
फोटो सौजन्य सोशल मीडिया
या स्पर्धेत धावणे , खेळणे किंवा शारीरिक ताकदीचे प्रदर्शन करण्याऐवजी चक्क झोपण्याची चुरस रंगली . एका मॅट्रेस कंपनीने आयोजित केलेल्या स्पर्धेत स्वतःला स्पर्धात्मक झोप घेणारे म्हणवणाऱ्या सहभागी व्यक्तींनी भाग घेतला . सर्वात लवकर आणि गाढ झोपेत जाण्यासोबतच शेराराला सर्वोत्तम विश्रांती देण्याचे आव्हान स्पर्धांकांसमोर होते .
World Economy : युद्ध, महागाई आणि कर्जाचा तिहेरी फटका; विकसनशील देशांसमोर मोठे संकट
जपान हा जगातील सर्वाधिक काम करणाऱ्या देशांपैकी एक म्हणून ओळखला जातो . तेथील कॉर्पोरेट संस्कृती , कामाचे लांब तास आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यामुळे अनेक नागरिकांना पुरेशी झोप घेता येत नाही . अनेक कर्मचारी कामाच्या व्यापामुळे स्वतःच्या आरोग्याकडे आणि विश्रांतीमुळे दुर्लक्ष करतात .
झोपेच्या कमतरतेचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही होतो . दिवसभर काम केल्यानंतर थकवा दूर करण्यासाठी पुरेशी विश्रांती मिल्ने आवश्यक असते . मात्र जपानमधील धावपळीच्या जीवनशैलीत झोप देखील अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे .
एका मेट्रेस कंपनीने या स्पर्धेचे आयोजन केले होते . यात सहभागी झालेल्या स्पर्धकांनी स्वतःला कॉम्पिटिटिव्ह स्लीपर्स म्हणजेच स्पर्धात्मक झोप घेणारे असे संबोधले या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या समोर कमी वेळेत झोपेत जाणे , गाढ झोप घेऊन शरीराला सर्वोत्तम विश्रांती देण्याचे आव्हान होते .
खासकरून कोणत्याही स्पर्धेत वेग ,ताकद किंवा कौशल्याला महत्व दिले जाते . मात्र या स्पर्धेत शांतपणे झोपणे आणि शरीराला विश्रांती देणे हेच कौशल्य ठरले . त्यामुळे हि स्पर्धा इत्तर स्पर्धे पेक्षा वेगळी ठरली असून हा अनोखा विषय म्हूणन देखील याकडे आता सगळे जन पाहू लागले आहेत .
या स्पर्धेच्या निमित्ताने जपानमधील कामाचा ताण आणि अपुऱ्या झोपेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे . सतत काम करणे म्हणजेच कार्यक्षमता असे नसून शरीराला पुरेशी विश्रांती मिळणे देखील गरजेचे आहे . झोपेचा अभाव असल्यास एकाग्रता कमी होते , थकवा जाणवतो आणि कामाच्या क्षमतेवर परिणाम होतो .
अशा समस्या निर्माण होतात . त्यामुळे काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात संतुलन राखणायची गरज आहे . मॅट्रेस कंपनीची ही स्पर्धा यामुळे सर्व ठिकाणी चर्चेचा विषय ठरत आहे . यातून झोप ही फक्त वैयक्तिक सवय नसून आरोग्याशी समबंधित आहे हा संदेश मिळत आहे .