Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

शुक्रवारी रशिया आणि युक्रेन युद्धबंदीवर चर्चेसाठी ट्रम्प पुतिन आमने-सामने आले. यावेळी एक खळबळजनक प्रसंग घडला. यावेळी मेलानिया ट्रम्प यांचे एक पत्र स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमिर पुतिन यांना दिले.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 16, 2025 | 11:23 PM
Trump gives wife Melania letter to Putin in Alaska Meet

Trump gives wife Melania letter to Putin in Alaska Meet

Follow Us
Close
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी लिहिलेले पत्र पुतिनला दिले
  • या पत्रात रशिया युक्रेन युद्धा मुलांच्या परिस्थितीचा उल्लेख करण्यात आला
  • सध्या या पत्राची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे
Trump Putin Alaska Meet : वॉशिंग्टन : शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिरि पुतिन (Vladimir Putin) यांची अलास्कामध्ये भेट झाली. या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. ही चर्च दीर्घ वेळ सुरु होती. पण रशिया आणि युक्रेन युद्धावर कोणताही ठोस शांतता करार होऊ शकला नाही. यामुळे ही चर्चा अपयशी झाल्याचे म्हटले जात आहे. यानंतर वॉशिंग्टनमध्ये झेलेन्स्कींशी ट्रम्प भेट घेणार आहेत.

दरम्यान यावेळी एक खळबळजनक प्रसंग घडला. डोनाल्ड ट्रम्प यांनी बैठीमध्ये व्लादिमिर पुतिन यांना एक पत्र दिले. हे पत्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी लिहिलेले होते. या प्रसंगाची सध्या सर्वत्र चर्चा होत असून या पत्रामध्ये नेमकं काय लिहिले असेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यामध्ये युक्रेन युद्धात रशियाने मुलांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.

आधी थप्पड मग मारली बाटली…; पाकिस्तानमध्ये श्वानासोबत अमानवीय कृत्य, VIDEO VIRAL

मेलानिया ट्रम्प यांनी काय लिहिले आहे पत्रात?

या पत्रातील सर्व तपशील उघड करण्यात आलेले नाहीत. परंत या पत्रामध्ये युक्रेन आणि रशियामधील युद्धादरम्यान (Russia Ukraine War) मृत पावलेल्या, जखमी झालेल्या आणि अपहरण झालेल्या मुलांच्या परिस्थितीचा त्यांनी उल्लेख केला आहे. युक्रेनने आरोप केला आहे की त्यांच्या देशातील मुलांचे अपहरण करण्यात आले असून त्यांना रशियन प्रदेशामध्ये नेण्यात आआले आहे.

मेलानिया यांनी याला युद्ध गुन्हा म्हणून वर्णन केले आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या कायद्यानुसार, रशियाची ही कृती नरसंहारच्या वर्गात येते असे मेलानिया यांनी म्हटले आहे. रशियावर संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनांनी देखील २०२२ मध्ये सुरु झालेल्या युद्धात आतापर्यंत रशियाने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

बैठीदरम्यान रशियन सैन्याचा युक्रेनवर हल्ला 

या बैठीवेळीच तिकडे युक्रेनमध्ये रशियन सैन्याने कहर माजवला आहे. यक्रेनच्या दोन गावांवर रशियाने नियंत्रण मिळवले आहे. तसेच बॅलेस्टिक क्षेत्रणास्त्र आणि ड्रोन हल्लाही केला आहे.  युक्रेनच्या डोनेस्टक भागातील कोलोडियाजी आणि निप्रोपेट्रोव्स्कमधील वोरोन गावावर नियंत्रण मिळवले आहे.

बैठकीपूर्वी झेलेन्स्कींचे विधान

दरम्यान अलास्कामधील बैठकीपूर्वी युक्रेन अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी एक मोठे विधान केले होते. त्यांनी रशियाचा युद्धबंदीचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केले होते.

ट्रम्प पुतिन चर्चा असफल

ट्रम्प आणि पुतिनच्या बैठकीचा उद्देश रशिया युक्रेन युद्ध थांबवणे होता. पण या बैठकीत कोणताही ठोस निर्णय किंवा शांतता करार झाला नाही. या बैठकीनंतर ट्रम्प झेलेन्स्कींची भेट घेणार आहेत. सोमवारी (१८ ऑगस्ट) रोजी ही भेट होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी आता रशिया युक्रेन युद्ध संपवणे हे झेलेन्स्कींवर अवलंबून असल्याचे म्हटले.

Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ

Web Title: Trump gives wife melania letter to putin in alaska meet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Russia Ukraine War
  • Vladimir Putin
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

UAE Drone Attack : UAE पुन्हा हादरलं! ‘या’ महत्त्वाच्या अणुउर्जा प्रकल्पाजवळ भीषण ड्रोन हल्ला; इराणी हल्ल्याचा संशय
1

UAE Drone Attack : UAE पुन्हा हादरलं! ‘या’ महत्त्वाच्या अणुउर्जा प्रकल्पाजवळ भीषण ड्रोन हल्ला; इराणी हल्ल्याचा संशय

Hormuz Tension : भारताला मोठा दिलासा! २० हजार टन LPG घेऊन सिमी जहाज गुजरातमध्ये दाखल
2

Hormuz Tension : भारताला मोठा दिलासा! २० हजार टन LPG घेऊन सिमी जहाज गुजरातमध्ये दाखल

India Bangladesh Relations : काय आहे Farakka Treaty करार? ज्यावरुन बांगलादेश झाला आक्रमक; भारतासमोर ठेवली ‘ही’ अट
3

India Bangladesh Relations : काय आहे Farakka Treaty करार? ज्यावरुन बांगलादेश झाला आक्रमक; भारतासमोर ठेवली ‘ही’ अट

UK Politics: ब्रिटनमध्ये सर्वात मोठं राजकीय संकट! निवडणुकीत सत्तेचा पत्ता कट, ‘Epstein Files’च्या वादळात अडकले PM Keir Starmer
4

UK Politics: ब्रिटनमध्ये सर्वात मोठं राजकीय संकट! निवडणुकीत सत्तेचा पत्ता कट, ‘Epstein Files’च्या वादळात अडकले PM Keir Starmer

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.