Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?

China Virus: हा विषाणू पॅसिफिक महासागरात सापडला आहे. सुरुवातीला, चिनी संशोधक पथकाचा दावा आहे की हा विषाणू धोकादायक नाही. तथापि, 'नेचर' नियतकालिकाच्या मते, यावर अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया का...

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 14, 2026 | 04:27 PM
China 11700 new viruses discovered Pacific Ocean deep sea virus

China 11700 new viruses discovered Pacific Ocean deep sea virus

Follow Us
Follow Us:
  • पॅसिफिक महासागराच्या तळाशी ११,७०० नव्या विषाणूंचा शोध
  • जिवाणू नष्ट करण्याची भयानक क्षमता
  • सध्या मानवांना थेट धोका नाही, पण भीती कायम

२०१९ मध्ये चीनमधील (China Virus) वुहान शहर आणि तिथल्या प्रयोगशाळेतून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला होता. या जीवघेण्या महामारीमुळे जागतिक स्तरावर ७१ लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला, तर कोट्यवधी लोकांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. कोरोनाच्या त्या भीतीदायक आठवणी अजूनही लोकांच्या मनातून पूर्णपणे पुसल्या गेलेल्या नाहीत. अशातच आता चीनमधून पुन्हा एकदा एक धक्कादायक आणि तितकीच चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

काय आहे चिनी संशोधकांचा नवा दावा? 

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या (South China Morning Post) अहवालानुसार, चिनी संशोधकांच्या एका पथकाने पॅसिफिक महासागराच्या अतिशय खोल तळाशी तब्बल ११,७०० नवीन विषाणूंचे प्रकार शोधून काढले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हे सर्व विषाणू समुद्राच्या तळाशी असलेल्या ‘पॉलिमेटॅलिक नोड्यूल’ (Polymetallic Nodule Zone) या धातूंच्या साठ्यांच्या परिसरात अस्तित्वात असल्याचे समोर आले आहे.

धातूंचा शोध घेताना लागला विषाणूंचा साठा!

चिनी संशोधकांचे हे पथक वास्तविक पाहता समुद्राखालील मौल्यवान धातूंच्या आणि खनिजांच्या साठ्यांचा तपास करत होते. महासागराच्या तळाशी असलेल्या या खनिजांचा अभ्यास करत असताना संशोधकांना अचानक या अत्यंत सूक्ष्म परंतु प्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या विषाणूंच्या प्रजातींचा शोध लागला.

जेव्हा या विषाणूंच्या जनुकीय रचनेचा अभ्यास सुरू झाला, तेव्हा संशोधकही थक्क झाले. हे सर्व ११,७०० विषाणू जनुकीयदृष्ट्या एकमेकांशी अत्यंत जवळून जोडलेले आहेत. म्हणजेच हे विषाणू एकाच कौटुंबिक किंवा जैविक वर्गातील मानले जात आहेत. हे सर्व विषाणू सूक्ष्मजीवशास्त्राच्या भाषेत ‘कौडोव्हिरिसेट्स’ (Caudoviricetes) या वर्गात मोडतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Marco Rubio India Visit: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव 6 महिन्यांत दुसऱ्यांदा भारतात; मुंबई अन् जामनगर दौऱ्यामागचे मोठे कारण काय?

सुईसारखी रचना अन् जिवाणूंना नष्ट करण्याची क्षमता

या संशोधनात समोर आलेली सर्वात भीतीदायक बाब म्हणजे या विषाणूंची शारीरिक रचना. अहवालानुसार, या विषाणूंच्या शेवटी एका सुईसारखी तीव्र रचना (Tail structure) असते. या सुईसारख्या रचनेचा वापर करून हे विषाणू कोणत्याही जिवाणूच्या (Bacteria) पेशींमध्ये आपले जनुकीय साहित्य (Genetic material) थेट टोचू शकतात.

