'...यामुळे युरोपलीही फायदा होईल'; ग्रीस संरक्षण मंत्र्यांचे भारताबाबत महत्त्वपूर्ण विधान (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
एथेंस: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौरा लवकरच सुरु होईल. यादरम्यान ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहे. दरम्यान त्यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी ग्रीसचे संरक्षण मंत्री निकोस डेंडियास यांनी भारताबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी भमध्या सागर आणि लाल सागरात भारताने महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रांमध्ये प्रमुख भूमिका बजवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. जागतिक शक्ती म्हणून उद्यास येत असलेल्या भारताचे कौतुक निकोस यांनी केले असून भारताला ग्रीसचा निष्ठावान मित्र म्हणून संबोधले आहे.
भारतीय अर्थव्यवस्था जागतिक ताकद
निकोस यांनी म्हटले की, “भारतीय अर्थव्यवस्थेने मोठी प्रगती साधली असून आता या मोठ्या देशाने जबाबदाऱ्या उचलायला हव्यात. भारत आता मोठी जागतिक ताकद बनला आहे, यामुळे त्याला भूमध्य सागर आणि लाल सागर या भागात महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल.” ग्रीस भारताच्या लष्करी शक्तीला भूमध्य सागर, युरोप आणि जगात महत्त्वाचे स्थान मिळावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.
ग्रीसचे अमेरिका-भारत संबंधावर लक्ष
याशिवाय, ग्रीस भारत-अमेरिका संबंधांवरही बारीक लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार असल्याचे निकोस यांनी सांगितले. 12-13 फेब्रुवारी रोजी ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून नरेंद्र मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. हा दौरा ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात मोदी यांच्यासोबतची पहिली अधिकृत बैठक असेल.
दरम्यान ट्रम्प यांना भेटण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी पॅरिसमधे AI समिटदरम्यान अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेंस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भारत आणि अमेरिकेच्या परस्पर हितांवर यावेळी व्यापक चर्चा झाली. अमेरिकन ऊर्जा तंत्रज्ञानाच्या मदतीने भारताला ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्याचा मुद्दाही यावेळी समोर आला. या बैठकीनंतर वेंस, त्यांची पत्नी उषा वेंस, आणि पंतप्रधान मोदी यांचे फोटो प्रसिद्ध झाले. मोदींनी वेंस यांच्या मुलाला विवेक याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि वेंस कुटुंबासाठी अनेक भेटवस्तूही दिल्या.
सोशल मीडियावर पोस्ट
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही भेट सुंदर असल्याचे नमूद केले आणि वेंस कुटुंबासोबत वेळ घालवण्यात आनंद झाल्याचे सांगितले. वेंस यांनीही नरेंद्र मोदी यांच्या उबदार स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या मैत्रीपूर्ण भेटीमुळे भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.