
Balochistan Bus Accident : बलुचिस्तानमध्ये मृत्यूचा तांडव! बस-एलपीजी टँकरच्या धडकेत १० जणांचा मृत्यू
Balochistan Bus Accident : बलूचिस्तानच्या मकरान कोस्टर हायवेवर तुर्बतवरून कराचीच्या दिशेने जाणाऱ्या एका बसला एलपीजी (लिक्विफायइड पेट्रोलियम गॅस) घेऊन जाणाऱ्या एका टँकरने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, या घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 27 जण जखमी झालेत.
स्थानिक वृत्तसंस्थांनुसार ही घटना गुरुवारी पसनी आणि ओरमाराच्या जवळील बासोल येथे घडली. घटनेनंतर दोन्ही वाहनांना आग लागली, ज्यामुळे दोन्ही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली. पोलीस, बचाव पथक आणि ओरमारा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
‘द बलूचिस्तान पोस्ट’ च्या वृत्तानुसार बसमध्ये किती प्रवासी होते व नेमकं अपघात का झाला, याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. मानवाधिकार संघटना ‘बलूच यकजेहती कमिटी’ (BYC) चे सदस्य सम्मी दीन बलूच यांनी या दुःखद घटनेवर शोक व्यक्त केले आहे. त्यांनी पाकिस्तान सरकारवर बेजबाबदारपणा व उदासीनतेचा आरोप लावला आहे.
सोशल मीडिया ‘एक्स’ वर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, बलूचिस्तानच्या धोकादायक महामार्गावर, मग तो क्वेटा-कराची महामार्ग असो वा कराची-तर्बत मार्ग, येथे सलग लोकांच्या जाणाऱ्या प्राणांसाठी सरकारचा बेजबाबदारपणा आणि जनतेच्या गरजांबाबत असलेली उदासीनता स्पष्ट होते. खराब ट्रॅफिक व्यवस्थापन, कायद्यांचे पालन न होणे, असुरक्षित प्रवासी व्यवस्था आणि अनेक दशकांपासून असलेला एकेरी महामार्ग या अपघातांचे प्रमुख कारणं आहे.
ते पुढे म्हणाले की, रेकोडेक, सँदक, सुई गॅस आणि बलूचिस्तानच्या इतर संसाधनांनी दुसऱ्या प्रांतांना मोटरवे आणि कोणास ठाऊक काय काय दिले आहे, पण हे बलूच नागरिकांचे नशिब बदलू शकले नाहीत. ज्या सरकारने सीपीईसीच्या नावावर ग्वादरला अरबांना विकले, ते बलूचिस्तानच्या महामार्गांना एकेरी मार्गातून दुहेरी मार्गात परावर्तीत करणे आणि जनतेचा प्रवास सुखकर व सुरक्षित बनवण्यासाठी कोणतेच पाऊल उचलू शकलेले नाहीत.
सम्मी म्हणाले की, कोणताच महामार्ग सुरक्षित नाही. कोणत्याही प्रवाशाला आपल्या गंतव्य ठिकाणी सुरक्षित पोहचण्यासाठी कोणतीच हमी नाही. या जीवघेण्या महामार्गावर होणारे अपघात एक सलग चालणाऱ्या मानवी संकट बनले आहे.
बलूचिस्तान सरकार जरी रोज विकासाचे दावे करत असली, तरी त्यांच्याकडून असे काहीच घडताना दिसत नाही. लोक सुरक्षित प्रवासासारख्या पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत आणि अनेक कुटुंबियांना रोज आपल्या घरच्यांचे मृतदेह उचलावे लागत आहेत.
या काळात बलोच नॅशनल मुव्हमेंट (BNM) चे चेअरमन नसीम बलोच यांनी या घटनेवर चिंता व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी एक्सवर लिहिले की, ही ह्रदय पिळवटून टाकणारी घटना आहे. आमच्या महामार्गांवर प्रवास करणे आता जीवन आणि मृत्यूचा प्रश्न बनला आहे. या घटना फक्त अपघाताच्या नाहीत, तर हे सिद्ध करते की, पाकिस्तान, जी एक कब्जा करणारी सत्ता आहे, ती आमच्या प्रत्येक मोर्च्यांना संपुष्टात आणू इच्छिते.
बलूचिस्तानचे लोक स्वातंत्र, सुरक्षा, न्याय आणि एक सुरक्षित जीवनाचे हक्कदार आहेत. पण वर्तमानात लोकांचे बेपत्ता होणे, पोलिसांच्या ताब्यातील लोकांचा मृत्यू होणे अशा विचित्र घटना घडत असून याला पाकिस्तान सरकारच जबाबदार असल्याचा आरोप नसीम बलोच यांनी केला आहे.
Ans: पाकिस्तानमधील बलुचिस्तानच्या मकरान कोस्टल हायवेवर पसनी आणि ओरमारा दरम्यान असलेल्या बासोल परिसरात हा अपघात झाला.
Ans: बस आणि एलपीजी टँकरमध्ये नेमकी धडक कशी झाली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Ans: बलुचिस्तानमधील खराब महामार्ग, अपुरी वाहतूक व्यवस्था, नियमांची अंमलबजावणी न होणे आणि एकेरी महामार्ग यांमुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप मानवाधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे.