Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NEP : गौतम गंभीरचा लाडका गोलंदाच चमकला, ‘राणा’जींनी नेपाळच्या पोरांचा घाम काढला

IND vs NEP : भारत 'ए' विरुद्ध नेपाळ सामन्यात हर्षित राणाने 16 धावांत 4 विकेट घेत भेदक गोलंदाजी केली. प्रिन्स यादवनेही नेपाळच्या फलंदाजांना अडचणीत आणले. दुखापतींमुळे मैदानाबाहेर राहिलेल्या हर्षितच्या पुनरागमनाच्या दृष्टीने ही कामगिरी महत्त्वाची ठरली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 20, 2026 | 09:14 PM
IND vs NEP : गौतम गंभीरचा लाडका गोलंदाच चमकला, 'राणा'जींनी नेपाळच्या पोरांचा घाम काढला

IND vs NEP : गौतम गंभीरचा लाडका गोलंदाच चमकला, 'राणा'जींनी नेपाळच्या पोरांचा घाम काढला

Follow Us
Follow Us:
  • नेपाळ राहिला बाजूला.. हर्षित व प्रिन्समध्येच स्पर्धा
  • दुखापतींमुळे हर्षित राणा वारंवार मैदानाबाहेर
  • हर्षित राणाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
 

IND vs NEP : दोहा येथे सुरू असलेल्या ACC Mens Asia Cup Rising Stars मधील पहिल्या सामन्यात भारत ‘ए’ने नेपाळसमोर 9 बाद 333 धावांचे आव्हान दिले खरे, पण हर्षित राणा व प्रिन्स यादव या पठ्ठ्यांनी नेपाळला खेळपट्टीवर येत, नीट बॅटही धरू दिली नाही. एकप्रकारे हा सामना पेसरची नेट प्रॅक्टीस होती की काय असा प्रश्न अनेकांना पडला.
दरम्यान, या सामन्यात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा लाडका क्रिकेटपटू म्हणून ओळख असलेल्या हर्षित राणाने (16/4) पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत भारताच्या मुख्य संघातील प्रवेशाच्या दिशेने आगेकूच केली आहे.

भारताने कर्णधार तिलक वर्मा (107) व यष्टीरक्षक कुमार कुशाग्र (117) यांच्या खणखणीत शतकांच्या जोरावर 50 षटकांत 9 बाद 332 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात नेपाळची गोलंदाजी झक्कास झाली, मग फलंदाजीतही काही चांगलं खेळतील असे वाटत होते, पण त्यांचे हे मनसुबे हर्षित राणा व प्रिन्स यादव यांनी काही पूर्ण होऊ दिले नाही.

नेपाळ राहिला बाजूला.. हर्षित व प्रिन्समध्येच स्पर्धा

हर्षित राणाने सुरुवातीचा स्पेल सावरला. अशात तिसऱ्याच चेंडूवर राणाने अर्जुन कुमलला भोपळाही फोडू दिला नाही. दुसऱ्या बाजूने प्रिन्स यादवही विकेट घेत होता. एकप्रकारे या दोघांची गोलंदाजी पाहता, नेपाळ राहिला बाजूला व हर्षित व प्रिन्समध्येच खरा सामना रंगतोय की काय असे वाटत होते. दोघेही एकामागोमाग एक विकेट घेत होते. त्यांच्या या स्पर्धेत बिचारा नेपाळचा संघ पूर्णपणे बेचिराख झाला.

वेगवान गोलंदाजीसोबतच खालच्या फळीत उपयुक्त फलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या हर्षित राणाला भारतीय संघात महत्त्वाची भूमिका देण्याची निवड समितीची योजना असल्याचे सांगितले जात आहे. त्याला एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही फॉरमॅटमध्ये संधी देण्याचा विचार सुरू आहे. मात्र, दुखापतीमुळे तो सध्या पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, निवड समिती आणि संघ व्यवस्थापन हर्षित राणाला दोन्ही फॉरमॅटमध्ये संघात घेण्यास उत्सुक आहेत. आठव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकणारा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.

