Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळच्या राजकारणात ट्विस्ट! पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून सुशीला कार्की आऊट अन् कुलमन घिसिंग इन?

Neapl Interim PM : नेपाळमध्ये अराजकता पसरलेली आहे. पंतप्रधान ओली शर्मा आणि सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. सध्या नवे अंतरिम सरकार स्थापना करण्यासाठी देशात हालचाली सुरु आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 11, 2025 | 03:04 PM
Nepal protest news gen z kulman dhising sushila karki withdraw name

Nepal protest news gen z kulman dhising sushila karki withdraw name

Follow Us
Close
Follow Us:
  • नेपाळच्या राजकारणात ट्विस्ट
  • अंतरिम पदासाठीचे नाव सुशीला कार्की यांनी घेतले मागे?
  • कुलमन सिंग यांचे नाव चर्चेत

Nepal Political News in Marathi : काठमांडू : भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये सध्या अराजकता पसरली आहे. सोशल मीडियावरील बंदीमुळे Gen Z तरुणांनी ओली सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले होते. तसेच संपूर्ण सरकारही उलटून टाकण्यात आले आहे. सध्या नवी सरकार कधी तयार होणार, कोण होणार पंतप्रधान यावर चर्चा सुरु आहे. यात नेपाळच्या महिला सर न्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव समोर येत होते.  पण आता यामध्ये एक वेगळा ट्विस्ट आला आहे. सुशीला कार्की यांनी आपले नाव मागे घेतले असल्याचे सांगितले जात असून, त्यांच्या जागी आता कुलमन घिसिंग यांचे नाव पुढे येत आहे.

Sushila Karki : नेपाळच्या माजी सरन्यायाधीश बनणार अंतरिम पंतप्रधान? कोण आहेत सुशीला कार्की ज्यांचा भारताशीही संबंध

सुशीला कार्की यांना पंतप्रधान बनवण्यासाठी Gen Z सहमत

खरं तरं नेपाळमध्ये Gen Z तरुणांनी निदर्शनांमध्ये सर्व राजकीय दृश्य बदलून टाकले आहे. केपी ओली शर्मा यांनी राजीनामा दिला असून नव्या अंतरिम सरकाची स्थापन सुरु आहे. यावेळी निदर्शकांना नेपाळच्या माजी महिला सरन्यायाधीश सुशीला कार्की यांना पंतप्रधान बनवायचे असा दावा समोर आला होता. हा दावा नेपाळच्या सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या सचिवांनी केला होता.

यानंतर अंतरिम सरकार स्थापन करण्यासाठी आणि प्रमुखाची निवड करण्यासाठी एक व्हर्च्युअल बैठकीचे आयोजन करण्यात आली. यात पाच हजार Gen Z तरुणांनी सहभाग घेतला होता. यावेळी सुशीला कार्की यांना पंतप्रधान बनवण्यासाठी पाठिंबाही देण्यात आला. परंतु यामध्ये एक वेगळेच वळण आले असून आता Gen Z तरुणांनीच कुलमन घिसिंग यांचे नाव पुढे केले असल्याचे म्हटले जात आहे.

कसे आले कुलमन घिसिंग यांचे नाव ? 

सांगितले जात आहे, Gen Z चा हा युटर्न व्हर्च्युअल बैठक आणि त्यांच्या आपापसांतील वादाचा परिणाम आहे. सुशीला कार्की यांच्यापूर्वी काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांना पतंप्रधान बनवण्याची मागणी केली जात होती. पण व्हर्च्युअल बैठकीनंतर सुशील कार्की यांचे नाव आघाडीवर आले. मिळालेल्या माहितीनुसार, बालेंद्र शाह यांनी स्वत: कार्की यांचे नाव सुचवले होते. याला Gen Z नी पाठिंबाही दिला होता.

परंतु सुशीला यांनी आापले नाव मागे घेतले असल्याचे म्हटले जात आहे. सुशीला कार्की या नेपाळच्या पहिल्या महिला सर न्यायाधीश आहेत. त्या त्यांच्या प्रामाणिकपण आणि भ्रष्टाचारविरोधी भूमिकेमुळे ओळखल्या जातात. पण सुशीला कार्की तरीही पंतप्रधान होऊ इच्छित नाही. यासाठी त्यांनी लष्करप्रमुखांकडे विनंती करुन आपले नाव मागे घेतले आहे. यामुळे त्यांच्या जागी आता कुलमन घिसिंग यांचे नाव समोर येत आहे.

बैठकीत घेतला निर्णय

गुरुवारी (11 सप्टेंबर) अंतरिम सरकारच्या स्थापनेसाठी शेवटची बैठक पार पडली. यावेळी कार्की यांना पंतप्रधान बनवणाचा शेवटचा निर्णय घेण्यात येणार होता. पण काही Gen Z तरुणांनी यावर आक्षेप घेतला. सुशीला कार्की यांच्या वयावर आणि त्यांना राजकीय अनुभव नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी विरोधकांनी कुलमन घिसिंग यांचे नाव सुचवले.

कोण आहेत कुलमन घिसिंग? 

कुलमन घिसिंग यांना नेपाळमध्ये लोडशेडिंगची समस्या दूर करणारे हिरो म्हटले जाते. त्यांचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही, परंतु त्यांना एक उत्तम अधिकारी म्हणून ओळखले जाते.  कुलमन घिसिंग हे नेपाळमधील उर्जा क्षेत्रात सुधारणा करतील तसेच भ्रष्टाचारही संपवतील असे म्हटले जात आहे. यामुळे लष्करप्रमुखांनीही यावर सहमती दर्शवली आहे. तसेच जनरल-झेडचाही विश्वास आहे की घिसिंग देशात शांतात प्रस्थापित करु शकतात.

Photo : नेपाळची धुरा महिला नेत्याकडे? कोण आहेत पंतप्रधानपदी आघाडीवर असलेल्या सुशीला कार्की

Web Title: Nepal protest news gen z kulman dhising sushila karki withdraw name

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • Nepal News
  • Nepal Violence
  • World news

संबंधित बातम्या

नेपाळमध्ये हेलिकॉप्टरला लटकताना दिसले मंत्री; तर शॉपिंग मॉल लुटताना लोक अन् हिंसक जमाव, भयावह Video Viral
1

नेपाळमध्ये हेलिकॉप्टरला लटकताना दिसले मंत्री; तर शॉपिंग मॉल लुटताना लोक अन् हिंसक जमाव, भयावह Video Viral

नेपाळमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतात अलर्ट; उत्तर प्रदेशसह बिहार, उत्तरखंडात पोलिसांचा फौजफाटा तैनात
2

नेपाळमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतात अलर्ट; उत्तर प्रदेशसह बिहार, उत्तरखंडात पोलिसांचा फौजफाटा तैनात

Photo : नेपाळची धुरा महिला नेत्याकडे? कोण आहेत पंतप्रधानपदी आघाडीवर असलेल्या सुशीला कार्की
3

Photo : नेपाळची धुरा महिला नेत्याकडे? कोण आहेत पंतप्रधानपदी आघाडीवर असलेल्या सुशीला कार्की

Nepal Unrest : India-Nepal सीमा सील, मैत्री बस सेवा बंद; भारताने घेतला कठोर निर्णय
4

Nepal Unrest : India-Nepal सीमा सील, मैत्री बस सेवा बंद; भारताने घेतला कठोर निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.