इस्रायलच्या जंगलामध्ये भीषण आग ; देशात आणीबाणीची परिस्थिती, VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेरुसेलम: इस्रायलची राजधानी जेरुसेमलच्या जंगलांमध्ये भीषण आग लागली आहे. यामुळे इस्रायलमध्ये आणीबाणीची परिस्थीती निर्माण झाली आहे. या भीषण आगीमुळे हजारो नागरिकांना आपले घरे सोडून जावी लागली आहे. सध्या याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, आग किती भीषण आहे. ही आग इस्रायलच्या इतिहासातील सर्वात भीषण आग मानली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (30 एप्रिल) रोजी ही आग लागली. त्यानंतर जोरदार वाऱ्यामुळे आग प्रचंड वेगाने पसरत आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या घटनेला नॅशनल इमर्जन्सी म्हणून घोषीत केले आहे. सध्या अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु आग इतकी भीषण आहे की, जेरुसेलम शहरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, सध्याच्या क्षणी जेरुसेलमचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.
Horrifying scenes from Jerusalem Wildfire. #IsraelWildFire #israelindependenceday pic.twitter.com/jjnk93AqQV
— Kashmir (@Moj_Kasheer) April 30, 2025
आग विझवण्यासाठी शेकडे अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लष्करी मदतही पुरवली जात आहे. इस्रायलच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवने दिलेल्या माहितीनुसार, आगीत 23 जणांना गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. यामध्ये काहींना आगीत भाजल्यामुळे आणि काहींना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत आहे. अनेक नागरिक या त्रासाने त्रस्त झाले आहेत.
या आगीमुळे तेल अवीव ते जेरुसेलमपर्यंतचे सर्व महामार्ग बंद करण्यात आले आहेत. अनेक नागरिकांना वाहने रस्त्यावरच सोडून जावी लागली आहेत. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. व्हिडिओंमध्ये दिसून येत आहे की, संपूर्ण जेरुसेलमच्या परिसरात आकाशात धुराचे काळे ढग पसरलेले आहेत. पोलिसांनी अनेक भाग खाली करण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश नागरिकांना दिले आहे.
याआगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परुं इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटमार बेन यांच्या मते, ही आग जाणूनबुजून लावण्यात आले आहे. या संदर्भात एक संशयिताला अटक करण्यात आली आहे. इस्रायलने आंतरराष्ट्रीय मदतीची विनंती केली आहे. इटली क्रोएशिया आणि उत्तर मॅसेडेनियामधून अग्निशमक विमाने मदतीसाठी पोहचवली जात आहे. हेलिकॉप्टर्ने आग विझवण्याचे काम सुरु आहे.