US Iran War : अमेरिकेला कोटींचा फटका! इराणने पाडले सर्वात शक्तिशाली F-15 फायचर जेट; पहा थरारक VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गेल्या २२-२३ दिवसांपासून सुरु असलेल्या अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धात अमेरिकेला मोठी किंमत मोजावी लागत आहे. या अल्प कालावधीत अमेरिका-इस्रायलची २८ पेक्षा जास्त महागडी विमाने आणि यंत्रणांचे नुकसान झाले आहे. इराणने आतापर्यंत किमान १७ अमेरिकी-इस्रायली विमाने पाडल्याचा किंवा त्याला गंभीर उद्ध्वस्क केल्याचा दावा केला आहे. यामध्ये अमेरिकेची १६ विमाने आहेत. यामध्ये 12 MQ-9 रीपर ड्रोन्सचा समावेश आहे. एका ड्रोनची किंमत सुमारे ५६.५ दशलक्ष आहे. यामुळे अमेरिकेचे जवळपास ५०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ४००० कोटींचे नुकसान झाली आहे.
याशिवाय इराणने अमेरिकेच्या अत्याधुनिक मिसाइल डिफेन्स सिस्टमलाही लक्ष्य केले होते. जॉर्डन, यूएई आणि सौदी अरेबियामध्ये तैनात असलेल्या अमेरिकन THAAD सिस्टमच्या AN/TPY-2 रडारलाही निकामी करण्यात आले आहे. या रडारची किंमच ३०० ते ५०० दशलक्ष डॉलर्स आहे. कतारमधील १.१ अब्ज डॉलर्सच्या AN/FPS-132 रडारचेही नुकसानीचा दावा इराणने केला आहे.
याशिवाय अमेरिकन नौदलाची शक्ती मानल्या जाणाऱ्या ‘USS जेराल्ड आर फोर्ड’ या विमानवाहू युद्धनौकेवर आग लागल्याची वृत्त आहे. ही आग विझवण्यासाठी ३० तासांचा कालावधी गेला होता. आर्थिक दृष्ट्याही अमेरिकेला युद्ध महागात पडले आहे. गेल्या तीन आठवड्यात ११ ते १२ अब्ज डॉलर्सहून अधिक खर्ज झाले आहेत. इराणने १९ मार्च रोजी F-35 स्टील्थ फायटर जेटला पाडल्याचाही दावा केला होता.
#BREAKING
An enemy’s F-15 fighter jet was shot down by Iranian air defense systems near Hormuz Island after being intercepted over the country’s southern coast. pic.twitter.com/jmrFuUQKbd — Tehran Times (@TehranTimes79) March 22, 2026






