Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून

nepal : नेपाळ पर्यटन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता झाले असून, त्यामध्ये मानसरोवरला जाणाऱ्या ३१ यात्रेकरूंचा समावेश आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 26, 2026 | 04:25 PM
Nepal floods 2026 Indian tourists missing

Nepal floods 2026 Indian tourists missing

Follow Us
Follow Us:
  • भोटेकोशी नदीला महापूर व १०५ भारतीय बेपत्ता
  • मानसरोवर यात्रेकरूंवर काळाचा घाला
  • लष्कराचे मोठे बचावकार्य व हेल्पलाइन जारी

नेपाळमधील (nepal) रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांमध्ये तिबेटच्या सीमाभागातून वाहणाऱ्या भोटेकोशी आणि त्रिशुली नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी आपत्ती ओढवली आहे. या अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात शेकडो पर्यटक आणि स्थानिक नागरिक अडकले असून नेपाळ पर्यटन मंडळाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तब्बल १०५ भारतीय पर्यटक सध्या बेपत्ता आहेत. चिंताजनक बाब म्हणजे यामध्ये पवित्र कैलाश मानसरोवर यात्रेसाठी निघालेल्या ३१ भारतीय भाविकांचा समावेश आहे. या घटनेमुळे भारतातील अनेक कुटुंबांची धाकधूक वाढली असून नेपाळ सरकार आणि लष्कराने युद्धपातळीवर शोध व बचाव मोहीम हाती घेतली आहे.

नेपाळ पर्यटन मंडळाच्या अधिकृत नोंदीनुसार, पुराच्या विळख्यात सापडून सुमारे ३८४ हून अधिक प्रवासी आणि पर्यटक बेपत्ता झाले आहेत. यामध्ये २९१ परदेशी पर्यटक असून ९० हून अधिक नेपाळचे स्थानिक रहिवासी आहेत. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, अमेरिका, मलेशिया, युनायटेड किंगडम आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे नागरिकही या दुर्घटनेत अडकल्याची माहिती समोर आली आहे. बेपत्ता असलेल्या भारतीयांपैकी ५९ जण स्मार्ट ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून तर ४६ जण लीफ हॉलिडेजच्या टूर पॅकेजद्वारे प्रवास करत होते.

सीमाशुल्क कर्मचारी आणि जलविद्युत प्रकल्पाचे मोठे नुकसान

पुराचा तडाखा इतका तीव्र होता की रसुवा येथील तिमुरे भागातील सीमाशुल्क कार्यालयाचे १४ कर्मचारी (११ कायमस्वरूपी व ३ कंत्राटी) पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाले आहेत. सुदैवाने, कार्यालयाचे प्रमुख राजेंद्र ढुंगाना यांच्यासह २५ कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी बाहेर काढण्यात यश आले आहे. याशिवाय, २०-मेगावॅट क्षमतेच्या लांगटांग खोला जलविद्युत प्रकल्पातील तब्बल ६० कामगार व अधिकारी बेपत्ता झाले असून संपूर्ण प्रकल्पाचे अतोनात नुकसान झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्गाचा कोप! भोटेकोशी नदीला महापूर; 1000 लोक गेले वाहून; 30 पोलीस बेपत्ता; भयानक VIDEO VIRAL

भोटेकोशी नदीच्या या रौद्ररुपाने परिसरातील पायाभूत सुविधा पुरत्या उद्ध्वस्त केल्या आहेत. नुवाकोटमधील त्रिशुली बाजाराजवळील अंदाजे ६० घरे पुराच्या प्रचंड वेगात वाहून गेली असून, दोन मुख्य मोटारयोग्य पूल पूर्णपणे कोसळले आहेत. प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र देवघाट परिसरही या पुरामुळे गंभीररीत्या बाधित झाला असून, ३०० हून अधिक वाहने पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय २५-मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे तीन महत्त्वाचे ब्लॉक आणि सबस्टेशन वाहून गेल्याने संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा आणि संपर्क यंत्रणा खंडित झाली आहे.

VIDEO | Nepal: Devastating flash flood causes major damage to markets and hydropower projects in Rasuwa region. More details are awaited.#NepalNews #NepalFlashFlood (Source: Third Party) (Full video available on PTI Videos – https://t.co/d8jp61yd2p) pic.twitter.com/QQmU1advuw — Press Trust of India (@PTI_News) August 26, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व

लष्कराचे हेलिकॉप्टर व ड्रोनद्वारे बचावकार्य; हेल्पलाइन क्रमांक जारी

घटनेचे गांभीर्य ओळखून नेपाळ सरकारने रसुवा, नुवाकोट आणि धाडिंग या तीन जिल्ह्यांना आपत्तीग्रस्त भाग म्हणून घोषित केले आहे. नेपाळी लष्कर, सशस्त्र पोलीस बल आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने ३५ हून अधिक लष्करी जवान आणि १४ हून अधिक हेलिकॉप्टर (४ लष्करी व ८-१० खाजगी) या परिसरात तैनात केले आहेत. प्रतिकूल वातावरण असतानाही हेलिकॉप्टरद्वारे दुर्गम भागात अडकलेल्या १२ जणांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे, ज्यामध्ये स्याफ्रुबेसीमधून सहा, मैलुंगमधून दोन आणि धुंचेमधून चार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने पुराच्या चिखलात अडकलेल्या इतर नागरिकांचा शोध घेण्यासाठी स्निफर डॉग्स आणि अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली आहे. भारत सरकार आणि नेपाळमधील भारतीय दूतावास या बचावकार्यावर सतत लक्ष ठेवून असून पर्यटकांच्या नातेवाईकांसाठी नेपाळ सरकारने ११४४ हा आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. नद्यांच्या काठी राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित आणि उंच भागात हलण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Nepal floods 105 indian tourists mansarovar pilgrims missing rasuwa marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • flood
  • nepal
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flash Flood: नेपाळच्या महापुरात १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवरला जाणाऱ्या ३१ यात्रेकरूंचाही समावेश
1

Nepal Flash Flood: नेपाळच्या महापुरात १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवरला जाणाऱ्या ३१ यात्रेकरूंचाही समावेश

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व
2

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व

RSS: मोहन भागवतांच्या ‘विश्व एकता’च्या महोत्सवावरून अमेरिकेत राजकीय रणकंदन; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचं ‘या’ विरोधात मोठं वक्तव्य
3

RSS: मोहन भागवतांच्या ‘विश्व एकता’च्या महोत्सवावरून अमेरिकेत राजकीय रणकंदन; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचं ‘या’ विरोधात मोठं वक्तव्य

Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्गाचा कोप! भोटेकोशी नदीला महापूर; 1000 लोक गेले वाहून; 30 पोलीस बेपत्ता; भयानक VIDEO VIRAL
4

Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्गाचा कोप! भोटेकोशी नदीला महापूर; 1000 लोक गेले वाहून; 30 पोलीस बेपत्ता; भयानक VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.