Nepal's largest Bhat-Bhateni Supermarket looted 1 crore damages
काठमांडू: नेपाळमध्ये 28 मार्च 2025 रोजी राजोशाही समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. या हिसांचारात मोठ्या प्रमाणावर जाळपोळ, लुटमार आणि तोडफोड करण्यात आली. या मध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आणि 100 हून अधिक लोक जखमी झाले.दरम्यान काठमंडूतील कोटेश्वर भागातील भाट-भटेनी सूपमार्केटची मोठ्या प्रमाणावर लुट , तोडफोड झाली. या घटनेने संपूर्ण नेपाळला हादरवून सोडले आहे. हे सूपरमार्केट नेपाळच्या सर्वामोठ्या बाजारपेठांपैकी मानले जाते. या मार्केटमध्ये दररोज हजारो ग्राहक खरेदीसाठी येतात. मात्र या हिंसक घटनेमुळे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे व्यपारी आणि स्थानिक रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
भाट-भटेनी सुपरमार्केटचे मुख्य परिचालन अधिकरी (COO ) पान पौडेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तोडफोडीत सुमारे 80 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवाय 64.88 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, ब्रँडेड उत्पादने आणि अनेक मौल्यवान वस्तूंची लूट झाली आहे. तसेच सुपरमार्केटच्या बाहेरील काचेचे पॅनेल्स फोडण्यात आले आहे. यामुळे इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.
COO पौडेल यांच्या मते, नुकसानीचे संपूर्ण मूल्यमापन करणे अद्याप सुरु आहे. प्राथमिक अंदाजानुसार, काचेट्या पॅनेल्सच्या तोडफोडीने 11.85 लाख रुपयांचे नुकसानी झाले आहे. शिवाय, शोकेस आणि सजावटीच्या वस्तूची तोडफोडीमुळे 2.65 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुपरमार्केटच्या काउंटरमधून सुमारे 94 हजार रुपये रोख चोरीला गेले आहेत. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांच्या अपयशयामुळे हे सर्व घडले असल्याचे व्यापारांनी म्हटले आहे.
स्थानिक पोलिस आणि काठमांडू व्हॅली क्राइम इन्व्हेस्टिगेशन कार्यलयाने या घटनेवर कारवाई सुरु असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत 9 संशयितांना अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी आणि रविवारी या अटकसत्रेला गती मिळाली. सध्या पोलिसांचा लुटमारीच्या घटनेत सहभागी असलेल्या लोकांचा शोध सुरु आहे.
या घटनेत सर्वात धक्कादायक बाबा म्हणजे लुटपाट आहे. राजेशाही समर्थकांच्या निदर्शनांदरम्यान ही लुटपाट करण्यात आली. आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार आणि अराजकतेला चालना दिली जात आहे. यामुळे व्यपारी आणि व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या घटनेनंतर नेपाळ सरकारवर कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर कडक उपायोजना करण्याचा दबाव वाढत आहे. व्यापाऱ्यांनी अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याची मागणी केली आहे.
या घटनेनंतर केपी ओली शर्मा यांच्या सरकारने हिंसाचारात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नेपाळचे माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांना दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच राजेशाही समर्थकांना 3 एप्रिलपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. सध्या या हिंसाचारामुळे राजेशाही समर्थक आणि सरकारमध्ये तणावाचे वातावरण आहे.