Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saudi Arabia: अकासा एअरलाइन्सचा मोठा निर्णय; सौदी अरेबियातील रियाध आणि जेद्दाह उड्डाणे नोव्हेंबर अखेरपर्यंत थांबवली

Saudi Arabia : मध्य पूर्वेतील बिघडत चाललेली परिस्थिती आणि हुथी गटांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, अकासा एअरलाइन्सने आपली उड्डाणे रद्द करण्याचा कालावधी १० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 24, 2026 | 12:27 PM
Akasa Air Saudi Arabia Flights Cancelled Akasa Air Jeddah Riyadh Flight News

Akasa Air Saudi Arabia Flights Cancelled Akasa Air Jeddah Riyadh Flight News

Follow Us
Follow Us:
  • उड्डाणे स्थगितीचा कालावधी वाढवला
  • प्रवाशांना १००% रिफंड आणि मोफत री-शेड्यूलिंग
  • अडकलेल्या यात्रेकरूंची मायदेशी वापसी

मध्य पूर्वेतील (Middle East) वाढता लष्करी तणाव आणि सौदी अरेबियातील (Saudi Arabia) पायाभूत सुविधांवर होणाऱ्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमान कंपनी ‘आकाशा एअर’ने (Akasa Air) अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियातील बिघडत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, कंपनीने जेद्दाह आणि रियाध शहरांसाठीची आपली सर्व उड्डाणे स्थगित करण्याचा कालावधी आणखी वाढवला आहे. कंपनीने जाहीर केलेल्या नवीन ट्रॅव्हल अपडेटनुसार, जेद्दाहहून ये-जा करणारी उड्डाणे १० नोव्हेंबरपर्यंत, तर रियाध शहरासाठीची उड्डाणे ३० नोव्हेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.

आकाशा एअरने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आणि ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरीद्वारे प्रवाशांना या निर्णयाची माहिती दिली आहे. २३ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या निवेदनात विमान कंपनीने स्पष्ट केले की, प्रवाशांची सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांचे कल्याण हे त्यांच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. सौदी अरेबियातील सद्य सुरक्षा वातावरणाचे अत्यंत बारकाईने आणि रिअल-टाइममध्ये मूल्यांकन केले जात असून, आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचा विचार करूनच ही उड्डाण स्थगिती वाढवण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे हाल

या अचानक झालेल्या उड्डाण रद्दमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे आणि विशेषतः सौदीत जाणाऱ्या भारतीय कामगार व यात्रेकरूंचे मोठे हाल होत आहेत. मात्र, प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून आकाशा एअरने मोठ्या सवलतींची घोषणा केली आहे. प्रभावित प्रवासी त्यांच्या तिकिटाचा पूर्ण परतावा (Full Refund) मिळवू शकतात, जो पुढील सात दिवसांच्या आत त्यांच्या मूळ पेमेंट खात्यात जमा केला जाईल. याशिवाय, प्रवाशांना कोणताही अतिरिक्त आकार न देता त्यांच्या सोयीनुसार प्रवासाचे पुनर्नियोजन (Re-scheduling) करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्या प्रवाशांनी ट्रॅव्हल एजंट किंवा थर्ड-पाटी अ‍ॅप्सद्वारे बुकिंग केले आहे, त्यांनी तातडीने आपल्या एजंटशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Chernobyl : माणूस गेला अन् घोडे जगले! चेर्नोबिलच्या रेडिएशन क्षेत्रात 31 घोड्यांचा झाला भयानक प्रयोग; आजचे वास्तव काय?

आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण

दरम्यान, सौदी अरेबियातील नागरी ठिकाणे आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. २१ ऑक्टोबर रोजी दम्माम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सौदी अरामकोच्या अत्यंत महत्त्वाच्या ‘शायबाह’ तेलक्षेत्रावर हल्ल्याचे प्रयत्न झाले होते, ज्याचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तीव्र शब्दांत निषेध केला होता. यमनमधील इराणसमर्थित हुथी बंडखोरांकडून सौदीच्या पायाभूत सुविधांवर सातत्याने क्षेपणास्त्रे आणि स्फोटक ड्रोन्सद्वारे हल्ले केले जात आहेत, ज्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी सौदीसाठीची उड्डाणे रद्द केली आहेत किंवा त्यांचे मार्ग बदलले आहेत.

