Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ArtemisII: अथांग अवकाशात ‘अशी’ दिसते आपली वसुंधरा; NASAच्या अंतराळवीरांनी टिपले पृथ्वीचे अत्यंत विलोभनीय फोटो

नासाच्या आर्टेमिस २ मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्रावरून पृथ्वीची अप्रतिम छायाचित्रे घेतली आहेत, जी नासाने प्रसिद्ध केली आहेत. या छायाचित्रांमध्ये पृथ्वीचे सौंदर्य, अरोरा बोरेलिस स्पष्टपणे दिसत आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 04, 2026 | 12:29 PM
nasa artemis 2 astronauts send stunning photos of earth from moon orbit 2026

nasa artemis 2 astronauts send stunning photos of earth from moon orbit 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • चंद्रावरून ‘ब्लू मार्बल’चे दर्शन
  • अरोरा बोरेलिसचे विलोभनीय रूप
  • अंतराळवीर थक्क

NASA Artemis 2 Earth photos from Moon : मानवाच्या अंतराळ संशोधनातील सर्वात गौरवशाली क्षण आज पुन्हा एकदा प्रत्यक्षात आला आहे. ५० वर्षांहून अधिक काळानंतर, जेव्हा नासाचे ‘आर्टेमिस २'(NASA Artemis 2) मोहिमेतील चार धाडसी अंतराळवीर चंद्राच्या दिशेने झेपावले, तेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले आणि त्यांना दिसले आपल्या घराचे म्हणजेच ‘पृथ्वी’चे एक विलोभनीय दृश्य. नासाने आता ही पहिली छायाचित्रे अधिकृतपणे प्रसिद्ध केली असून, ती पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे. कमांडर रीड वाईजमन यांनी त्यांच्या वैयक्तिक टॅबलेटवर टिपलेली ही छायाचित्रे म्हणजे विज्ञानाचा चमत्कारच म्हणावा लागेल.

सूर्यास्त आणि अरोराचे जादुई दर्शन

नासाने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या प्रतिमेत, सूर्य पृथ्वीच्या मागे मावळताना दिसत आहे. या ‘कॉस्मिक’ सूर्यास्ताच्या प्रकाशात पृथ्वीच्या काठावर निळसर आणि हिरव्या रंगाच्या ‘अरोरा’ (उत्तर ध्रुवीय प्रकाश) लहरी स्पष्टपणे दिसत आहेत. या फोटोंमध्ये केवळ पृथ्वीच नाही, तर अंतराळातील ‘राशिचक्र प्रकाशाचा’ (Zodiacal Light) एक तेजस्वी पट्टाही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नासा मिशन कंट्रोलने हे फोटो शेअर करताना एक भावनिक संदेश दिला आहे  “आपण अवकाशात कितीही दूर गेलो, तरी आपण सर्व एकच जग आहोत.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : A-10 Warthog : एका क्षेपणास्त्रात खेळ खल्लास! अमेरिकेच्या गर्विष्ठ ‘वॉरहॉग’ला इराणने क्षणात संपवले; VIDEO मीडियामध्ये लीक

रात्रीची पृथ्वी आणि शहरांची रोषणाई

दुसऱ्या प्रतिमेने विज्ञानाप्रेमींची मने जिंकली आहेत. अंतराळयानाचा शल्टर स्पीड कमी ठेवून काढलेल्या या फोटोमध्ये रात्रीच्या वेळी पृथ्वी कशी चमकते, हे स्पष्टपणे दिसत आहे. जगभरातील मोठ्या शहरांचे दिवे, विजेचा लखलखाट आणि ढगांच्या आडून दिसणारा भूभाग हे दृश्य अत्यंत नेत्रदीपक आहे. ‘ओरियन’ अवकाशयानाच्या छोट्याशा खिडकीतून दिसणारा हा ‘निळा ठिपका’ आपण निसर्गाच्या तुलनेत किती लहान आहोत, याची आठवण करून देतो.

