
Bangladesh Violence
हे देखील वाचा : दीपू दासच नव्हे, सहा महिन्यांत ५० हून अधिक हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार; बांगलादेशातील धक्कादायक वास्तव उघड
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध झालेल्या कथित हिंसाचार आणि हत्येच्या अलीकडील घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि अधिकाऱ्यांना निष्पक्ष चौकशी करून गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले आहे. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते एस.एम. महबुबुल आलम म्हणाले की, भारतातील विविध भागांमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चनांसह अल्पसंख्याकांना लक्ष्य करून क्रूर हत्याकांड, जमावाकडून होणारा हिंसाचार, मनमानी अटक आणि धार्मिक समारंभांमध्ये व्यत्ययः आणल्याच्या बातम्या चिंताजनक आहेत. बांगलादेशने भारतातील काही भागांमध्ये नाताळ सणादरम्यान घडलेल्या घटनांचाही उल्लेख केला आणि चिंता व्यक्त केली, त्याला हिंसाचार म्हणून वर्णन केले.
बागलादेशने या प्रकरणामध्ये भारताने कठोर कारवाई केली, हे नमूद करण्याकडे दुर्लक्ष केले. बांगलादेशमध्ये हिंदूंची हत्या झाली, तरी कठोर कारवाई केली नाही. आलम यांनी ख्रिसमसच्या वैळी घडलेल्या घटनांना द्वेषपूर्ण गुन्हे आणि जाणूनबुजून होणारी हिंसाचार म्हणून वर्णन केले, ते म्हणाले, ‘आम्हाला आशा आहे की, भारतातील संबंधित अधिकारी या घटनांची निष्पक्ष चौकशी करतील आणि गुन्हेगारांना शिक्षा होईल याची खात्री करतील.”
गेल्या काही काळात बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बांगलादेशच्या अल्पसंख्याकांसाठीच्या मानवाधिकर काँग्रेसने (HRCBM) ने दिलेल्या माहितीनुसार, जून ते डिसेंबरदरम्यान ५० हून अधिक हिंदू अत्याचाराच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये कट्टपंथी गटांकडून हिंदूना मारहाण, हत्या, घरे-दुकानांची तोडफोड-जाळफोळ, मंदिरे उद्ध्वस्त करणे आणि पोलिसांकडून अटकेच्या घटनांचा समावेश आहे. ईशनिंदाच्या खोट्या आरोपांखाली हिंदूंवर अत्याचार केला जात आहे. बांगलादेशने या सर्व घटनांवर मौन पाळले आहे.
हे देखील वाचा : Osman Hadi च्या हत्येनंतर बांगलादेशात आंदोलन तीव्र; इंकलाब मंचचा सरकारला मोठा इशारा
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.