#TravelUpdate: October 23, 2026 | 21:00 IST In view of the prevailing security situation in the Kingdom of Saudi Arabia and following a careful assessment of the safety environment, Akasa Air has extended the suspension of flights to and from the following destinations: • Jeddah: Until and including November 10, 2026
• Riyadh: Until and including November 30, 2026
We continue to closely monitor developments and assess the situation in real time. Passengers affected by these cancellations may opt for a full refund, which will be credited to the original source of payment within seven days, or reschedule their travel at no additional cost. Passengers who have booked through travel partners are requested to contact them directly for assistance. The safety and well-being of our passengers and crew remain our highest priority. — Akasa Air (@AkasaAir) October 23, 2026

credit – social media and Twitter

टूर ऑपरेटर्ससोबत सतत समन्वय

या सर्व भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियामध्ये उपस्थित असलेल्या लाखो भारतीय नागरिकांच्या आणि उमराह यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकार पूर्णपणे सतर्क झाले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, सौदीतील भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी इतर विमान कंपन्या आणि टूर ऑपरेटर्ससोबत सतत समन्वय साधत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Alberta Referendum: कॅनडाचे 2 तुकडे होण्यापासून टळले; भारतीय मतदारांच्या ‘या’ एका निर्णयामुळे इतिहासाला कलाटणी

शासकीय आकडेवारीनुसार,

शासकीय आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांत जवळपास ३,००० हून अधिक अडकलेले उमराह यात्रेकरू विशेष आणि उपलब्ध कमर्शियल विमानांद्वारे भारतात यशस्वीरीत्या परतले आहेत. याशिवाय आणखी १०,००० हून अधिक भारतीय नागरिकांना टप्प्याटप्प्याने परत आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रियाध आणि जेद्दाह येथील भारतीय दूतावासांनी २४ तास (24×7) कार्यरत राहणारे नियंत्रण कक्ष (Control Rooms) सुरू केले असून भारतीय नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सौदी अरेबियात सध्या २७ लाखांहून अधिक भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत, ज्यामुळे भारत सरकार तेथील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच, सौदी सरकारने लागू केलेल्या स्थानिक कायद्यांनुसार, हल्ल्यांच्या किंवा क्षेपणास्त्रे रोखल्याच्या (Interceptions) घटनांचे व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर न करण्याचा इशाराही भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना दिला आहे. येत्या दिवसांत परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच उड्डाण सेवा पूर्ववत केली जाईल, असे संकेत विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिले आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आकाशा एअरने सौदी अरेबियासाठीची उड्डाणे का रद्द केली आहेत?

    Ans: मध्य पूर्वेतील बिघडत चाललेली सुरक्षा परिस्थिती आणि सौदी अरेबियातील विमानतळांवर व पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हुथी गटाच्या हल्ल्यांमुळे सुरक्षेचा उपाय म्हणून उड्डाणे रद्द केली आहेत.

  • Que: जेद्दाह आणि रियाधसाठी आकाशा एअरची उड्डाणे कधीपर्यंत स्थगित राहतील?

    Ans: आकाशा एअरची जेद्दाहसाठीची उड्डाणे १० नोव्हेंबरपर्यंत आणि रियाधसाठीची उड्डाणे ३० नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत.

  • Que: उड्डाण रद्द झाल्यामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना रिफंड कसा मिळेल?

    Ans: प्रभावित प्रवासी ७ दिवसांच्या आत त्यांच्या मूळ पेमेंट खात्यात १००% पूर्ण परतावा (Full Refund) मिळवू शकतात किंवा कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय नवीन बुकिंग करू शकतात.

Web Title: Akasa air extends saudi arabia flight suspension riyadh jeddah hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • Airlines
  • Middle East War Impact
  • World news

संबंधित बातम्या

Sea Buckthorn: 28 हजार रुपये प्रति लिटर तेल! लडाखच्या ‘या’ सोन्यासारख्या फळामागे का लागल्यात मोठ्या कंपन्या?
1

Sea Buckthorn: 28 हजार रुपये प्रति लिटर तेल! लडाखच्या ‘या’ सोन्यासारख्या फळामागे का लागल्यात मोठ्या कंपन्या?

Saudi Arabia : ईश्वरनिंदेचा आरोप अन् थेट फाशीची शिक्षा; जाणून घ्या श्रीलंकेने तरीही कसा वाचवला नागरिकाचा जीव?
2

Saudi Arabia : ईश्वरनिंदेचा आरोप अन् थेट फाशीची शिक्षा; जाणून घ्या श्रीलंकेने तरीही कसा वाचवला नागरिकाचा जीव?

Chernobyl : माणूस गेला अन् घोडे जगले! चेर्नोबिलच्या रेडिएशन क्षेत्रात 31 घोड्यांचा झाला भयानक प्रयोग; आजचे वास्तव काय?
3

Chernobyl : माणूस गेला अन् घोडे जगले! चेर्नोबिलच्या रेडिएशन क्षेत्रात 31 घोड्यांचा झाला भयानक प्रयोग; आजचे वास्तव काय?

Alberta Referendum: कॅनडाचे 2 तुकडे होण्यापासून टळले; भारतीय मतदारांच्या ‘या’ एका निर्णयामुळे इतिहासाला कलाटणी
4

Alberta Referendum: कॅनडाचे 2 तुकडे होण्यापासून टळले; भारतीय मतदारांच्या ‘या’ एका निर्णयामुळे इतिहासाला कलाटणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.