New rules for 2025 Hajj No children allowed, know the updated policies
रियाध: 2025 च्या हज यात्रेसाठी सौदी अरेबियाने नवे कडक नियम लागू केले आहेत. यामुळे अनेक भाविकांना अडचणी येऊ शकतात. या नव्या नियमांनुसार हज यात्रेत लहान मुलांना आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच सौदीने सिंगल एन्ट्री व्हिसा आणि हप्त्यांमध्ये पेमेंट यांसारख्या अटींचा समावेश केला आहे. सौदी अरेबिया सरकारने हा निर्णय हज यात्रेसाठी होणार गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी घेतल्याचे सांगितले आहे, मात्र यामुळे अनेक भाविक निराश झाले आहेत.
मुलांवर बंदी
हे नियम 14 जानेवारीपासून लागू होणार आहेत. तसेच सौदी अरेबिया सरकारने या हज यात्रेत मुलांना सोबत आणण्यास बंदी घातली आहे. यामागे गर्दी कमी करणे आणि सुरक्षा सुनिश्चित करणे हा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या निर्णयामुळे आपल्या मुलांसोबत हज करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबांमध्ये नाराजी पसरली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- शांतता करार फक्त नावालाच; चर्चेपूर्वीच झाला युक्रेनवर मिसाइल हल्ला
सिंगल एन्ट्री व्हिसा
2025 च्या हज यात्रेसाठी सौदी अरेबियाने आणखी एक महत्त्वपूर्ण बदले केला आहे, तो म्हणजे सिंगल-एंट्री व्हिसा. हा नियम 14 देशांवर लागू करण्यात आला आहे, यामध्ये भारताचाही समावेश आहे. या व्हिसामुळे आता भाविकांना केवळ एकदाच सौदी अरेबियात प्रवेश करता येणार आहे. यामुळे हज यात्रेची योजना बनवणे अधिक अवघड होणार आहे.
हप्त्यांमध्ये पेमेंट
तसेच सौदी अरेबियाने यामध्ये हप्त्यांमध्ये पेमेंट करण्याची एक नवी प्रणाली लागू केली आहे. हप्ते वेळेत न भरल्यास भाविकांच्या प्रवासात अडचणी निर्माण होऊ शकतात. या प्रणालीमुळे प्रवास अधिक सुव्यवस्थित होईल, मात्र काही जणांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
नवीन नियमांचा तीव्र विरोध
या नव्या नियमांवर भाविकांच्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांनी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यावर धार्मिक कर्तव्यांपेक्षा आर्थिक फायद्याला प्राधान्य देत असल्याचा आरोप केला आहे. तर काहींनी या नियमांचे समर्थन केले आहे. गेल्या वर्षीच्या 2024च्या हज यात्रेत प्रचंड उष्णतेमुळे हज दरम्यान झालेल्या हजाराहून अधिक मृत्यूनंतर या नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे सौदीने अरेबियाने सांगितले आहे.
या कडक नियमांमुळे वीजा-मुक्त प्रवास आणि धार्मिक पर्यटनावरही परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. तसेच याचा सर्वात जास्त फटका भारतीयांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक भाविकांनी या नव्या नियमांविषयी नाराजी दर्शवली आहे.