Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळमध्येही सरकार पाडण्यासाठी बांगलादेशी मॉडेल? पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची तरुण आंदोलकांकडून मागणी

Nepal Gen Z Protest : नेपाळमध्ये सध्या सरकारविरोधात तीव्र आंदोलन सुरु झाले आहे. सोशल मीडियावरील बंदीविरोधात आंदोलन सुरु आहे. आंदोलनात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधानांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 08, 2025 | 05:44 PM
Nepal Gen Z Protest over socail media ban and pm oli's resignation in demand

Nepal Gen Z Protest over socail media ban and pm oli's resignation in demand

Follow Us
Close
Follow Us:

Nepal Gen Z Protest against Government : काठमांडू : सध्या नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरु आहे. नेपाळच्या सरकारेन सोशल मीडियावर घातलेल्या बंदीविरोधी Gen Z जनरेशनचे रिव्होल्यूशनरी आंदोलन सुरु आहे. परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. काठमांडूमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच सुरक्षा दलही तैनात करण्यात आले आहे. निदर्शक तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

तरुण आणि सुरक्षा दलांच्या चकामकीत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवेळी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जात आहे. पतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला असून तज्ज्ञांच्या मते ही ओली शर्मा यांचे सरकार पाडण्याची मोठी खेळ आहे. असाच डाव बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पाडण्यासाठी करण्यात आला होता.

यामुळे नेपाळमध्येही ओली शर्मा यांच्या सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या नेपाळमधील तरुण सोशल मीडियावरुन पंतप्रधान ओली शर्मा यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

Nepal Social Media Ban: सोशल मीडियावर बंदी, नेपाळी तरुणाई आक्रमक….”भ्रष्टाचारविरोधी आंदोलन दडपल्याचा आरोप”

सोशल मीडियावर सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे. या आंदोलनामध्ये २८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सहभाग घेण्यास बंदी असून आंदोलनाने हिंसक रुप धारण केले आहे. सोशल मीडियावरील बंदी ही सरकारचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी वापरली जात असल्याचे तरुणांना म्हटले आहे.

No „if and but“ but NC must quit the government. Country is going towards chaos, don’t support anti-people Oli government!!!

— Prof Dr Govind Raj Pokharel 🇳🇵 (@grpokharel) September 8, 2025

नेपाळमध्ये बांगलादेशी मॉडेलचा वापर?

तज्ज्ञांच्या मते, सध्या नेपाळमध्ये सुरु असलेले आंदोलन तीव्र होत चालले आहे. आंदोलक तरुणांवर अश्रुधुराचा आणि पाण्याच्या तोफांचा वापर करण्यात आला आहे. परिस्थिती अधिक हिंसक होत चालली आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने कर्फ्यू लागू केल आहे. रात्री १० वाजेपर्यंत ह कर्फ्यू लागू राहणार आहे. अशीच सर्व परिस्थिती बांगलादेशमध्ये शेख हसीन सरकारच्या काळातही निर्माण झाली होती.

बांगलादेशमध्येही विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात आंदोलन पुकारले होते. यावेळी देखील शेख हसीनांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. परिणामी हसीना यांना देश सोडून जावे लागले होते.सध्या नेपाळमध्येही हिच परिस्थिती उद्भवली आहे. सरकारच्या सोशल मीडियावरील बंदीमुळे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु झाले आहे. पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यामुळे दोन्ही देशातील घडामोडी जवळपास समान आहेत. एकच पद्धत सरकार पाडण्यासाठी वापरली जात आहे.

Now its Nepal’s turn! Is there something we are missing that there are these massive eruptions of anger on streets. All it takes is a spark. We saw this in Sri Lanka, Bangladesh, and now Nepal. We are seeing this in Indonesia and in a more disastrous way in Myanmar. We saw this…

— sushant sareen (@sushantsareen) September 8, 2025

तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही महिन्यांपूर्वी नेपाळमध्ये राजेशाहीची मागणी जोर धरत होती. राजेशाही समर्थकांनी आंदोलनही केले होते. देशात लोकशाही पाडून पुन्हा राजेशाही उभारण्याचा प्रयत्न सुरु होता. यामुळे ओली शर्मा यांचे सरकारही चिंतेत आले होते. यामुळे तज्ज्ञांच्या मते, हे आंदोलन भडकवले जात असून यामध्ये राजेशाही समर्थकांचा हात असण्याची शक्यता आहे.

हत्यारा सरकार, the blood is in your hands! @kpsharmaoli, please resign immediately, and take your incompetent home minister with you!!#EnoughisEnough

— Pluto (@aneekarma) September 8, 2025

या वेळी ही परिस्थिती भारतातही उद्भवू शकते अशी देखील भीती व्यक्त केली जात आहे. भारताचे भू-राजकीय तज्ज्ञ सुशांत शरीन यांना बांगालदेशमधील परिस्थितीचा उल्लेख खरत आता नेपाळची बारी असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, यासाठी केवळ एक ठिणगीची गरज होती, आणि नेपाळच्या सरकारने सोशल मीडियावर बंदी लागू केली आणि वाद सुरु झाला. इंडोनेशिया, म्यानमरमध्येही या स्वरुपात भयानक आंदोलने घडल्याची उदाहरणे त्यांनी दिली.

सोशल मीडियावरील बंदीने हजारो Gen Z चा चढला पारा; नेपाळमध्ये संचार बंदी लागू

Web Title: Nepal gen z protest over socail media ban and pm olis resignation in demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 05:44 PM

Topics:  

  • nepal
  • World news

संबंधित बातम्या

कॅलिफोर्नियात भारतीय तरुणाची निर्दयी हत्या; लघुशंका ठरली जीवघेणी
1

कॅलिफोर्नियात भारतीय तरुणाची निर्दयी हत्या; लघुशंका ठरली जीवघेणी

Nepal Social Media Ban: सोशल मीडियावर बंदी, नेपाळी तरुणाई आक्रमक….”भ्रष्टाचारविरोधी आंदोलन दडपल्याचा आरोप”
2

Nepal Social Media Ban: सोशल मीडियावर बंदी, नेपाळी तरुणाई आक्रमक….”भ्रष्टाचारविरोधी आंदोलन दडपल्याचा आरोप”

Nepal Protest Gen Z : नेपाळमध्ये सोशल मिडिया बंदीवरून राडा, आतापर्यंत 5 आंदोलकांचा मृत्यू
3

Nepal Protest Gen Z : नेपाळमध्ये सोशल मिडिया बंदीवरून राडा, आतापर्यंत 5 आंदोलकांचा मृत्यू

Social Media Ban in Nepal: नेपाळमध्ये बॅन केले हे सोशल मीडिया अ‍ॅप्स! काय आहे बंदीचे कारण, सर्वकाही जाणून घ्या सविस्तर
4

Social Media Ban in Nepal: नेपाळमध्ये बॅन केले हे सोशल मीडिया अ‍ॅप्स! काय आहे बंदीचे कारण, सर्वकाही जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.