Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East : अमेरिका ‘माफिया टोळीसारखी’ वागत आहे; पश्चिम आशियातील संकटासाठी इराणचा वॉशिंग्टनवर ठपका

सुरु असलेल्या इराण अमेरिका युद्धावर इराणचे परराष्ट्र मंत्री इस्माईल बघाई यांनी आपले परखड मत मांडले आहे . त्यांनी अमेरिकेवर आरोप केलेले आहेत . या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीला अमेरिका आणि त्याला असणारा इतर देशाच्या तेलाच्या साठ्याचा हव्यास . हे आरोप अमेरिकेने फेटाळले आहेत . असे सूत्रांकडून समजते आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 27, 2026 | 10:00 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • इस्माईल बघाई यांचे परखड मत
  • तणाव वाढण्याची शक्यता
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेवर पुन्हा एकदा तीव्र शब्दांत टीका केली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी अमेरिका ही “कोणत्याही नियमांचे पालन न करणाऱ्या माफिया टोळीसारखी वागत आहे” अशी कठोर टिप्पणी केली. त्यांनी सध्याच्या पश्चिम आशियातील अस्थिर परिस्थितीसाठी थेट वॉशिंग्टनला जबाबदार धरले.

इस्माईल बघाई यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आंतरराष्ट्रीय कायदे आणि संयुक्त राष्ट्रांच्या तत्त्वांकडे दुर्लक्ष करून आपल्या हितासाठी दुहेरी भूमिका घेत आहे. इस्रायलला दिला जाणारा लष्करी आणि राजनैतिक पाठिंबा हा प्रदेशातील संघर्ष अधिक तीव्र करत असल्याचा आरोप त्यांनी केला.इराणचा दावा आहे की, गाझा पट्टीसह पश्चिम आशियातील विविध भागांमध्ये वाढलेल्या संघर्षामागे अमेरिकेचे धोरण महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे या भागातील शांतता आणि स्थैर्य धोक्यात आले असून परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे.

British Raj : दुलीप सिंग,पंजाबचे शेवटचे महाराजा, ज्यांना ब्रिटिशांनी कोहिनूर हिसकावून घेतल्यानंतर ब्रिटन सोडण्याची परवानगी नव्हती.

दुसरीकडे, अमेरिका हे सर्व आरोप फेटाळत आली आहे. अमेरिकेच्या भूमिकेनुसार, इस्रायलच्या सुरक्षेसाठी दिला जाणारा पाठिंबा योग्य असून, इराणच प्रदेशातील अनेक सशस्त्र गटांना मदत करून अस्थिरता वाढवत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका कायम आहे. विश्लेषकांच्या मते, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता राजनैतिक संघर्ष पश्चिम आशियातील आधीच गुंतागुंतीच्या परिस्थितीला अधिक गंभीर बनवू शकतो. गाझा, लेबनॉन, सीरिया आणि येमेनमधील घडामोडींमुळे संपूर्ण प्रदेशातील सुरक्षा आणि जागतिक ऊर्जा बाजारावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

China Rain : चीनच्या युनेस्को वारसा स्थळी पर्यटकांची सुखरूप सुटका

दरम्यान, इराणच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशांतील राजनैतिक तणाव आणखी वाढण्याची शक्यता असून, आगामी काळात पश्चिम आशियातील परिस्थितीवर जगभरातील देशांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Middle east america is behaving like a mafia gang iran blames washington for the crisis in west asia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 10:00 PM

Topics:  

  • Iran Vs America
  • Middle East War Impact
  • USA

संबंधित बातम्या

Iran Us War : स्वस्त आणी डेंजर ; इराणी मिसाईलने उडवली अमेरिकेची झोप , पेंटागॉन टेन्शन मध्ये
1

Iran Us War : स्वस्त आणी डेंजर ; इराणी मिसाईलने उडवली अमेरिकेची झोप , पेंटागॉन टेन्शन मध्ये

RedSeaCrisis :हुतींचा घाव, ब्रेंट ९१ डॉलर पार!
2

RedSeaCrisis :हुतींचा घाव, ब्रेंट ९१ डॉलर पार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.