1972 ➡️2026
Apollo 17 ➡️ Artemis II pic.twitter.com/wGc2wtY0e2
— NASA (@NASA) April 3, 2026

credit – social media and Twitter

“आम्ही चौघेही निशब्द झालो होतो!” अंतराळवीरांचा अनुभव

या ऐतिहासिक क्षणाबद्दल बोलताना मिशन विशेषज्ञ क्रिस्टीना कोच म्हणाल्या, “संपूर्ण पृथ्वीला एकाच वेळी खिडकीत पाहणे हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा आहे. दिवसा उजळलेली धरती आणि रात्री चंद्राच्या प्रकाशात न्हालेली पृथ्वी पाहून मन प्रसन्न होते.” कमांडर रीड वाईजमन यांनी सांगितले की, जेव्हा त्यांचे यान फिरले तेव्हा त्यांना युरोप आणि आफ्रिका खंड स्पष्टपणे दिसत होते. ते म्हणाले, “तो इतका प्रेक्षणीय क्षण होता की आम्ही चौघेही काही काळ स्तब्ध झालो होतो.”

Even in darkness, we glow. In this image of Earth taken by the Artemis II crew, we can see the electric lights of human activity. In the lower right, sunlight illuminates the limb of the planet. pic.twitter.com/kWcjHFvoDM — NASA (@NASA) April 3, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ancient Treasure: इंटरपोलचा ‘तो’ सर्वात मोठा शोध यशस्वी! 2500 वर्षे जुना सोन्याचा खजिना सापडला; नेदरलँड्समध्ये मोठा खुलासा

का महत्त्वाचे आहेत हे फोटो?

आर्टेमिस २ मोहीम ही मानवाला पुन्हा चंद्रावर उतरवण्याच्या नासाच्या मोठ्या ध्येयाचा एक भाग आहे. १९७२ नंतर प्रथमच मानवी डोळ्यांनी इतक्या जवळून चंद्राची कक्षा आणि इतक्या दुरून पृथ्वीचे पूर्ण गोलाकार स्वरूप पाहिले आहे. हे फोटो केवळ विज्ञानासाठी महत्त्वाचे नाहीत, तर ते पुढच्या पिढीला अंतराळ संशोधनासाठी प्रेरित करणारे ठरतील. हे फोटो सिद्ध करतात की मानवी जिद्द आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण अवकाशाची कोणतीही सीमा ओलांडू शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आर्टेमिस २ च्या अंतराळवीरांनी पृथ्वीचे फोटो कुठून काढले?

    Ans: हे फोटो अंतराळवीरांनी चंद्राच्या दिशेने प्रवास करत असताना 'ओरियन' अवकाशयानाच्या खिडकीतून टिपले आहेत.

  • Que: या फोटोंमध्ये काय खास दिसत आहे?

    Ans: या फोटोंमध्ये पृथ्वीवरील अरोरा बोरेलिस (ध्रुवीय प्रकाश), सूर्यास्त आणि रात्रीच्या वेळी चमकणारे शहरांचे दिवे स्पष्टपणे दिसत आहेत.

  • Que: हे फोटो कोणी काढले आहेत?

    Ans: मोहिमेचे कमांडर रीड वाईजमन यांनी त्यांच्या वैयक्तिक टॅबलेटवर हे ऐतिहासिक फोटो टिपले आहेत.

Web Title: Nasa artemis 2 astronauts send stunning photos of earth from moon orbit 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • NASA
  • NASA Space Agency
  • Space News

संबंधित बातम्या

नासाची आर्टेमिस-II मोहीम सुरु; तब्बल 54 वर्षांनंतर अंतराळवीर 10 दिवस चंद्राभोवती घालणार प्रदक्षिणा
1

नासाची आर्टेमिस-II मोहीम सुरु; तब्बल 54 वर्षांनंतर अंतराळवीर 10 दिवस चंद्राभोवती घालणार प्रदक्षिणा

Artemis II : 54 वर्षांनंतर नासा रचणार इतिहास! पृथ्वीपासून 4.5 लाख किमी दूर; नासाचे ‘ते’ 4 वीर जाणार चंद्राच्या काळोख्या बाजूला
2

Artemis II : 54 वर्षांनंतर नासा रचणार इतिहास! पृथ्वीपासून 4.5 लाख किमी दूर; नासाचे ‘ते’ 4 वीर जाणार चंद्राच्या काळोख्या बाजूला

Moon Magnetic Field: चंद्रावर होकायंत्र का काम करत नाही? फिरावं लागत दिशाहीन, वाचा विज्ञानाचं ‘हे’ रंजक रहस्य
3

Moon Magnetic Field: चंद्रावर होकायंत्र का काम करत नाही? फिरावं लागत दिशाहीन, वाचा विज्ञानाचं ‘हे’ रंजक रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.