इराण अणु चर्चा पुन्हा सुरु करण्यास तयार ((फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराण आणि इस्रायलमधील तणाव सध्या थंड पडलेला दिसत आहे. इराणच्या अणु कार्यक्रमाविरोधात या युद्धाला इस्रायलने सुरुवात केली होती. यामध्ये इराणचे मोठे नुकसान झाले. अनेक लष्करी आणि अणु शास्त्राज्ञांची हत्या करण्यात आली. या युद्धात अमेरिकेने देखील उडी घेत इराणवर हल्ला केला होता. मात्र इराण इराण मागे हटला नाही. दोन्ही देशांच्या हल्ल्यांना इराणने चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान या काळात इराण आणि अमेरिकेतील अणु चर्चा थांबली होती. युद्ध संपल्यानंतरही ही चर्चा अद्याप सुरु झालेली नाही. यामुळे इराणला चर्चा पुन्हा सुरु करण्यास तीन युरोपीय देशांनी इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने इराणला इस्तंबूलमध्ये अणु चर्चा करण्यास सुरुवात करण्याचे सांगितले आहे. यावर इराणने सहमती देखील दर्शवली असल्याची माहिती समोर आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने याची अधिकृत घोषणा देखील केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या शुक्रवारी (२५ जुलै) रोजी इस्तंबुलमध्ये ब्रिटन, फ्रान्स, इराण आणि जर्मनीमध्ये इराणच्या अणु प्रकल्पांवर चर्चा होणार आहे. ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या युरोपीय देशांनी ही चर्चा पुन्हा सुरु न झाल्यास आणि यामध्ये कोणताही निकाल न लागल्यास इराणवर निर्बंध लादण्याची धमकी दिली होती.
दरम्यान इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ही चर्चा, इराण, ब्रिटन, फ्रान्स, आणि जर्मनी यां देशांमधील उपपराष्ट्र मंत्र्यांच्या पातळीवर होणार आहे. अशी माहिती इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघाई यांनी माध्यमांना दिली आहे.
इराण आणि इस्रायल दरम्यानच्या युद्धाकाळात अमेरिकेसोबत सुरु असलेली ही चर्चा तेहरानने थांबवली होती. दरम्यान एक महिन्याने पुन्हा ही चर्चा होच आहे. यापूर्वी ही बैठक युरोपीय देशांचे परराष्ट्र मंत्री आणि युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख, तसेच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या उपस्थिती शेवटची अणु चर्चा झाली होती. या चर्चेच्या एक महिन्यानंतरही पहिलीच अणु चर्चा असणार आहे.
यापूर्वी २०१५ मध्ये ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या तीन युरोपीय देशांनी चीन आणि रशियासोबत मिळून इराणसोबत अणु करार घडवून आणला होता. मात्र अमेरिका २०१८ साली या करारातून बाहेर पडली होती. या करारांतर्गत मध्य पूर्वेतील देशांवरील काही निर्बंध हटवण्यात आले होते. या बदल्यात इराणच्या अणु कार्यक्रमांवर निर्बंध लादण्यात आले होते.
दरम्यान ब्रिटन, फ्रान्स, आणि जर्मनी या तिन्ही देशांनी इराणला पुन्हा एकदा अणु चर्चा सुरु करण्याचा इशारा दिला आहे. चर्चा सुरु न केल्यास ऑगस्टपर्यंत स्नॅप-बॅक अंतर्गत तेहरानवर संयुक्त राष्ट्रांचे निर्बंध लादण्याची धमकी देण्यात आली आहे.