Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्त्रायलचे गाझावरील हल्ले तीव्र; हल्ल्यात 14 ठार, नागरिकांना घरे खाली करण्याचे आदेश

इस्त्रायलने उत्तरी गाझामध्ये पुन्हा एकदा तीव्र हल्ले केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये 14 जण ठार झाले आहेत. तसेच गाझातील नागरिकांना इस्त्रायलने घरे रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 03, 2024 | 07:20 PM
इस्त्रायलचे गाझावरील हल्ले तीव्र; हल्ल्यात 14 ठार, नागरिकांना घरे खाली करण्याचे आदेश

इस्त्रायलचे गाझावरील हल्ले तीव्र; हल्ल्यात 14 ठार, नागरिकांना घरे खाली करण्याचे आदेश

Follow Us
Follow Us:

उत्तरी गाझा: इस्त्रायलने उत्तरी गाझामध्ये पुन्हा एकदा तीव्र हल्ले केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये 14 जण ठार झाले आहेत. तसेच गाझातील नागरिकांना इस्त्रायलने घरे रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. इस्त्रायलने गाझाच्या उत्तरी भागांतील बीट लाहिया शहरावर हल्ले केले आहेत. या हल्ल्यात अनेक पॅलेस्टिनी नागरिक मृत्यूमुखी पडले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्या या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शरणार्थी छावण्यांवर हल्ले

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जबालिया शरणार्थी छावणीवर देखील हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. ऑक्टोबरपासून इस्रायली सैन्य जबालिया, बेत लाहिया आणि बेत हनून या शहरांमध्ये मोहीम राबवत आहे.

इस्रायली सैन्याच्या माहितीनुसार, या मोहिमेत आतापर्यंत शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.इस्त्रायल सैन्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी नागरिकांच्या आड लपणाऱ्या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी हे हल्ले केले आहेत. तर दुसरीकडे हमास आणि इस्लामिक दहशतवादी गटांच्या म्हणण्यानुसार त्यांनी अनेक इस्त्रायली सैन्याचा याचदरम्यान खात्मा केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारत-चीनमधील संबंधांमध्ये थोडी सुधारणा; LAC करारावर अजूनही वाद- एस. जयशंकर

पॅलेस्टिनींचा इस्त्रायलवर आरोप

पॅलेस्टिनी लोकांचा आरोप आहे की इस्रायल त्यांना जबरदस्तीने घरातून लोकांनी बाहेर काढून उत्तरेकडील भागात ‘बफर झोन’तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. इस्रायली सैन्याने मात्र हे आरोप फेटाळून लावत म्हटले आहे की, त्यांचा उद्देश हमासच्या लढवय्यांना पुन्हा एकत्र येण्यापासून रोखणे असल्याचे लष्कराने म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जबलिया बीट लाहिया आणि बीट हानौनमधील हल्ले इंधन कमरतेमुळे थांबवण्यात आले होते.

फोटो सौजन्य: Shutterstock

मात्र, इस्त्रायलने आता पुन्हा  मध्य आणि दक्षिण गाझा पट्टीतील हल्ले सुरू केले आहेत. इस्त्रायली सैन्याने म्हटले आहे की, हल्ला करण्यापूर्वी त्यांनी दक्षिणेकडील युनिस शहराच्या रहिवाशांना बाहेर काढण्याचे आदेश दिले आहे. तसेच या भागांत अतिरेक्यांनी रॉकेट हल्ले केला असल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे.

गाझा पट्टी उद्ध्वस्त

संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, इस्त्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझा उत्तरी भाग सुरक्षित नाही. गाझाच्या 2.3 दशलक्ष लोकांपैकी बहुतेक लोक विस्थापित झाले आहे. गेल्या वर्षभरात सुरू असलेल्या संघर्षामुळे गाझा पट्टी उद्ध्वस्त झाली आहे. इस्रायली सैन्य कारवाईत 44,400 हून अधिक पॅलेस्टिनी मरण पावले आहेत, तर अनेक इमारती मलब्यात रूपांतरित झाल्या आहेत. या गंभीर परिस्थितीत मानवीय मदतीची नितांत आवश्यकता आहे, मात्र युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘भारत एक प्रयोगशाळा…’, बिल गेट्स यांचे वादग्रस्त विधान; सोशल मीडियावर टिकांचा भडिमार

Web Title: Middle east war israel attacked on gaza nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 07:20 PM

Topics:  

  • Gaza
  • Hamas
  • Israel

संबंधित बातम्या

US Saudi Deal: इराणला रोखण्यासाठी अमेरिकेची सौदीच्या खांद्यावर बंदूक; युरेनियम संवर्धन सूट आणि ‘हा’ करार ठरणार गेमचेंजर
1

US Saudi Deal: इराणला रोखण्यासाठी अमेरिकेची सौदीच्या खांद्यावर बंदूक; युरेनियम संवर्धन सूट आणि ‘हा’ करार ठरणार गेमचेंजर

No Recognition To Israel: इस्रायलला मान्यता नाही; इस्रायली नागरिक सापडल्यास हद्दपार करू : मलेशियाचे पंतप्रधान
2

No Recognition To Israel: इस्रायलला मान्यता नाही; इस्रायली नागरिक सापडल्यास हद्दपार करू : मलेशियाचे पंतप्रधान

Khalil Al Hayya: याह्या सिनवारनंतर खलील अल-हय्याकडे हमासची कमान; अंतर्गत निवडणुकीत खालेद मशालचा पराभव
3

Khalil Al Hayya: याह्या सिनवारनंतर खलील अल-हय्याकडे हमासची कमान; अंतर्गत निवडणुकीत खालेद मशालचा पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.