Nepal Prime Minister to visit India soon
काठमांडू : भारताचा शेजारी देश नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली शर्मा लवकरच भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येतील. सप्टेंबरच्या मध्यात हा दौरा होण्याची शक्यता आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालाने याची माहिती दिली. सध्या नेपाळमधील राजकीय अस्थिरता पाहता, आणि चीनचा नेपाळच्या राजकारणातील हस्तक्षेप पाहता ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र यामुळे चीनची धाकधुक वाढण्याची शक्यता आहे.
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लोक बहादूर छेत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान केपी ओली शर्मा यांच्या अगामी दौऱ्याची तयारी सुरु करण्यात आली. मात्र अद्याप या दौऱ्याची तारीख आणि कार्यक्रमाची योजना निश्चित झालेली नाही. परंतु सप्टेंबरपर्यंत हा दौरा होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण भारताच्या दौऱ्यावर अधिकृतद दौऱ्यावर केपी शर्मा येणार असल्याची माहिती गुप्तचर हवाल्याने दिली आहे. ही भेट दोन दिवसाची असण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, नेपाळच्या पंतप्रधानांना भारताकडून अधिकृत भेटीसाठी कोणतेही निमंत्रण मिळालेले नाही. परंतु भारताशी बिघडत चालल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे असल्याचे म्हटले जात आहे. सध्या या भेयटासाठी भारतातूनही तयारी सुरु करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. नेपाळ आणि भारतामध्ये २०२४ पासून संबंधांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहेत. भारताच्या अधिकृत नकाशात लिपुलेख सारख्या काही भागांचा समावेश होता. यावरुन ओली सरकारने वादग्रस्त विधाने केली होती. यामुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत.
याशिवाय नेपाळमध्ये सध्या राजेशाहीचे वर्चस्व वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे लोकशाही धोका निर्माण झाला आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांच्या खुर्ची देखील सध्या धोक्यात आली आहे.
गेल्या वर्षी २०२४ जुलैमध्ये नेपाळच्या पंतप्रधान पदाची ओली शर्मा यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर पारंपारिकपणे त्यांचा पहिला विदेश दौरा हा भारताला होणार होता. परंतु पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी ही परंपरा मोडली. ओली शर्मा यांनी पहिल्या परराष्ट्र दौऱ्यात चीनला भेट दिली. चिनीचे मंत्री ली केकियांग यांच्या निमंत्रणावरुन डिसेंबरमध्ये हा दौरा करण्यात आला होता. या दरम्यान पंतप्रधान केपी शर्मा यांनी पेकिंग विद्यापीठात एका समारंभाला संबोधित केले. तसेच राष्ट्रपती शी जिनपिंग आणि पंतप्रधान कियांग यांची भेट घेतली. या भेटीनंतरच चीन आणि भारतामध्ये नेपाळने चीनला प्राधान्य दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.