New Zealand city declares state of emergency due to Heavy rain and storms
वेलिंग्टन: एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडमध्ये अचानक मुसळधार पावसाने आणि भीषण वादळाने थैमान घातले आहे. यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. मुख्यत: साउथ आयंलडमध्ये जोरदार पाऊस सुरु असून पूरसिथ्ती निर्माण झाली आहे. अनेक घऱे पाण्याखाली गेली आहेत. नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. देशातील आपत्कालीन पथक अलर्टमोडवर आहेत.
न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टनमध्ये वादळी वारे वाहत आहेत. तसेच वाईट हवामानाचा जोर देखील मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. काही भागांमध्ये जोरदार हिमवृष्टी झाली. समुद्रात उंच लटा उसळत आहेत. अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिती किंवा कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र परस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपत्कालीन बचाव पथकाने बचाव आणि मदतकार्य सुरु केले आले आहे.
🇳🇿 NEW ZEALAND SLAMMED BY WORST WINDS IN A DECADE
Gusts reached 160kph in Wellington, shutting schools down, and grounding flights.
The capital is under a rare red wind warning, while parts of the South Island, including Christchurch, declared states of emergency after floods… https://t.co/RIYo7KVkbX pic.twitter.com/LPHMXr7jmm
— Mario Nawfal (@MarioNawfal) May 1, 2025
न्यूझीलंडचे आपत्कालीन व्यवस्थान मंत्री मार्क मिशेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्चमध्ये परस्थिती अत्यंत बिकट आहे. प्रशासनाने आपत्कालीन स्थिती लागू केली आहे. तसेच कॅंटरबरी भागातील काही परिसरात बुधवारपासून आतापर्यंत 100 ते 180 मिमीपर्यंतच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. अनेक भागांमध्ये महिन्याच्या सरासरीच्या दुप्पटीपेक्षा अधिक पाऊस एका दिवसांत पडला आहे. अशी माहिती राष्ट्रीय हवामान सेवा मेटसर्व्हिसने दिली.
न्यूझीलंडच्या अनेक भागांमध्ये 150 किमी वेगाने वारे वाहत आहेत. यामुळे अनेक झाडे उखडून पडली आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडण्यास सांगितले आहे. पूरगस्त भागांमझ्ये पाणी उपसण्याचे आणि पूरात अडकलेल्या नागरिकांची सुटाक करण्याचे काम सुरु आहे. पूरात अकडलेल्या लोकांची सुटका करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.
प्रशासनाने हवामान स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांना पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना अधिकृत सुचना आणि खबरदारीचे पालन करण्याचे सूचित करण्यात आले आहे. सध्या देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्रायलच्या जंगलामध्ये भीषण आग ; देशात आणीबाणीची परिस्थिती, VIDEO