महागाई आणि खामेनेई सरकारच्या दडपशाहीविरोधात तीव्र आंदोलन उफाळले होते. या आंदोलनाला दाबण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला होता. या आंदोलनात निदर्शनकर्त्यांसह सुरक्षा अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला होता. यामुळे सरकारने सुरक्षा दलांच्या मृत्यूसाठी अमेरिकेला आणि निदर्शनकर्त्यांना जबाबदार धरले होते.
तर दुसरीकडे अमेरिकेने इराणने निदर्शकांवर केलेल्या हिंसाचाराला तीव्र विरोध केला होता. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी निदर्शकांना पाठिंबा देत इराणवर हल्ल्याची धमकीही दिली होती. अमेरिकेने आपले सैन्य इराणभोवती तैनातही केल आहे. सध्या इराण आणि अमेरिकेतील तणाव प्रचंड वाढला आहे. इराणने देखील अमेरिकेने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा दिला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान इराणच्या अब्बास बंदरावरील स्फोट अपघात नसून हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु इराण किंवा अमेरिकेकडून याबाबत कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही.