
फोटो सौजन्य सोशल मीडिया
आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर सर्वोच्च नेता झालेला मोजताबा हा अजून जास्तच अमेरिकेसाठी धोकादायक असल्याचे राजकीय जाणकार सांगतात . अशातच मोजताबा हा सार्वजनिक ठिकाणी खूप कमी दिसत असतो . काहींच्या मते या युद्धात झालेल्या एका हल्ल्यात तो चांगलाच जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे देखील बोलले गेले आहे . परंतु इराण सरकारने वारंवार हे सगळे दावे खोडून काढले आहेत .
मध्य पूर्वेत उजाड प्रदेशात जेव्हा पासून तेलाचे साठे सापडले आहेत तेव्हापासून बऱ्याच द मध्य पूर्वेत अशांतीच जास्त पहायला मिळाली आहे . अर्थात याला बऱ्याच गोष्टी आणि राजकारण कारणीभूत आहे . अमेरिकेने डॉलरला आधी सोने या वस्तूशी कनेक्ट केले होते ,तोपर्यंत मध्य पूर्वेत संघर्ष जास्त न्हवता पण जेव्हा अमेरिकेला काळानुसार सोने हे टिकणारे नसून जागतिक राजकारणात तेलाला पर्याय नसल्याचे कळून आल्यावर अमेरिकेने डॉलरला तेलाशी जोडले आणि सुरु झाला मध्यपूर्वेतील पेट्रो डॉलरचा खेळ .
तेव्हा आखाती अरबी देशांचे इराणसोबत कैक मुद्द्यांवर भांडण असताना त्यांनी इराणपासून स्वतःला संरक्षित ठेवण्यासाठी आपल्या जागा अमेरिकी सैन्याला दिल्या आणि थेट अमेरिका आणि इराण समोरासमोर आले .
Breaking News : इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव
या युद्धात ज्या ज्या देशांनी अमेरिकेला इराणवर हल्ला करण्यासाठी आपली जमीन वापरू दिली त्या त्या देशांवर इराणने जोरदार हल्ले केले . अमेरिकेच्या सैन्याची पळापळी झाली . इतकंच न्हवे तर अमेरिकेचे सैनिक आपला तळ सोडून इतर भागात , हॉटेलात राहू लागले तेव्हा अगदी त्याच जाग्यांवर हल्ले करत इराणने अमेरिकेची आणि त्याला जागा देणाऱ्या देशाची पाचावर धारण बसवली .
तेव्हा मध्य पूर्वेत अमेरिका आपले संरक्षण करेल ही संकल्पना मोडीत निघायला सुरवात झाली आणि त्यांनी दबक्या आवाजात इराणसोबत डील करण्याची भाषा सुरु केली . म्हणून मोजताबा यांनी मध्य पूर्वेतील देश आता अमेरिकन तळांसाठी ढाल म्हणून काम करणार नाहीत ,असा इशारा दिला .
Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी
मुळात खामेनाई यांच्या मते , पर्शियन आखातातील अमेरिकन सैन्याची उपस्थिती ही प्रादेशिक अस्थिरतेचे प्रमुख कारण आहे . त्यांनी भविष्यात या भागात अमेरिकेला जास्त ढवळाढवळ करून देण्यास मनाई करण्याचे सांगितले आहे . त्यांच्या मते इराण हा किंवा मध्यपूर्वेतील सगळेच देश हे सार्वभौम आहेत . त्यांना अमेरिकेच्या सल्ल्याची किंवा कसल्याच गोष्टीची गरज नाही .
होर्मूझच्या सामुद्रधुनीबाबत इराणने आपली भूमिका कठोर ठेवली आहे . खामेनाई यांनी आखातातील परकीय लष्करी उपस्थितीला आव्हान देताना प्रादेशिक म्हणजे मध्य पूर्वेतील देशांनी अमेरिकेला आणि इस्रायलला बाजूला ठेवून आपली एकजूट होवून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे .