Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनमध्ये पुन्हा पसरला गूढ आजार? रुग्णालये मुलांनी भरली, WHO ने मागितला अहवाल

चीनने म्हटले आहे की इन्फ्लूएंझा सारखा आजार देशातील बहुतेक मुलांमध्ये पसरत आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बीजिंगला या रहस्यमय आजाराबद्दल अधिक माहिती मागितली आहे.

  • By Aparna
Updated On: Nov 23, 2023 | 12:29 PM
चीनमध्ये पुन्हा पसरला गूढ आजार?  रुग्णालये मुलांनी भरली, WHO ने मागितला अहवाल
Follow Us
Follow Us:
चीन देशात पुन्हा एकदा गूढ आजाराने रुग्णालये भरली आहेत. चीनने म्हटले आहे की, इन्फ्लूएंझा सारखा आजार देशातील बहुतेक मुलांमध्ये पसरत आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बीजिंगला या रहस्यमय आजाराबद्दल अधिक माहिती मागितली आहे.
अहवालानुसार, चिनी रुग्णालये आजारी मुलांनी भरलेली आहेत. या मुलांना श्वसनाचा त्रास होत आहे. WHO ने सांगितले की, नॅशनल हेल्थ कमिशनच्या चिनी अधिकाऱ्यांनी 12 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन चीनमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली.
WHO ने या आजारासाठी कोविड-19 निर्बंध शिथिल केल्याचा ठपका ठेवला आहे. WHO ने आजारी मुलांमध्ये इन्फ्लूएंझा, SARS-CoV-2, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया यासंबंधी अतिरिक्त माहिती मागवली आहे. चीनमध्ये आजारी पडण्याच्या अलीकडील घटनांमध्ये कोविड सारखी लक्षणे पुन्हा दिसून येत आहेत.
रुग्णांच्या लांबच लांब रांगा
आजारी मुलांच्या कुटुंबीयांचा हवाला देत एका चिनी वृत्तवाहिनीने सांगितले की, या आजाराची कोणतीही नवीन लक्षणे नाहीत, परंतु मुलांच्या शरीराचे तापमान वाढतच जाते आणि फुफ्फुसात गाठी तयार होतात. चीनमधील रुग्णालयांमध्ये मुलांच्या उपचारांसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रोग मॉनिटरिंग वेबसाइट प्रोमेड मेल अलर्टने वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘रुग्णांना 2 तास रांगेत थांबावे लागते आणि आम्ही सर्व आपत्कालीन विभागात आहोत.
चायना डेली मधील एका अहवालात म्हटले आहे की, “चीनमध्ये श्वसन संक्रमणाच्या रोगांचा पीक सीझन आला आहे, ज्यामध्ये लोकांमध्ये अनेक प्रकारच्या रोग विषाणूंची देवाणघेवाण होत आहे.” मीडिया रिपोर्ट्सनुसार, “काही शिक्षकांनाही या आजाराची लागण झाली आहे; या आजारामुळे काही शाळा बंद करण्यात आल्या आहेत.”

Web Title: Mysterious disease spread again in china hospitals overflowing with children who calls for report nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2023 | 12:27 PM

Topics:  

  • China
  • WHO

संबंधित बातम्या

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण
1

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार
2

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?
3

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?

भारतीय योगासन पाहून चीनही भारावला! BRICSच्या पारंपरिक क्रीडा महोत्सवात भारताची छाप
4

भारतीय योगासन पाहून चीनही भारावला! BRICSच्या पारंपरिक क्रीडा महोत्सवात भारताची छाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.