earthquake exposed China's theft, in Bangkok of collapse bulding
बँकॉक: थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये मोठा भूंकप झाला. या भूकंपामुळे 30 मजली इमारती जमीवदोस्त झाली. या घटनेने मोठा वाद निर्माणा झाला आहे. या इमारतीच्या बांधकामातसंदर्भात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. बँकॉक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीचे बांधकाम एका चिनी कंपनीने केले होते. मात्र, या कंपनीविरोधात सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. यामध्ये चार चिनी नागरिकांनी देखील अटक करण्यात आली आहे. यामुळे चीन आणि थायलंडमध्ये संबंध बिघडण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या जोरदार झटक्याने अनेक मोठ्या इमारती धग धरुन राहिलिया, मात्र चिनी कंपनीने बांधलेली इमारत कोसळली. यामुळे थायलंडच्या सरकारने असे का घडले असा प्रश्न उपस्थित केला आहे. सरकारने डील करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे करण्याचे आदेश दिले आहे. या घटनेनंतर सरकारने त्वरित चौकशीसाठी पावले उचलली आहेत. चिनी कंपनीने बांधलेल्या संपूर्ण इमारतींची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मिडिया रिपोर्टनुसार, सरकारने चौकशी केल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या 4 चिनी नागरिकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, या लोकांनी बिल्डिंगच्या बांधकामाशी संबंधित दस्तऐवज नष्ट करत असल्याचा आरोप या चिनी नागरिकांवर आहे. ही इमारत बांधण्यासाठी कागदपत्रांमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. तसेच संबंधित चिनी कंपन्या हे पुरावे लपवण्याचा प्रयत्न करत आहेत.
यामुळे थायलंड सरकारकडून चीनच्या बांधकाम कंपन्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सरकारने हेही स्पष्ट केले आहे की, चिनी कंपन्यांचे बांधकाम दर्जाहीन असते का, याचीही चौकशी सुरु करण्यात येईल. थायलंडच्या रिअल इस्टेट क्षेत्रात चीनचा मोठा वाटा आहे. यामुळे सरकार थायलंडमधील चीनच्या सर्व प्रकल्पांची चौकशी करणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, भूकंपामुळे कोसळलेली इमारत चीनच्या रेल्वे नंबर 10 इंजिनियरिंग ग्रुप कंपनीच्या सहायक कंपनीने बांधकाम केले होते. या कंपनीकडे 49% शेअर्स असून ही कंपनी 2018 मध्ये स्थापन झाली होती. यामुळे थायलंड सरकारने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी 29 मार्च रोजी 10 वाजता म्यानमांर आणि थायलंडमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंपाचे झटके बसले. याचा परिणाम बँकॉकच्या चुटचुक परिसरात मोठ्या प्रमाणात जाणवला. या भूकंपामुळे 30 मजली इमारत कोसळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना थायलंडमधील चीनी कंपन्यांच्या विश्वासहार्यतेवर प्रश्न उपस्थित करत आहे.