New York Times controversy : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या वृत्तांकनामुळे न्यू यॉर्क टाईम्स (New York Times) या प्रतिष्ठित अमेरिकन दैनिकावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला, आणि संपूर्ण देश शोकाकुल झाला. भारत सरकारने तसेच देशातील प्रमुख सुरक्षा तज्ज्ञांनीही या घटनेला दहशतवादी हल्ला असे स्पष्टपणे संबोधले. मात्र, न्यू यॉर्क टाईम्सने आपल्या अहवालात या दुर्दैवी घटनेला “मिलिटंट अटॅक” (अतिरेक्यांचा हल्ला) असे संबोधले. यामुळे अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाच्या परराष्ट्र व्यवहार समितीकडून थेट निषेध नोंदवण्यात आला आहे.
“हा दहशतवादी हल्लाच होता” अमेरिकन समितीचा स्पष्ट इशारा
अमेरिकेच्या हाऊस फॉरेन अफेअर्स कमिटीने X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक प्रतिमा शेअर करत न्यू यॉर्क टाईम्सच्या मथळ्यावर लाल रेषा ओढली आणि “मिलिटंट” या शब्दाऐवजी “टेररिस्ट” (दहशतवादी) असा शुद्ध मथळा लिहिला.
Hey, @nytimes we fixed it for you. This was a TERRORIST ATTACK plain and simple.
Whether it’s India or Israel, when it comes to TERRORISM the NYT is removed from reality. pic.twitter.com/7PefEKMtdq
— House Foreign Affairs Committee Majority (@HouseForeignGOP) April 23, 2025
credit : social media
या प्रतिमेसोबत समितीच्या प्रमुख सदस्याने लिहिले,
“New York Times, आम्ही तुमच्यासाठी तो शब्द दुरुस्त केला आहे. हा एक दहशतवादी हल्ला होता. भारत आणि इस्रायलप्रती तुमचा दृष्टिकोन वास्तवाशी संबंधित नाही.”
ही टीका केवळ न्यू यॉर्क टाईम्सवरच नव्हे, तर दहशतवादाच्या वृत्तांकनात असलेल्या पक्षपातीपणावरही जोरदार प्रहार करणारी ठरली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pahalgam Terror Attack: कॉउंटडाऊन सुरू! फक्त 7 दिवसांत भारत उचलणार पाकिस्तानविरोधात मोठे पाऊल
भारताची तीव्र प्रतिक्रिया, दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन
हल्ल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेतली आणि या हल्ल्याला दहशतवादी कारवाई असे ठामपणे घोषित केले. त्यांनी यामागील दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल असेही स्पष्ट केले. संघटितपणे करण्यात आलेल्या या हल्ल्यामागे पाकिस्तानप्रेरित लष्कर-ए-तैयबा किंवा जैश-ए-मोहम्मदसारख्या गटांचा सहभाग असल्याचा अंदाज आहे. भारताने यासंदर्भातील पुरावे पूर्वीही पाकिस्तानकडे दिले, मात्र तेथे कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाहीत, हेही सरकारकडून सांगण्यात आले. या हल्ल्याचा उद्देश स्पष्ट आहे. काश्मीरमध्ये चाललेल्या शांततेच्या प्रक्रियेला आणि विकासाच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या भारताला अडथळा आणणे.
अतिरेकी आणि दहशतवादी, समजण्यासारखा फरक
या प्रकरणामुळे एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे – अतिरेकीवाद (Militancy) आणि दहशतवाद (Terrorism) यातील फरक.
1. अतिरेकीवाद एखाद्या राजकीय किंवा सामाजिक परिवर्तनासाठी बंडखोरीच्या स्वरूपात असू शकतो.
2. परंतु दहशतवाद हा नियोजित हिंसाचाराद्वारे देशात भीती निर्माण करण्याचा आणि अस्थिरता पसरवण्याचा कट असतो, जो अनेकदा सीमापार पाठबळ आणि आंतरराष्ट्रीय अजेंड्यांशी जोडलेला असतो.
न्यू यॉर्क टाईम्ससारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनी अशा संवेदनशील घटनांना योग्य संदर्भात मांडणे अत्यावश्यक आहे, अन्यथा ते दहशतवाद्यांच्या हेतूंना अप्रत्यक्षपणे बळ देणारे ठरू शकते, असा इशारा अनेक तज्ज्ञांनी दिला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Persona Non Grata : भारताकडून पाकिस्तानला राजनैतिक झटका, पाक राजदूतांना ‘नॉन ग्राटा’ नोट
माहितीची जबाबदारी आणि जागतिक सहानुभूतीचा प्रश्न
पहलगाममधील हल्ल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे अधोरेखित झाले आहे की, जगभरातील माध्यमांची जबाबदारी केवळ माहिती देण्यापुरती मर्यादित नसून ती वास्तवाच्या आधारे सत्य मांडण्याचीही असते. भारतासाठी आणि दहशतवादाने त्रस्त इतर राष्ट्रांसाठी, न्यू यॉर्क टाईम्ससारख्या प्रतिष्ठित माध्यमांचे असे दुहेरी मापदंड केवळ अन्यायकारकच नाहीत, तर असंवेदनशीलतेचे निदर्शकही आहेत.