Netnyahu call's Palestine state recognition absubrd prize of terrorism
Benjamin Netnyahu on Palestine : जेरुसेलम : सध्या पॅलेस्टिनींच्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी जोर धरत आहे. आतापर्यंत ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाने याला मान्यता दिली आहे. जपानने देखील यासाठी सहमती दर्शवली होती, पण यातून माघार घेतली आहे. याच वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netnyahu) यांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणाऱ्या देशावर संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी या देशांवर दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचाही गंभीर आरोप केला आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आंतरराष्ट्रीय नेत्यांवर टीका करत, पॅलेस्टाईनाल स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणे हे दहशतवादाला पाठिंबा देण्यासारखे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी कठोर शब्दात सांगितले आहे की, ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर भयानक हल्ला झाला होता, आणि तहीरी पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणे हे दहशतवाद्यांसाठी मोठे बक्षीस आणि जगासाठी घातक ठरेल असे म्हटले.
पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करण्याला नेत्याहूंनी तीव्र विरोध दर्शवल आहे. तसेच त्यांनी पश्चिम किनाऱ्यावरील ज्यू वसाहतीच्या विस्तावराचाही उल्लेख केला आहे. त्यांना म्हटले की, गेल्या अनेक काळापासून देशांतर्गत आणि परकीय दबावाला न जुमानता इस्रायलने दहशतवादा रोखले आहे. यासाठी इस्रायल वचनबद्ध आहे.
Charlie Kirk Murder: चार्ली कर्कच्या पत्नी एरिकाने केले त्याच्या हल्लेखोराला माफ; म्हणाली…
ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्रिटनच्या पॅलेस्टाइनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून औपचारिकपण मान्यता दिल्याच्या घोषणेनंतर नेतन्याहूंची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. तसेच इस्रायली सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी यांनी म्हटले आहे की, सध्या गाझात इस्रायली सैन्याने कारवाया तीव्र केल्या आहेत. त्यांचे सैन्य हमासला उद्ध्वस्त करण्यासाठी दहशतवाद्यांशी लढत आहे.
तसेच ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांनी सांगितले की, इस्रायलने गाझातील नागरिकांसाठी मदतीचे मार्ग खुले केले आहे. लोकांपर्यंत अन्न-पदार्थ, गरजेच्या वस्तू पोहोचवल्या जात आहे. आता पर्यंत गाझातील ५० हजारांहून अधिक लोक सुरक्षित ठिकाणी पोहोचले आहे. त्यांनी सांगितले की, केरेम शालोम सीमा क्रॉसिंगवर हजारो तंबू आणि मदत साहित्य पोहोचवले जात आहे. संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना दिले जाईल आणि ते लोकांपर्यंत पोहोचवतील.
FAQs(संबंधित प्रश्न)
पॅलेस्टाईनला कोणत्या देशांनी दिली स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता?
पॅलेस्टाईनला ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्रिटनने स्वतंत्र राष्ट्र म्हणून औपचारिकपणे मान्यता दिली आहे.
बेंजामिन नेतन्याहू यांनी जागतिक नेत्यांवर का केला संताप व्यक्त?
पॅलेस्टाईनला स्वंतत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली जात असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तीव्र संताप व्यक्त केल आहे.
नेतन्याहूंनी जागतिक नेत्यांवर काय आरोप केला?
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जागतिक नेत्यांवर दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
‘PoK हा भारतातच….,’ भारतीय संरक्षण मंत्र्यांचा मोरोक्कोच्या भूमीवरुन पाकिस्तानला कडक इशारा