New Wildfire broke out in north of Los Angeles 10,000 acres burned, people ordered to leave homes
कॅलिफोर्निया: अमेरिकेत कॅलिफोर्नियात पुन्हा एकदा आगीचा तांडव सुरु झाला आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरु असलेली आगे पुन्हा एकदा भडकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग लॉस एंजेलिसच्या उत्तरेकडील ह्यूजेस भागात लागली असून या आगीत सुमारे १०,००० एकर क्षेत्र जळून खाक झाले आहे. प्रशासनाने ५० हजार लोकांना घरे सोडण्याचे आदेश दिले आहे.
अग्निशमक दल तैनात
इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कॅस्टेइक लेकजवळ लागलेली ही आग विझवण्यासाठी अग्निशमक दल तैनात करण्यात आले आहे. या भागात ४८ किमी प्रति तास वेगाने वारे वाहत आहेत. आग प्रचंड वेगाने पसरत असून दर 3 सेकंदाला फुटबॉल मैदानाएवढा परिसर जळून खाक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी ( 22 जानेवारी) स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:४५ वाजता ही आग लागली.
यापूर्वी 7 जानेवारी रोजी लॉस एंजेलिसच्या दक्षिणेकडील जंगलात आग लागली होती. या आगीत 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. आत्तापर्यंत आगीमुळे पॅलिसेड्स, ईटन, केनेथ आणि हर्स्ट या भागांमध्ये आगीचा मोठा परिणाम झाला आहे. यामुळे केवळ लोकांची घरेच नव्हे तर मशिदी, चर्च आणि आराधनालयांसराखे धार्मिक स्थळेही नष्ट झाली आहेत. अनेक सेलिब्रिटींची घरे देखील आगीत जळाली आहे. या आगीमुळे शैक्षणिक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे.
50 वर्षांपासून कॅलिफोर्नियात दुष्काळ
गेल्या 50 वर्षांपासून कॅलिफोर्निया दुष्काळाचा सामना करत आहे. या परिसरात ओलावा कमी आहे. तसेच अमेरिकेचे हे राज्य इतर भागांपेक्षा अधिक उष्ण आहे. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात या ठिकाणी जंगलातील भागत आग लागल्याच्या घटना वारंवरा घडत आहे. गेल्या काही महिन्यात प्रचंड उष्णतेमुळे या भागांत प्रत्येक हंगामात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
आत्तापर्यंत कॅलिफोर्नियाच्या जंगलांमध्ये ७८ हून अधिक वेळा आगीतने तांडव केला आहे. यामुळए जंगलाजवळील निवसी क्षेत्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसन झाले आहे. आत्तापर्यंत १९३३ मध्ये लॉस एंजेलिसमधील ग्रिफिथ पार्कला लागलेली आग ही कॅलिफोर्नियातील सर्वात भीषण आग होती. या आगीत सुमारे ८३ हजार एकर क्षेत्र जळून खाक झाले होते. सुमारे ३ लाख लोकांना आपले घर सोडून इतर शहरांमध्ये जावे लागले.