
Israel Soldier spying for Iran
आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेतील २६ वर्षीय रिझर्व्ह सैनिक राज कोहेन याला इराणसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान राज कोहोन हा इस्रायलची सर्वात शक्तिशाली हवाई संरक्षण यंत्रणा Iron Dome युनिटमध्ये कार्यरत होता. तो गेल्या अनेक महिन्यांपासून इराणच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता.
त्याने इस्रायलच्या अनेक लष्करी मोहिमांचा आणि अतिशय गुप्त आणि संवदेनशील माहिती इराणला पुरवली असल्याचे समोर आले आहे. यासाठी त्याला पैसेही देण्यात आला असल्याचा दावा केला जत आहे. तसेच त्याला तो इराण(Iran) साठी गुप्तहेरीचे काम करत असल्याचेही माहिती होते. इराणविरोधात लष्करी मोहिम सुरु करण्याच्या अवघ्या एक दिवस आधीच त्याला अटक करण्यात आली होती.सध्या या माहितीमुळे जगभरात खळबळ उडाली असून इस्रायलसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.
याच वेळी इस्रायलला आणखी एक मोठा झटका मिळाला आहे. एकीकडे इस्रायलने इराणी गुप्तहेराला अटक केली असताना इराणनेही इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसादाच्या एजंटला फाशीवर चढवले आहे. अली अर्देस्तानी असे या एजंटचे नाव होते.अर्देस्तानी इराणमधील मोसादचा मु्ख्य हेर असल्याचा दावा इराणने केला आहे.
जून २०२५ मध्ये झालेल्या १२ दिवसांच्या भीषण संघर्षानंतर पुन्हा एकदा हे युद्ध सुरु झाले आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायल(Israel)-अमेरिकेने संयुक्तपण इराणविरोधात लष्करी मोहिम सुरु केली होती. हे दोन्ही देश केवळ युद्धाच्या मैदानावरच नाही तर एकमेकांच्या लष्करी आणि तांत्रिक यंत्रणेत ही शिरकाव करत आहे. सध्या या युद्धामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचा वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही बाजूंनी सातत्याने हल्ले होत आहेत.
यामध्ये इराणचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनेईंपासून ते अली लारीजानी यांच्यापर्यंत अनेक वरिष्ठ लष्करी, सरकारी अधिकारी ठार झाले आहेत. यामुळे इराण अधिक आक्रमक झाला आहे.
Ans: इस्रायलच्या Iron Dome हवाई संरक्षण युनिटमध्ये काम करणाऱ्या राज कोहेन नावाच्या सैनिकावर इराणसाठी हेरगिरीचा आरोप आहे. त्याने इराणला आयरन डोमची गुपिते पैशासाठी विकल्याच्या आरोपाखाली अटकही करण्यात आली आहे.
Ans: इराणने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या एजंट अली अर्देस्तानी नावाच्या व्यक्तीला इराणवर जासूसी केल्याच्या आरोपाखाली फाशी दिली आहे.