Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : आता चर्चा नाही, फक्त…; ट्रम्प यांचा युद्धविरामाला नकार, तर इराणचाही होर्मुझ बंद ठेवण्याचा इशारा 

Middle East War : मध्यपूर्वेत सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय समुदाय इराण आणि अमेरिकेला शांतता चर्चेचा सल्ला देत आहे. परंतु दोन्ही देशांनी युद्धविरामासाठी नकार दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 15, 2026 | 09:58 AM
Middle East War Escalates Trump And Iran Reject Ceasefire Talks

Middle East War Escalates Trump And Iran Reject Ceasefire Talks

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा युद्धविराम चर्चेला नकार
  • इराणने घेतला आक्रमक पवित्रा
  • मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी बिघडणार
US Iran War News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेतील संघर्षाने आता भीषण रुप धारण केले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून अमेरिका आणि इराण मध्ये सातत्याने हल्ले सुरु आहेत. हे युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचे प्रयत्न सुरु आहे. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी युद्धविरामास नकार दिला आहे. दुसरीकडे इराणनेही माघार घेणार नाही असे म्हटले आहे.

US-Iran War : अमेरिका-इस्रायलच्या डोळ्यांत फेकली धूळ! इराणने हिंद महासागरातून नौसैनिकांना ‘असं’ उडवून नेलं, भारताची गुप्त मदत?

मिळालेल्या माहितीनुसार, ओमान, इजिप्त या देशांनी अमेरिका इराणसमोर युद्धविरामाचा प्रस्ताव मांडला होता. मात्र ट्रम्प यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, चर्चेची वेळ निघून गेली असून आता केवळ लष्करी कारवाईचा पर्याय उरलेला आहे. दुसरीकडे इराणने आक्रमक पवित्रा घेतला असून जोपर्यंत त्यांच्यावरील हल्ले थांबत नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही असे म्हटले आहे.

खर्ग बेटावर हल्ला

अमेरका-इस्रायल (Israel)ने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरोधात ऑपरेशन एपिक फ्यूरी सुरु केले होते. या लष्करी मोहिमेअंतर्गत मोहिमेअंतर्गतच शुक्रवारी (१३ मार्च २०२६) रात्री अमेरिकने इराणचे सर्वात महत्त्वाचे तेल निर्यात केंद्र असलेल्या ‘खार्ग बेटावर’ मोठा हल्ला केला. इराणच्या आर्थिक व्यवस्थेची नस दाबण्याचा याचा उद्देश होता असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जागतिक परिणाम

अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणने तीव्र संताप व्यक्त केला. सध्या अनेक इस्रायली गॅस वाहू जहाजे आणि अमेरिकन तेल टँकर्स या खाडीत अडकले आहे. इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे जागतिक बाजारात खळबळ उडाली असून कच्चा तेलाच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. यामुळे सर्वसामान्यांनाच्या दैनंदिन जीवनावर महागाईचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोठी जीवितहानी

या युद्धाचा आज १६ वा दिवस असून गेल्या दोन आठवड्यात यामध्ये २,००० हून अधिक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. यामध्ये इराण(Iran) नागरिकांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. इराणमध्ये रहिवासी भागांवर झालेल्या हल्ल्यांमुळे मोठे मानवी संकट उभे राहिले आहे. हजारो लोक जखमी असून त्यांच्यावर उपाचारासाठी रुग्णालयांमध्ये पुरेशी औषधे आणि सुविधा उपलब्ध नाहीत.

इराणच्या अटी

याच वेळी इराणनेयुद्धबंदीसाठी तीन अटी ठेवल्या आहेत. इराणने अमेरिकन हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि भविष्यात हल्ले न करण्याची कायमस्वरूपी लेखी हमी मागितली आहे. परंतु अमेरिकेने यासाठी नकार दिला असून संघर्ष असाच सुरु राहिला तर भीषण संकट येण्याची शक्यता आहे. सध्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देश कूटनीतिक मार्ग शोधत आहेत.

मोठी बातमी ! युद्धातून आता ‘या’ देशाची माघार; इस्त्रायलसोबत शांतीपूर्ण चर्चेसाठी तयार

💡

Frequently Asked Questions

  • Que: मध्यपूर्वेतील युद्धविरामाच्या चर्चेला कोणी नकार दिला?

    Ans: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील युद्धविरामासाठी शांतता चर्चांना नकार दिला आहे, तर इराणनेही हल्ले थांबेपर्यंत कोणतीही चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

  • Que: होर्मुझ खाडी बंद झाल्यास काय होईल?

    Ans: स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा जगातील सर्वात महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे. जगातील सुमारे २०-३० टक्के कच्चा तेलाची वाहतूक या मार्गावरुन होते. यामुळे हा मार्ग बंद झाल्यास जागतिक बाजारपेठेवर परिणाम होईल.

  • Que: अमेरिका-इराण संघर्षामुळे आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला आहे?

    Ans: या युद्धात आतापर्यंत २००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी बहुतेक नागरिक इराण मधील असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Middle east war trump rejects ceasefire talks and iran threatens to close hormuz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.