नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता! पुन्हा एकदा काठमांडूत राजेशाही समर्थनार्थ तीव्र आंदोलन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काठमांडू: नेपाळमध्ये गेल्या काही काळापासून राजकीय अराजकता पसरली आहे. देशात पुन्हा एकदा राजेशाही समर्थनार्थ निदर्शने काढण्यात आली. राजेशाहीच्या पुनर्स्थापनेची मागणी दिवसेंदिवस नेपाळमध्ये वाढत चालली आहे. राजधानी काठमांडू मध्ये झालेल्या निदर्शनादरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला. याअंतर्गत नेपाळचे माजी गृहमंत्री कमल थापा आणि त्यांच्यासह आणखी काही जणांना अटक करण्यात आली आहे. रविवावरी १ जून रोजी ही घटना घडली.
राजेशाहीच्या समर्थनार्थ नेपाळच्या चौर येथे चार दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. काठमांडूतील नारायण हिलटी पॅलेसभोवती ही निदर्शने झाली. या परिसरात कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा जाहीर सभा घेण्यास बंदी आहे. यामुळे या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र निदर्शकांनी या भागात घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे आंदोलनात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आली आहे.
काठमांडूच्या घाटी पोलिस प्रवक्ते एपिल बोहोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरपीपीचे अध्यक्ष आणि कट्टर राजेशाही समर्थक राजेंद्र लिंगडेन यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन सुरु होते. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचा सुरक्षा घेरा तोडला आणि पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी लिंगडेन आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
गृहमंत्री थापा आणि इतर निदर्शकांना नारायणहिटी पॅलेस संग्रहायलजवळच्या प्रतिबंधित क्षेत्राचे उल्लंघन केले. यामुळे त्यांनाही पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतेले. या आंदोलनात जवळपास १२०० राजेशाही समर्थकांनी सहभाग घेतला होता.
माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांच्या समर्थनार्थ निदर्शकांनी जोरदार घोषण दिल्या. त्यांनी लोकशाही विरोधात आणि राजेशाही समर्थनार्थ नारेबाजी केली. तसेच सत्तेवर असलेल्या के. पी. शर्मा आली यांच्या सरकारविरोधातही नाराजी व्यक्त करण्यात आली.
नेपळाध्ये पुन्हा राजेशाही व्यवस्था लागू व्हावी अशी मागणी निदर्शकांकडून केले जात आहे. तसेच नेपाळला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याचीही मागणी केली जात आहे. सध्या राजेशाही आणि लोकशाही संघर्ष सुरु आहे. यामुळे आगामी काळात नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी देखील मार्च महिन्यात राजेशाही समर्थनार्थ आंदोलन काढण्यात आले होते. या आंदोलनाने हिंसक रुप घेतले होते.यामुळे नेपाळचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या आंदोलनांतर्गतव नेपाळचे माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांना दंड ठोठावण्यात आला होता.