Nepal Prime Minister to visit India soon
काठमांडू: नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली लवकरच भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळाली आहे. यावर्षी जुलैमध्ये ओली शर्मा दिल्लीला भेट देणार असल्याचा अंदाज आहे. ओलि शर्मा यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये नेपाळच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर पारंपारिकपणे त्यांचा हा पहिला विदेश दौरा आहे. हा पारंपारिक पहिला दौरा नेहमीच भारताचा असतो. यापूर्वी त्यांनी भारत दौऱ्यावर येण्याचा प्रयत्न केला होता. पण काही कारणास्तव ओली शर्मा यांना भारताला भेट देता आली नाही. सध्या ते लवकरच भारत भेटीवर येणार असल्याचे म्हटले जात आहे.
अहवालानुसार, गेल्या वर्षी नेपाळ आणि भारत सरकामध्ये तणावपूर्ण संबंध होते. भारताच्या अधिकृत नकाशात लिपुलेख आमि यांसारख्या काही भागांचा समावेश होता. ज्यावरुन नेपाळ सरकारने काही वादग्रस्त विधाने केली होती. यामुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले. यामुळे त्यावेळी देखील नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा होते. त्यांनी भारताला भेट न देता चीनला भेट दिली. यामुळे भारत सरकारची चिंता वाढली होती.
नेपाळचे परराष्ट्र मंत्री आरजू देउबा राणा यांनी नुकतेच भारताला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा प्रस्तावित भारत दौऱ्याबद्दल सांगतिले. तसेच भारताला त्यांचा दौरा सुरक्षित आणि यशस्वी करण्यासाठी आव्हान केले. यापूर्वी एप्रिलमध्ये बॅंकॉंच्या बिमस्टेक परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आमि केपी ओली शर्मा यांची भेट झाली होती.
२२ एप्रिल रोजी भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा नेपाळने निषेध केला होता. तसेच पंतप्रदान केपी ओली शर्मा यांनी हल्ल्यात मृत पावलेल्या निरापराध लोकांप्रती शोक व्यक्त केला तसेच त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली होती. यावेळी दोन्ही देशांतील संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून आले.
केपी ओली शर्मा यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून गेल्या वर्षी शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. तसेच भारत आणि नेपाळ संबंध मजबूत करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु केपी ओली शर्मा हे दीर्घकाळापासून चीनचे समर्थक मानले जातात. यामुळे तज्ज्ञांनी नेपाळ आणि भारताचे संबंध बिघडू शकतात अशी आशा व्यक्त केली आहे.
सध्या नेपाळमध्ये राजेशाही समर्थनार्थ आंदोलन उफाळले आहे. यामुळे नेपाळमध्ये राजकीय अराजकतेचे वातावरण आहे. अनेक लोकांनी राजेशीहीच्या समर्थानर्थ तीव्र आंदोलन केले आहे.