
Iran President hit Back on Trump's 48 hours Altimatum
US Iran War : अमेरिकेला कोटींचा फटका! इराणने पाडले सर्वात शक्तिशाली F-15 फायटर जेट; पहा थरारक VIDEO
ट्रम्प यांनी इराणला ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ हा सागरी मार्ग खुला करण्यास सांगितले आहे. यासाठी त्यांनी इराणला ४८ तासांचा वेळ दिला आहे. जागतिक तेल पुरवठ्यात होणारी अडचण आणि वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर इराणला कडक इशारा दिला होता. त्यांनी म्हटले होते की, “इराणने पुढील दोन दिवसांत कोणताही अटीशिवाय हा सागरी मार्ग पूर्णपणे खुला करावा, असे न केल्यास अमेरिकन सैन्य इराणच्या वीज प्रकल्पांना उद्ध्वस्त करेल,” असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला होता.
The illusion of erasing Iran from the map shows desperation against the will of a history-making nation. Threats and terror only strengthen our unity. The Strait of Hormuz is open to all except those who violate our soil. We firmly confront delirious threats on the battlefield. — Masoud Pezeshkian (@drpezeshkian) March 22, 2026
दरम्यान ट्रम्प यांच्या धमकीवर प्रत्युत्तर देताना इराण(Iran) चे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी, इराण कोणत्याही ‘वेड्या’ धमकीसमोर झुकणार नाही असे म्हटले. त्यांनी म्हटले की, “अमेरिका इराणला नकाशावरुन पुसून टाकण्याचे केवळ स्वप्न पाहू शकतो. अशा धमक्यांमुळे आम्ही कमकुवत होत नाही, तर याऐवजी आमचा संकल्प अधिक दृढ होत आहे.”
“आम्ही आमच्या देशाचे, सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास युद्धभूमीवर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहोत, असे त्यांनी ठणकावून सांगितले.” पेझेश्कियान यांनी हेही स्पष्ट केले की, “इराणच्या मित्र राष्ट्रांसाठी, त्यांच्या सार्वभौमत्वाचा आदर करणाऱ्या देशांसाठी होर्मुझचा मार्ग खुला आहे. परंतु शत्रू राष्ट्रांसाठी हा मार्ग कायम बंद राहील.”
होर्मुझ हा जगाली सर्वात महत्त्वाचा उर्जा व्यापार मार्ग आहे. या मार्गावरुन जहातील एकूण तेल आणि वायू वाहतूकीपौकी २०% व्यापार होता. हा मार्ग भौगोलिकरित्या इराणच्या नियंत्रणाखाली येतो.
सध्या इराणमध्ये मोठे ब्लॅकआउट होण्याची शक्यता आहे. इराणच्या उर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला होण्याची भिती वर्तवण्यात आली असून. मोठे वीज संकट येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील ४८ तासांसाठी पाण्याचा साठा, मोबाईल फोन, बॅटरी चार्जिंग करुन ठेवण्यास सांगितले आहे.
Ans: ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांत होर्मुझचा मार्ग उघडण्यास सांगितले आहे. असे न केल्यास इराणच्या वीज प्रकल्पांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.
Ans: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियाना यांनी ते अशा कोणत्याही वेड्या धमक्यांना घाबरत नाहीत असे म्हटले. तसेच त्यांनी इराण आपल्या सार्वभौमत्त्वाचे रक्षण करण्यास सज्ज असल्याचेही म्हटले.
Ans: होर्मुज समुद्री मार्ग हा जगातील सर्वात महत्त्वाच्या उर्जा व्यापार मार्गांपैकी आहे. या मार्गावरुन जगाच्या एकूण २० ते ३०% तेल आणि गॅस वाहतूक होते.