US-Iran War : अमेरिका-इस्रायलच्या डोळ्यांत फेकली धूळ! इराणने हिंद महासागरातून नौसैनिकांना ‘असा’ उडवून नेलं, भारताची गुप्त मदत? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराणची युद्धनौका IRIS Dena वर ०४ मार्च २०२६ रोजी श्रीलंकेच्या गाले किनारपट्टीजवळ अमेरिकेने अण्वस्त्राने सज्ज पाणबुडीच्या टॉर्पिडोने हल्ला केलाहोता. या हल्ल्यात इराणचे ८६ सैनिक मारले गेले होते. यानंतर इराणच्या दुसऱ्या दोन जहाजांना IRIS Lavan आणि IRIS Bushehr ने तांत्रिक बिघाडामुळे कोची बंदरात आश्रय घेतला होता. या जहाजांवर एकूण २६७ नाविक होते.
दरम्यान IRIS Dena वरील हल्ल्याचा इराणने तीव्र निषेध केला असून याचा बदला घेतला जाईल असेही म्हटले आहे. सध्या इराणने होर्मुझची खाडी बंद केली आहे. या खाडीत अमेरिका-इस्रायलची अनेक तेल-गॅस वाहून नेणारी जहाजे अडकली आहे. हा तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.






