"भ्रष्टाचारविरोधी आंदोलन दडपल्याचा आरोप" (Photo Credit- X)
काठमांडू: नेपाळमध्ये सध्या सोशल मीडिया बंदी आणि वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात तरुणाई आक्रमक झाली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व नेपाळची Generation-Z (जनरल-झेड) करत आहे, ज्यामुळे याला ‘जनरल-झेड निषेध’ असेही म्हटले जात आहे. आंदोलकांनी नेपाळच्या संसद भवनात घुसण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती चिघळली असून, सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या निदर्शनांमध्ये आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडे फोडले असून, काठमांडूसह अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
८ सप्टेंबर रोजी नेपाळच्या तरुणांनी भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील सरकारी नियंत्रणाविरुद्ध देशव्यापी निदर्शने जाहीर केली होती. हे आंदोलन केवळ सोशल मीडियावरील बंदीपुरते मर्यादित नसून, वर्षानुवर्षे सुरू असलेला भ्रष्टाचार आणि बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये वाढलेल्या असंतोषाचा तो उद्रेक आहे.
Kathmandu, Nepal: A protester says, “We were planning to hold a peaceful protest, but as we advanced further, we could see the violence by the police. The police are firing on the people, which is against the essence of peaceful protest. Those who are sitting in power cannot… https://t.co/L9h2XfWHMb pic.twitter.com/RCIXYSr8fE
— ANI (@ANI) September 8, 2025
आंदोलकांचे म्हणणे आहे की त्यांचे आंदोलन शांततापूर्ण होते, मात्र पोलिसांकडून हिंसाचार केला गेला. एका निदर्शकाने सांगितले, “आम्ही शांततापूर्ण निदर्शने करत असताना पोलिसांनी आमच्यावर गोळीबार सुरू केला. हा प्रकार शांततापूर्ण निदर्शनाच्या मूळ हेतूच्या विरुद्ध आहे. सत्तेतील लोक आमच्यावर त्यांची ताकद लादू शकत नाहीत. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन दडपले जात आहे, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अधिकाराच्या विरोधात आहे.”
हे देखील वाचा: सोशल मीडियावरील बंदीने हजारो Gen Z चा चढला पारा; नेपाळमध्ये संचार बंदी लागू
आणखी एका निदर्शकाने पोलिसांच्या क्रूरतेची माहिती दिली. तो म्हणाला, “काही वेळापूर्वी पोलिसांनी गोळ्या झाडल्या, ज्या मला लागल्या नाहीत पण माझ्या मागे उभ्या असलेल्या माझ्या मित्राच्या हातात लागल्या. गोळीबार अजूनही सुरू आहे, आणि संसदेच्या आतूनही गोळ्यांचा आवाज ऐकू येत आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या माझ्या मित्राच्या डोक्यात गोळी लागली आहे. पोलिस गुडघ्यांच्या वरच्या भागावर अंदाधुंद गोळीबार करत आहेत. त्यांना असे करण्याची परवानगी आहे का?”
Kathmandu, Nepal: A protester says, “A while ago, the police fired bullets which did not hit me but hit a friend of mine standing behind me. He was shot in the hand. The firing is still going on and we can hear gunfire from inside the parliament as well. My friend, who was… https://t.co/2gM8GGjJdx pic.twitter.com/qV6gI9x5SF
— ANI (@ANI) September 8, 2025
नेपाळच्या पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी गेल्या आठवड्यात वादग्रस्त निर्णय घेतला होता. फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर), इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसह एकूण २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली होती. दरम्यान यामुळे नेपाळमधील तरुण आणि हजारो विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.
नेपाळमध्ये एकूम २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या कंपन्यांनी रजिस्ट्रेशनची मुदत पूर्ण केली नाही, ज्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने एक सार्वजनिक नोटीस जारी केली असून, नेपाळ टेलिकॉम अथॉरिटीला ‘सर्व गैर-नोंदणीकृत सोशल मीडिया साईट्स तोपर्यंत निष्क्रिय करा, जोपर्यंत त्या नोंदणीकृत होत नाहीत’ असे आदेश दिले आहेत. सद्यस्थितीत नेपाळमध्ये तणावाचे वातावरण असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.