Chinese team finds 11,700 new viruses in world’s biggest seabed metal deposit https://t.co/Ny7rltNy2E — South China Morning Post (@SCMPNews) October 14, 2026

credit – social media and Twitter

प्रयोगशाळेत केलेल्या अभ्यासादरम्यान असे दिसून आले की, हे विषाणू मानवी शरीरात असणाऱ्या किंवा पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाच्या जिवाणूंना पूर्णपणे नष्ट करण्याची क्षमता ठेवतात. हे विषाणू समुद्रातील नेहमीच्या घटकांपेक्षा खूप जड आहेत आणि त्यांची संसर्ग पसरवण्याची पद्धत अत्यंत आक्रमक आहे.

मानवांसाठी थेट धोका आहे का? शास्त्रज्ञ काय म्हणतात?

चिनी संशोधक पथकाने त्वरित स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की, सध्याच्या परिस्थितीत या ११,७०० विषाणूंमुळे मानवी आरोग्याला किंवा सामान्य नागरिकांना कोणताही थेट धोका नाही. हे विषाणू समुद्राच्या हजारो मीटर खाली अतिशय उच्च दाब आणि थंड तापमानात राहतात. त्यामुळे ते मानवी वस्तीत पसरण्याची शक्यता सध्या तरी नगण्य आहे.

परंतु आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक जगतात आणि विशेषतः प्रसिद्ध संशोधन नियतकालिक ‘नेचर’ने (Nature) यावर चिंता व्यक्त केली आहे. ‘नेचर’ नियतकालिकानुसार, जरी हे विषाणू सध्या मानवावर हल्ला करत नसले, तरी ते मानवी शरीरातील किंवा पर्यावरणातील उपयुक्त जिवाणू मारू शकतात. जर हे विषाणू भविष्यात उत्परिवर्तित (Mutate) झाले किंवा समुद्री जीवांच्या माध्यमातून मानवी अन्नसाखळीत आले, तर ते गंभीर आव्हान निर्माण करू शकतात. त्यामुळे चीनने या संशोधनाची सर्व आकडेवारी जगासमोर पारदर्शकपणे मांडणे गरजेचे आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait of Hormuz: ‘युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आल्या तर…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; 5 घातक शस्त्रांसह लष्कर सज्ज

कोरोनाची आठवण आणि जागतिक भीती

वुहान प्रयोगशाळेतून कोरोना विषाणू बाहेर पडला तेव्हाही सुरुवातीला चीनने त्याच्या धोक्याची तीव्रता जगापासून लपवून ठेवली होती, असा आरोप जगभरातून केला जातो. त्यामुळेच आता पुन्हा एकदा ११,७०० नव्या विषाणूंची माहिती समोर आल्यावर आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना आणि वैज्ञानिक वर्ग सतर्क झाला आहे. निसर्गाच्या कुशीत विशेषतः अथांग महासागराच्या तळाशी असे अब्जावधी अज्ञात विषाणू गाडले गेलेले आहेत. मानवी हस्तक्षेपामुळे जर हे विषाणू बाहेर आले, तर जगाला नव्या जैविक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Web Title: China discovers 11700 new deep sea viruses in pacific ocean hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • China
  • virus
  • World news

संबंधित बातम्या

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!
1

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!

Strait of Hormuz: ‘युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आल्या तर…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; 5 घातक शस्त्रांसह लष्कर सज्ज
2

Strait of Hormuz: ‘युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आल्या तर…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; 5 घातक शस्त्रांसह लष्कर सज्ज

Nobel Prize: नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात तरुण मानकरी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर; वाचा त्यांच्या संघर्षाची रंजक गोष्ट
3

Nobel Prize: नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात तरुण मानकरी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर; वाचा त्यांच्या संघर्षाची रंजक गोष्ट

BRICS Summit Controversy: नवी दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला न जाणे हा अपरिपक्व निर्णय; शेख हसीना यांचा बांगलादेश सरकारला टोला
4

BRICS Summit Controversy: नवी दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला न जाणे हा अपरिपक्व निर्णय; शेख हसीना यांचा बांगलादेश सरकारला टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.