दुखापतींमुळे हर्षित राणा वारंवार मैदानाबाहेर

24 वर्षीय हर्षित राणाला गेल्या काही काळात वारंवार दुखापतींचा सामना करावा लागला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला टी-20 विश्वचषकाच्या सराव सामन्यात तो जखमी झाला होता. त्यामुळे त्याला विश्वचषक स्पर्धेत खेळता आले नाही. याशिवाय, आयपीएल 2026 मध्येही त्याला सहभागी होता आले नव्हते. आयपीएलनंतर हर्षितने आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांवर पाच सामने खेळले. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. त्यानंतर जुलैपासून तो मैदानाबाहेर आहे.

गेल्या महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली होती. आशियाई खेळांसाठीच्या भारतीय संघातही त्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र, पुनर्वसनादरम्यान त्याला पुन्हा दुखापत झाली. 7 सप्टेंबर रोजी सराव सामन्यात गोलंदाजी करताना त्याच्या मांडीच्या स्नायूंवर ताण आला. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हर्षित राणाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

हर्षित राणाने आतापर्यंत भारतासाठी दोन कसोटी सामन्यांमध्ये चार विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15 सामन्यांत त्याच्या नावावर 30 विकेट्स आहेत. तर 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 16 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, त्याला न्यूझीलंड दौऱ्यावर न पाठवता रायझिंग स्टार आशिया चषकात खेळवण्याचा संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला. त्याने संघ व्यवस्थापनाच्या निर्णय योग्य ठरवत पहिल्याच सामन्यात 16 धावांवर 4 विकेट घेतल्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत 'ए' विरुद्ध नेपाळ सामन्यात हर्षित राणाची कामगिरी कशी होती?

    Ans: हर्षित राणाने 16 धावा देत 4 विकेट्स घेतल्या आणि नेपाळच्या फलंदाजीला मोठे धक्के दिले.

  • Que: हर्षित राणाला वारंवार दुखापती का झाल्या?

    Ans: त्याला यापूर्वी हॅमस्ट्रिंग आणि मांडीच्या स्नायूंशी संबंधित दुखापतींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्याला काही महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले.

  • Que: हर्षित राणाला भारतीय संघात कोणती भूमिका मिळू शकते?

    Ans: वेगवान गोलंदाजीसोबत खालच्या फळीत फलंदाजी करू शकणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला संधी देण्याचा विचार असल्याचे वृत्त आहे.

Web Title: Ind vs nep harshit rana 4 wickets rising stars asia cup 2026 rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 09:12 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • Harshit Rana
  • nepal

संबंधित बातम्या

IND Vs NEP: नेपाळचा उच्च कोटीचा फालतू खेळ; हर्षित, प्रिन्सने काढली हवा; 306 रन्सने लाजिरवाणा पराभव
1

IND Vs NEP: नेपाळचा उच्च कोटीचा फालतू खेळ; हर्षित, प्रिन्सने काढली हवा; 306 रन्सने लाजिरवाणा पराभव

Mohammed Siraj : सिराजला संघाबाहेर ठेवण्यात हिंदू-मुस्लिम अँगल नाही’; गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षकांनी फेटाळले आरोप
2

Mohammed Siraj : सिराजला संघाबाहेर ठेवण्यात हिंदू-मुस्लिम अँगल नाही’; गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षकांनी फेटाळले आरोप

क्रिकेटविश्वात खळबळ! Gautam Gambhir चा रोहित अन् विराटला टोमणा? ‘बॉलर्सच सामना जिंकवून….’
3

क्रिकेटविश्वात खळबळ! Gautam Gambhir चा रोहित अन् विराटला टोमणा? ‘बॉलर्सच सामना जिंकवून….’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.