Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3: मुज्तबा खामेनींच्या ‘त्या’ 5 निर्णयांनी महासत्तेचे गर्व हरण; अमेरिकेने युद्धात टेकले गुडघे आणि होर्मुझमधूनही माघार

Iran US War: अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर इराण बॅकफूटवर होता. अमेरिका आणि इस्रायलने तर नवीन राजवट स्थापन करण्याची तयारीही केली होती, पण मुज्तबा यांनी डाव पलटवला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 02, 2026 | 12:05 PM
mujtaba khamenei 5 decisions that forced us to retreat from hormuz iran war 2026

mujtaba khamenei 5 decisions that forced us to retreat from hormuz iran war 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • मुज्तबा खामेनींचा ‘मास्टरस्ट्रोक’
  • होर्मुझमधून अमेरिकेची माघार
  • ब्रिटनची युद्धातून एक्झिट

Mujtaba Khamenei Iran Supreme Leader 2026 : २८ फेब्रुवारी २०२६… हा तो दिवस होता जेव्हा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांची हत्या झाली आणि संपूर्ण जगाला वाटले की आता इराणचा अंत निश्चित आहे. अमेरिका आणि इस्रायलने तर तेहरानमध्ये आपली नवीन कठपुतळी राजवट स्थापन करण्याच्या हालचालीही सुरू केल्या होत्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी आत्मविश्वासाने सांगितले होते की, “मी इराणसाठी नवा नेता निवडला आहे.” पण युद्धाच्या ३४ व्या दिवशी इराणने असा काही ‘पलटवार’ केला की, ट्रम्प यांच्या सर्व गणितांचा चक्काचूर झाला. या चमत्कारामागे होते इराणचे नवे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी (Mojtaba Khamenei). वडिलांच्या निधनानंतर अवघ्या १० दिवसांत सूत्रे हाती घेणाऱ्या मुज्तबा यांनी अशा काही ५ रणनीती आखल्या, ज्यांनी अमेरिकेसारख्या महासत्तेला गुडघे टेकवायला भाग पाडले.

१. होर्मुझची नाकेबंदी: जगाची मान इराणच्या हातात!

मुज्तबा खामेनी यांनी सत्तेवर येताच अवघ्या सहा दिवसांत होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पूर्णपणे बंद करण्याचा ऐतिहासिक आणि अत्यंत धाडसी निर्णय घेतला. जून २०२५ मधील युद्धातही इराणने हे पाऊल उचलले नव्हते. पण मुज्तबा यांनी ओळखले की, अमेरिकेची आर्थिक नाडी इंधनावर अवलंबून आहे. होर्मुझ बंद होताच जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती गगनाला भिडल्या. परिणामी, ट्रम्प यांना जाहीर करावे लागले की, “अमेरिकेचा होर्मुझशी संबंध नाही आणि आम्ही तिथे प्रवेश करणार नाही.” ही अमेरिकेची सर्वात मोठी कूटनीतिक हार मानली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Strategy : असे थांबले युद्ध! अमेरिका-इराण युद्धाच्या अर्धवट समाप्तीमागे दडली आहेत ‘ही’ अब्जावधींचे 5 गुपिते, वाचा सविस्तर

२. ‘सायलेंट किलर’ रणनीती: व्हिडिओ नाही, केवळ लेखी आदेश!

आधुनिक युद्धात तंत्रज्ञान हा सर्वात मोठा शत्रू असतो. मुज्तबा यांना ठाऊक होते की, जर त्यांनी व्हिडिओ संदेश जारी केला, तर इस्रायली आणि अमेरिकन गुप्तचर यंत्रणा त्यांचे लोकेशन शोधून काढून त्यांचा ‘खात्मा’ करू शकतात. वडिलांच्या हत्येतून धडा घेत मुज्तबा यांनी स्वतःला पडद्याआड ठेवले. त्यांनी केवळ लेखी आदेशाद्वारे इराणवर नियंत्रण मिळवले. यामुळे शत्रू गोंधळला असून मुज्तबा नेमके कुठे आहेत, हे अद्याप अमेरिकेला कळू शकलेले नाही.

३. सैन्याचे विकेंद्रीकरण: प्रत्येक सैनिक आता एक ‘कमांड’

मुज्तबा यांनी इराणच्या लष्करी रचनेत क्रांतिकारी बदल केला. त्यांनी सैन्याला वेगवेगळ्या लहान तुकड्यांमध्ये विभागले आणि प्रत्येक तुकडीला ‘स्वतंत्र निर्णय’ घेण्याचे अधिकार दिले. आता एखादा हल्ला करण्यासाठी तेहरानच्या आदेशाची वाट पाहण्याची गरज उरली नाही. यामुळे अमेरिकन सैन्याला एका विशिष्ट मुख्यालयावर हल्ला करून इराणला झुकवणे अशक्य झाले आहे. या ‘गुरिल्ला वॉरफेअर’मुळे युद्ध लांबले असून अमेरिकेची डोकेदुखी वाढली आहे.

