एपस्टाईन फाइल्समध्ये PM मोदींचे नाव; भारताने अमेरिकेला सुनावले खडेबोल; जाणून घ्या काय आहे 'त्या' ईमेलचे सत्य ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
PM Modi mention in Epstein files 2026 : जगभरातील बड्या हस्तींची झोप उडवणाऱ्या ‘जेफ्री एपस्टाईन’ (Jeffrey Epstein) फाइल्सने आता भारतीय राजकारणात मोठे वादळ निर्माण केले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने ३० जानेवारी २०२६ रोजी तब्बल ३५ लाख पानांचा दस्तऐवज आणि हजारो व्हिडिओ सार्वजनिक केले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या २०१७ च्या ऐतिहासिक इस्रायल भेटीचा उल्लेख असलेला एक ईमेल समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भारत सरकारने यावर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली असून, हे सर्व दावे ‘बिनबुडाचे’ असल्याचे स्पष्ट केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शनिवारी (३१ जानेवारी) रात्री उशिरा एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यांनी म्हटले की, “आम्ही तथाकथित एपस्टाईन फाइल्समधील ईमेलचे वृत्त पाहिले आहे. पंतप्रधान मोदींची २०१७ ची इस्रायल भेट ही अधिकृत आणि ऐतिहासिक होती, हे सत्य आहे. मात्र, त्या ईमेलमधील इतर सर्व दावे हे एका शिक्षा झालेल्या गुन्हेगाराच्या (एपस्टाईन) फालतू विचारांपेक्षा (Trashy Ruminations) जास्त काही नाहीत. अशा विधानांना आम्ही तिरस्काराने फेटाळून लावतो.”
Statement by the Official Spokesperson to clarify certain reports: We have seen reports of an email message from the so-called Epstein files that has a reference to the Prime Minister and his visit to Israel. Beyond the fact of the Prime Minister’s official visit to Israel in… pic.twitter.com/ZOZSwE1AZA — Randhir Jaiswal (@MEAIndia) January 31, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताचे तेल धोरण Trump ठरवणार का? ‘व्हेनेझुएला डील’वरून काँग्रेसचा Modi सरकारवर घणाघात; ‘ऑपरेशन सिंदूर’वरही विचारले बोचरे प्रश्न
या प्रकरणावरून देशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा वाद सुरू झाला आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “एका बाललैंगिक अत्याचार करणाऱ्या आणि गुन्हेगाराने भारतीय पंतप्रधानांबद्दल असे लिहिणे ही देशासाठी राष्ट्रीय लज्जास्पद बाब आहे. सरकारने यावर मौन न बाळगता स्पष्टीकरण द्यावे.”
यावर भाजपने तात्काळ प्रत्युत्तर दिले. भाजप नेते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर ‘ईमेलमध्ये फेरफार’ केल्याचा आरोप केला. पात्रा म्हणाले की, “काँग्रेसने मूळ ईमेलमध्ये ‘his advice’ (त्याचा सल्ला) हे शब्द स्वतःहून टाकले आहेत, जे मूळ दस्तऐवजात नाहीत. हा काँग्रेसचा ‘फ्रॉड’ असून पंतप्रधानांची प्रतिमा मलीन करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे.”
It is a matter of national shame that Jeffery Epstein – a convicted human trafficker, child sex offender and serial rapist from the USA – wrote that the Prime Minister Narendra Modi took his “advice and danced and sang in Israel for the benefit of the US president. They had met a… pic.twitter.com/3jRXjGLNsS — Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) January 31, 2026
credit – social media and Twitter
मिळालेल्या माहितीनुसार, जेफ्री एपस्टाईनने २०१७ मध्ये एका कतारी अधिकाऱ्याला ईमेल पाठवला होता. त्यात त्याने दावा केला होता की, “पंतप्रधान मोदींनी इस्रायल भेटीचे नियोजन करण्यासाठी सल्ला घेतला होता आणि त्यांनी इस्रायलमध्ये अमेरिकन अध्यक्षांच्या फायद्यासाठी ‘गाणे आणि नृत्य’ (Danced and Sang) केले.” अमेरिकन तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे की, एपस्टाईन अनेकदा बड्या लोकांशी आपले संबंध असल्याचे ‘बढाया’ मारत असे आणि हे ईमेल त्याच प्रवृत्तीचा भाग असू शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Scandal : Epstein Filesचा महास्फोट! 30 लाख कागदपत्रात मीरा नायर सहित ‘या’ दिग्गजांची नावे; इलॉन मस्कचेही गुपित उघड
पंतप्रधान मोदींची जुलै २०१७ मधील इस्रायल भेट ही स्वतंत्र भारताच्या इतिहासात कोणत्याही भारतीय पंतप्रधानांची पहिलीच इस्रायल भेट होती. या भेटीमुळे भारत आणि इस्रायलमधील संबंध एका नवीन उंचीवर पोहोचले होते. संरक्षणापासून कृषी क्षेत्रापर्यंत अनेक महत्त्वाचे करार यावेळी झाले होते. आता नऊ वर्षांनंतर एका गुन्हेगाराच्या ईमेलमुळे या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याने भारताने यावर कठोर पवित्रा घेतला आहे.
Ans: एका २०१७ मधील ईमेलमध्ये जेफ्री एपस्टाईनने दावा केला होता की पंतप्रधानांनी इस्रायल दौऱ्यासाठी सल्ला घेतला होता. भारताने हा दावा एका गुन्हेगाराचा बडबडाट असल्याचे सांगून फेटाळला आहे.
Ans: परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा पूर्णपणे अधिकृत होता आणि ईमेलमधील इतर सर्व दावे चुकीचे आणि निंदनीय आहेत.
Ans: तो एक अमेरिकन अब्जाधीश आणि सिद्धदोष लैंगिक गुन्हेगार होता, ज्याचा २०१९ मध्ये न्यूयॉर्कच्या तुरुंगात मृत्यू झाला.






