More than 10 injured as train coaches derail in Pakistan
Pakistan Train Accident news : इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan) एक भीषण रेल्वे (Train Accident) दुर्घटना घडली आहे. पाकिस्तानच्या लाहोरजवळ इस्लामाबाद एक्सप्रेस ट्रेनचे डब्बे पटरीवरुन घसरले आहेत. या अपघातात ३० प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून मत कार्य सुरु करण्यात आले आहे.
पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१ ऑगस्ट) लाहोरजवळ शेखुपुरा जिल्ह्यातील काला शाह काकू भागात हा अपघाता घडला. इस्लामाबाद एक्सप्रेसचे १० हून अधिक डब्बे अचानक रुळावरुन घसरली. इस्लामाबाद एक्सप्रेस लाहोरहून रावळपिंडीला निघाली होती. या दपम्याम शुक्रवारी (१ ऑगस्ट) संध्याकाळच्या सुमाराहा लाहोरुपासून ५० किमी अंतरावर ही दुर्घटना घडली.
Nimisha Priya : निमिषा प्रियाची येमेनमध्ये फाशीची शिक्षा रद्द झाली का? सरकारने सांगितले सत्य
पाकिस्तानच्या रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या बचाव कार्य सुरु आहे. बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच रेल्वेलच्या डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे कार्य सुरु आहे.
रेल्वे प्रशानाने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप या अपघातात कोणाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली नाही. रेल्वे स्टेशनववरुन निघाल्यानंतर अर्ध्या तासाने हा अपघाता घडला.
सध्या या अपघाताचे कारण अस्पष्ट आहे. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री मुहम्मद हनीफ अब्बासी यांनी या घटनेवर गंभीर प्रतिक्रिय दिली आहे. त्यांनी संबंधित विभाग अध्यक्षांना परिस्थितीचा आढाव घेऊन तातडीने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सात दिवसांमध्ये चौकशीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
याच वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. या घटनेने पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाला आहे.
यापूर्वी देखील पाकिस्तानमध्ये अशा रेल्वे अपघातांच्या घटना घडल्या आहेत. पाकिस्तानमध्ये जुने रेल्वे ट्रॅक, खराब सिग्नल, देखभालीचा अभाव या समस्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे पाकिस्तानच्या रेल्वे कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. यापूर्वी २०२३ मध्ये सर्वात मोठा अपघात घडला होता. यात ट्रेन रुळावरुन घसरल्याने ३० लोकांचा मृत्यू झाला होता.