४. ब्रिटनवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ अन् चागोसचा थरार

युद्धाच्या सुरुवातीला ब्रिटनने अमेरिकेला साथ देण्यासाठी हिंदी महासागरातील ‘चागोस’ बेटांवरील आपले तळ उघडून दिले होते. पण मुज्तबा यांच्या इराणने लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी थेट या तळावर हल्ला केला. ब्रिटनला हे स्पष्ट झाले की, जर त्यांनी अमेरिकेला साथ दिली, तर लंडनवरही इराणी क्षेपणास्त्रे पडू शकतात. या एका हल्ल्याने ब्रिटनला युद्धातून माघार घेण्यास भाग पाडले, ज्यामुळे अमेरिकेचा एक मोठा मित्र राष्ट्र कमी झाला.

५. माहिती युद्ध (Information War): अफवांना चाप!

इराणने आपली दळणवळण प्रणाली इतकी सुव्यवस्थित केली की अमेरिकन आणि इस्रायली ‘प्रोपोगंडा’ (प्रचार) इराणमध्ये टिकू शकला नाही. सर्व दूतावास आणि अधिकृत माध्यमे २४ तास सक्रिय ठेवून मुज्तबा यांनी जगाला इराणची बाजू प्रभावीपणे मांडली. यामुळे इराणमध्ये अंतर्गत बंडाळी घडवून आणण्याचे ट्रम्प यांचे स्वप्न भंगले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Border Tension: ‘ड्रोन तर वाचलं, पण तुमचं काय?’ पाकिस्तानच्या नापाक कृत्यांनंतर भारतीय लष्कराचा संतापजनक इशारा

ट्रम्प यांची निराशा अन् ‘अश्मयुगा’ची धमकी

युद्धाच्या ३४ व्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांचा आवाज बदललेला दिसला. सत्तेत बदल करण्याच्या वल्गना करणारे ट्रम्प आता इराणला ‘पाषाणयुगात’ पाठवण्याच्या धमक्या देऊ लागले आहेत. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी ट्रम्प यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, “ट्रम्प आता युद्धात अडकले आहेत आणि बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग त्यांच्याकडे उरलेला नाही.”

💡

Frequently Asked Questions

  • Que: अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर इराणचे नेतृत्व कोणी स्वीकारले?

    Ans: अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र मुज्तबा खामेनी यांनी इराणचे सर्वोच्च नेते म्हणून पदभार स्वीकारला.

  • Que: मुज्तबा खामेनी यांनी होर्मुझबाबत कोणता मोठा निर्णय घेतला?

    Ans: मुज्तबा यांनी सत्तेवर आल्यावर केवळ सहा दिवसांत होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, ज्यामुळे अमेरिकेला तिथून माघार घ्यावी लागली.

  • Que: ब्रिटनने या युद्धातून माघार का घेतली?

    Ans: इराणने ब्रिटनच्या चागोस बेटावरील तळावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याने आणि ब्रिटनवर थेट हल्ल्याची धमकी दिल्याने ब्रिटनने युद्धातून माघार घेतली.

Web Title: Mujtaba khamenei 5 decisions that forced us to retreat from hormuz iran war 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Mojtaba Khamenei
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

War Update : ‘आता तुमचं तुम्ही बघा!’ ट्रम्प यांनी जगाला दिला स्पष्ट संदेश; इराण युद्धातून अमेरिकेची माघार की नवी रणनीती?
1

War Update : ‘आता तुमचं तुम्ही बघा!’ ट्रम्प यांनी जगाला दिला स्पष्ट संदेश; इराण युद्धातून अमेरिकेची माघार की नवी रणनीती?

US Iran War: ‘हे’ साफ खोटं आहे! इराणचा पलटवार; ओव्हल ऑफिसमधील ट्रम्पच्या ‘त्या’ भाषणाने वेधले संपूर्ण जगाचे लक्ष
2

US Iran War: ‘हे’ साफ खोटं आहे! इराणचा पलटवार; ओव्हल ऑफिसमधील ट्रम्पच्या ‘त्या’ भाषणाने वेधले संपूर्ण जगाचे लक्ष

Oil Crisis: अंधारात बुडालेल्या क्युबासाठी तेल पाठवून रशिया बनला ‘तारणहार’; ट्रम्पची परवानगी पण Cuba राजवटीवर सडकून टीका
3

Oil Crisis: अंधारात बुडालेल्या क्युबासाठी तेल पाठवून रशिया बनला ‘तारणहार’; ट्रम्पची परवानगी पण Cuba राजवटीवर सडकून टीका

US Iran War : इराणशी युद्धात अमेरिकेचा दणदणीत विजय? राष्ट्राला संबोधित करताना ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
4

US Iran War : इराणशी युद्धात अमेरिकेचा दणदणीत विजय? राष्ट्राला संबोधित करताना ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.