Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mojtaba Khamenei: तेहरानचा नवा हुकमी एक्का! ‘राष्ट्राध्यक्ष, IRGC ते गुप्तचर यंत्रणा, इराण नवीन सर्वोच्च नेत्याच्या मागे एकवटला

Mojtaba Khamenei: इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणच्या सर्वोच्च नेत्याला लक्ष्य करण्याच्या धमक्या आणि तेहरानला अस्थिर करण्याच्या प्रयत्नांमध्ये, देशातील सर्व संस्था मोज्तबा खामेनी यांच्या मागे एकजूट असल्याचे दिसून येते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 09, 2026 | 01:02 PM
mojtaba khamenei named new iranian supreme leader after ali khamenei marathi news

mojtaba khamenei named new iranian supreme leader after ali khamenei marathi news

Follow Us
Follow Us:
  • नवे पर्व सुरू
  • शत्रूला प्रत्युत्तर
  • कट्टरपंथी नेतृत्व

Mojtaba Khamenei Supreme Leader : मध्यपूर्वेतील (US-Israel Iran War) राजकारण आता एका ऐतिहासिक वळणावर येऊन पोहोचले आहे. इराणचे प्रदीर्घ काळ नेतृत्व करणारे अली खामेनी यांच्या हत्येनंतर (२८ फेब्रुवारी २०२६), इराणच्या ‘असेम्बली ऑफ एक्सपर्ट्स’ने त्यांचे ५६ वर्षीय पुत्र मोज्तबा खामेनी (Mojtaba Khamenei Supreme Leader) यांची नवीन सर्वोच्च नेते म्हणून निवड केली आहे. ही निवड केवळ सत्तापालट नसून, अमेरिका आणि इस्रायलसारख्या शत्रू राष्ट्रांना इराणने दिलेला एकतेचा ‘मशाल’ संदेश आहे.

सर्व संस्थांचे एकच लक्ष्य: मोज्तबा खामेनी

इस्रायल आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करण्याच्या आणि नवीन नेत्याला लक्ष्य करण्याच्या धमक्या दिल्या होत्या. मात्र, या धमक्यांचा परिणाम होण्याऐवजी इराणमधील सर्व शक्तिशाली गट अधिक जवळ आले आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष, संसद सभापती, गुप्तचर मंत्रालय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) यांनी मोज्तबा यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. इराणच्या सुरक्षिततेसाठी ही एकता सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: आकाशात अग्निकहर! इराणच्या ड्रोन आर्मीला युएईने एका झटक्यात केलं उध्वस्त; पाहा ‘तो’ 40 सेकंदांचा थरारक VIDEO

मोज्तबा खामेनी: पडद्यामागचा ‘किंगमेकर’ आता समोर!

मोज्तबा खामेनी हे आतापर्यंत लोकांच्या नजरेपासून दूर राहिले होते. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वडिलांचे (अली खामेनी) कार्यालय आणि देशाचे महत्त्वाचे निर्णय पडद्यामागून हाताळले आहेत. ५६ वर्षीय मोज्तबा यांना लष्करी अनुभवही आहे; त्यांनी इराक-इराण युद्धादरम्यान सैन्यात सेवा बजावली होती. धर्मगुरूंमध्ये त्यांचे वजन मोठे असल्याने आणि IRGC ची त्यांना पसंती असल्याने त्यांची निवड सुलभ झाली.

Witnesses have filmed a suspected Iranian missile barrage in the skies south of Tel Aviv. It’s believed to be Iran’s first attack on Israel since the election of the new supreme leader, Mojtaba Khamenei. pic.twitter.com/YXMI5UtloO — Al Jazeera English (@AJEnglish) March 9, 2026

credit – social media and Twitter

वैयक्तिक आघात आणि संघर्षाची धार

मोज्तबा खामेनी यांचे नेतृत्व आता अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचे कारण असे की, २८ फेब्रुवारीला झालेल्या भीषण हल्ल्यात केवळ त्यांचे वडीलच नाही, तर त्यांची पत्नी झहरा आणि कुटुंबातील इतर सदस्यही मारले गेले आहेत. या वैयक्तिक आघातामुळे मोज्तबा यांची भूमिका अमेरिका आणि इस्रायलविरोधात अधिक टोकाची असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: युद्धाच्या गदारोळात अमेरिकेची संसाधन शिकार! इराण युद्धामागे फक्त ‘डर्टी पॉलिटिक्स’; ट्रम्प यांच्या सहकाऱ्याची कबुली

जग काय म्हणते? (जागतिक पडसाद)

अल जझीरासह अनेक आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी ही निवड इराणच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे म्हटले आहे. मोज्तबा यांच्या निवडीमुळे इराणमध्ये ‘वंशपरंपरागत’ राजवट सुरू झाल्याची टीका परदेशातून होत असली तरी, तेहरानमधील राजवट ही एका व्यक्तीवर नाही तर एका विचारधारेवर आधारित आहे, हे इराणने सिद्ध केले आहे. मोज्तबा लवकरच राष्ट्राला संबोधित करण्याची शक्यता आहे, ज्याकडे संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मोज्तबा खामेनी कोण आहेत?

    Ans: मोज्तबा हे इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे दुसरे चिरंजीव असून ते आता देशाचे तिसरे सर्वोच्च नेते (Supreme Leader) बनले आहेत.

  • Que: इराणचे नवीन नेते मोज्तबा यांच्यासमोर कोणते आव्हान आहे?

    Ans: सध्याचे इस्रायल-अमेरिका युद्ध, अंतर्गत सुरक्षा आणि देशाची आर्थिक घडी बसवणे ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने आहेत.

  • Que: 'असेम्बली ऑफ एक्सपर्ट्स' म्हणजे काय?

    Ans: ही ८८ धर्मगुरूंची एक परिषद आहे, जी इराणच्या सर्वोच्च नेत्याची निवड आणि त्यांच्या कामावर देखरेख करण्याचे अधिकार ठेवते.

Web Title: Mojtaba khamenei named new iranian supreme leader after ali khamenei marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • iran
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश
1

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश

Ramon Crater: दिलासादायक! इराणकडून भेट मिळालेल्या 11 गाढवांनी इस्रायलच्या वाळवंटात फुलवले मरुद्यान; जगासाठी ठरले आश्चर्य
2

Ramon Crater: दिलासादायक! इराणकडून भेट मिळालेल्या 11 गाढवांनी इस्रायलच्या वाळवंटात फुलवले मरुद्यान; जगासाठी ठरले आश्चर्य

BRICS Summit 2026: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान भारतात दाखल; युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाला विशेष सुरक्षा कवच
3

BRICS Summit 2026: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान भारतात दाखल; युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाला विशेष सुरक्षा कवच

Iran Sanctions : इराणच्या अणुकार्यक्रमाला ब्रिटनचा ‘ब्रेक’; कठोर निर्बंधांचा कायदा जाहीर !
4

Iran Sanctions : इराणच्या अणुकार्यक्रमाला ब्रिटनचा ‘ब्रेक’; कठोर निर्बंधांचा कायदा जाहीर !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.