New crisis on ISKCON in Bangladesh Bank accounts of 17 people including Chinmoy Krishna frozen
ढाका : बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये हिंदूंवरील हिंसाचार आणि दडपशाहीची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. ताज्या वादात, बांगलादेश बँकेच्या फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिटने (BFIU) अटक केलेल्या हिंदू संत चिन्मय कृष्ण दास आणि इस्कॉनच्या 16 सदस्यांवर मोठी कारवाई केली आहे. बांगलादेशमध्ये इस्कॉनवर बंदी घालण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला असला, तरी त्यावर संकटाचे ढग दाटून येत आहेत. कट्टरवाद्यांच्या दबावाखाली काम करणाऱ्या इस्कॉनवर अंतरिम सरकारच्या काळात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
समित सनातनी जागरण जोटचे प्रवक्ते चिन्मय कृष्ण दास आणि इस्कॉनच्या १६ सदस्यांची बँक खाती जप्त करण्यात आली आहेत. बांगलादेश बँकेच्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने (BFIU) देशातील बँका आणि वित्तीय संस्थांना यासंदर्भात सूचना पाठवल्या आहेत. बीएफआययूच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे.
व्यवहार 30 दिवसांसाठी स्थगित
देशभरातील बँकांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, ज्या लोकांची खाती जप्त करण्यात आली आहेत, त्यांच्याशी संबंधित सर्व व्यवसायांची बँक खातीही निलंबित करण्यात येणार आहेत. या आदेशानुसार, यापैकी कोणीही पुढील 30 दिवस कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू शकणार नाही. BFIU ने म्हटले आहे की आवश्यक असल्यास, व्यवहार निलंबित करण्याचा हा कालावधी वाढविला जाईल.
जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बांगलादेशातील ISKCONला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
इस्कॉनच्या 16 जणांची बँक खाती जप्त
चिन्मय कृष्णा दास व्यतिरिक्त, इस्कॉन बांगलादेशच्या 16 सदस्यांची बँक खाती जप्त करण्यात आली आहेत, ज्यांची खाती जप्त करण्यात आली आहेत त्यात कार्तिक चंद्र डे, अनिक पाल, सरोज रॉय, सुशांत दास, विश्व कुमार सिंग, चंडीदास बाला, जयदेव कर्माकर, लिपी राणी कर्माकर, सुधामा गौर यांचा समावेश आहे. आहेत. याशिवाय लक्ष्मण कांती दास, प्रियतोष दास, रुपन दास, रुपन कुमार धर, आशिष पुरोहित, जगदीश चंद्र अधिकारी आणि सजल दास यांची खातीही जप्त करण्यात आली आहेत.
जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्कॉनलाच का केले जात आहे टार्गेट? जाणून घ्या कट्टरपंथी का करत आहेत विरोध
मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत कारवाई- BFIU
व्यवहार स्थगित करण्यासाठी या आदेशावर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी लागू होतील, असे BFIU ने म्हटले आहे. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटच्या पत्रात ज्यांची खाती निलंबित करण्यात आली आहेत त्या सर्वांची नावे आणि राष्ट्रीय ओळखपत्रे आहेत. बँका आणि वित्तीय संस्थांना पाठवलेल्या पत्रात या लोकांच्या खात्याशी संबंधित माहिती किंवा कागदपत्रे जसे की खाते उघडण्याचा फॉर्म, केवायसी आणि निलंबित खात्यांच्या व्यवहारांची माहिती बीएफआययूला दोन दिवसांत देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.